West Bengal Election: हिंदूंनो एक व्हा म्हटलं असतं तर निवडणूक आयोगाची नोटीस आली असती; मोदींची टीका
पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्या टप्प्याचं मतदान होत असतानाच कुचबेहार येथील प्रचारसभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवला. (Shows you have lost the poll: PM Modi hits out at Mamata Banerjee)

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्या टप्प्याचं मतदान होत असतानाच कुचबेहार येथील प्रचारसभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवला. ममता बॅनर्जी मुस्लिम व्होटबँकेच्या नावावर मते मागत असल्याचं आरोप करतानाच आम्ही हिंदूनो एक व्हा म्हटलं असतं तर निवडणूक आयोगाने आतापर्यंत आम्हाला नोटीस पाठवली असती, अशी टीका मोदींनी केली आहे. (Shows you have lost the poll: PM Modi hits out at Mamata Banerjee)
मोदी नेमकं काय म्हणाले?
ममता बॅनर्जी उघडपणे मुस्लिमांना मतदान करण्याचं आवाहन करत आहेत. त्यांना एकत्र येण्याचं आवाहन करत आहे. खरे तर त्यांच्या हातून मुस्लिम व्होटबँक निघून गेल्याचंच दिसत आहे. ममता बॅनर्जींनी मुस्लिमांना मतदान करण्यासाठी एकजूट होण्याचं आवाहन करूनही त्यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली नाही. जर आम्ही हिंदूंना एकजूट होऊन भाजपला मतदान करण्याचं आवाहन केलं असतं तर आतापर्यंत आम्हाला निवडणूक आयोगाची नोटीस आली असती, असा आरोप मोदींनी केला आहे.
ईव्हीएमवरून टोला
ममतादीदी आता ईव्हीएमलाही शिव्या घालत आहेत. परंतु तुम्ही त्याच ईव्हीएममुळे जिंकल्या होत्या. तेव्हा काही वाटलं नव्हतं. यावरून एकच गोष्ट स्पष्ट होत आहे. ती म्हणजे तुम्ही निवडणूक हारलेल्या आहात. पैसे देऊन लोक भाजच्या रॅलीत येत असल्याचा आरोप दीदी करत आहेत. खरे तर दीदी बंगालच्या जनतेचा अपमान करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. दीदींना टिळा लावणाऱ्यांचा, भगवा परिधान करणाऱ्यांचा तिरस्कार आहे. परंतु या निवडणुकीत त्यांनी सेफ गोल खेळण्याचा प्रयत्न केला आहे, असंही ते म्हणाले.
भाजपचीच लाट
येत्या 2 मे रोजी बंगालमध्ये भाजपचं सरकार स्थापन होईल. त्यानंतर विकासाला सुरुवात होईल. बंगालमधून दीदींचा पराभव निश्चित आहे. पहिल्या दोन टप्प्यात आणि आता तिसऱ्या टप्प्यातही भाजपचीच लाट दिसत आहे, असंही ते म्हणाले.
ममता दीदींचं राजकारण संपलं
यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर गंभीर आरोप केले. दीदींनी पोलिंग बुथमध्ये खेला केला आहे. तेव्हाच दीदी पराभूत झाल्याचं देशानं मान्य केलं होतं. आता त्या वाराणासीतून लढण्याच्या गप्पा करत आहेत. म्हणजे बंगालमधून टीएमसीचा सुफडा साफ झाला आहे. त्यामुळे त्यांना राजकारण करण्यासाठी बंगालच्या बाहेर जावं लागणार आहे, असं सांगतानाच ममता दीदी लोकांना धमकावत आहेत. त्या निवडून आल्या नाही तर सर्व सुविधा बंद होण्याची भीती दाखवत आहेत. परंतु दीदीच्या बोलण्यावर कुणाचाच विश्वास राहीला नाही. बंगालमध्ये काहीच बंद होणार नाही, हे तुम्ही लिहून ठेवा, असंही त्यांनी स्पष्ट केलं. (Shows you have lost the poll: PM Modi hits out at Mamata Banerjee)
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | 100 SuperFast News | 8 AM | 6 April 2021 https://t.co/KiziFo68rW | #SuperFastNews | #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 6, 2021
संबंधित बातम्या:
केरळ, तामिळनाडू-पुद्दुचेरीचा प्रचार संपला, आसाम-बंगालमध्येही तिसऱ्या टप्प्यासाठी मंगळवारी मतदान
West Bengal Elections 2021: मोदींच्या विरोधात ममता बॅनर्जी वाराणासीतून लढणार?; भाजपचं उत्तर काय?
(Shows you have lost the poll: PM Modi hits out at Mamata Banerjee)