साताऱ्यातून मोठी बातमी, विद्यमान खासदाराचा निवडणूक लढण्यास नकार; शरद पवार कुणाला उमेदवारी देणार?

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे सातारा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढण्यास नकार दिल्याचं शरद पवार यांनी जाहीर केलं. आज पवार हे पाटील यांच्या ऐवजी कुणाला उमेदवारी द्यायची यावर चर्चा करणार आहेत. नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी त्यांचा संवाद होणार आहे.

साताऱ्यातून मोठी बातमी, विद्यमान खासदाराचा निवडणूक लढण्यास नकार; शरद पवार कुणाला उमेदवारी देणार?
sharad pawarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 29, 2024 | 1:15 PM

साताऱ्यातून मोठी बातमी आहे. शरद पवार गटाचे साताऱ्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. आरोग्याचं कारण देत श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. खुद्द माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनीच ही माहिती दिली आहे. येत्या दोन ते तीन दिवसात साताऱ्यातील उमेदवाराची घोषणा केली जाईल, असंही शरद पवार यांनी सांगितलं. त्यामुळे पवार कुणाला उमेदवारी देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे आज सातारा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. हा संवाद साधत असताना शरद पवार यांनी ही माहिती दिली. लोकसभा निवडणुकीसाठी तीन पक्षांची आघाडी झाली आहे. या आघाडीने साताऱ्याच्या जागेवर सखोल चर्चा केली. साताऱ्याशी यशवंतराव चव्हाण यांचा संबंध राहिला आहे. राष्ट्रवादीसाठी हा महत्त्वाचा जिल्हा आहे. इथला कोणताही निर्णय काळजीपूर्वक घेतला पाहिजे, असं शरद पवार म्हणाले.

शेवटी इच्छा नसतानाही…

श्रीनिवास पाटील यांची कामगिरी चांगली होती. त्यांची संसदेत चांगलं काम केलं. त्यांनी विकासाची कामे प्रामाणिकपणे कामे केली. त्यांनी पुन्हा निवडणुकीत उभं राहावं असं सर्वांचं म्हणणं होतं. पण आरोग्याचे काही प्रश्न असल्याने त्यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. श्रीनिवास पाटील यांच्याशी चार ते पाच वेळा चर्चा झाली. आरोग्यामुळे न्याय देऊ शकणार नाही. त्यामुळे लढण्यात अर्थ नाही. पण पक्ष सांगेल ते काम मी करेल. मला निवडणुकीच्या प्रक्रियेतून मुक्त करा, असं श्रीनिवास पाटील यांनी सांगितलं.

आम्ही सर्वांनी त्यांना निवडणूक लढण्याचा आग्रह केला. पण त्यांनी शेवटी नाही म्हटलं. इच्छा नसताना आम्ही त्यांची भूमिका मान्य केली. दोन-तीन दिवसात या जागेवरील उमेदवार ठरवू. ज्यांची निवड केली जाईल त्यांना निवडून आणण्याचं काम आपलं आहे, असं शरद पवार यांनी सांगितलं.

साताऱ्यात नवा गडी?

साताऱ्यातून श्रीनिवास पाटील यांच्या जागी कोण? याबाबतची मते जाणून घेण्यासाठी पवार साताऱ्यात आले आहेत. यावेळी ते कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा करणार आहेत. तर, सातारा लोकसभा मतदारसंघासाठी आमदार बाळासाहेब पाटील, सुनील माने, आमदार शशिकांत शिंदे, सारंग पाटील आणि सत्यजित पाटणकर यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. यापैकी कुणाच्या नावावर शरद पवार शिक्कामोर्तब करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच साताऱ्यात नवीन उमेदवार मिळण्याचीही दाट शक्यता वर्तवली जात आहे.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.