बीडमध्ये असा रंगला आघाडी-पिछाडीचा थरार, पंकजा मुंडे – बजरंग सोनवणे यांच्यात चुरशीची लढत
Beed lok sbha election result : बीड लोकसभा मतदारसंघात अतिशय चुरशीची लढाई पाहायला मिळाली. पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यात कांटे की टक्कर होती. पण अखेर एकाने बाजी मारली, शेवटच्या फेरीतील मतमोजणीने चित्र बदललं.
लोकसभा निवडणुकांचा मंगळवारी निकाला जाहीर झाला. पण काही निकाल हे अत्यंत चुरशीचे आणि धक्कादायक होते. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं. पण बीड लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढाई पाहायला मिळाली. बीड, परभणी, जालना मतदारसंघात मराठा आरक्षणाच फॅक्टर दिसून आला. बीड मतदारसंघात पहिल्या फेरीपासूनच चुरस सुरु होती. पहिल्या फेरीत बजरंग सोनवणे यांनी 1359 मतांनी आघाडी मिळाली पण नंतर पंकजा मुंडे यांनी आघाडी घेतली. फेऱ्या पार पडत असताना आघाडी पिछाडी सुरु होती.
बीड लोकसभा मतदारसंघात चुरस वाढत गेली. त्यामुळे उमेदवारांची देखील धाकधूक वाढली होती. कार्यकर्त्यांना देखील आपला उमेदवार येतो की नाही याबाबत उत्सूकता शिगेला पोहोचली. शेवटच्या 32 व्या फेरीपर्यंत ही उत्सूकता कायम राहिली.
पंकजा मुंडे यांनी बजरंग सोनवणेंनी यांना मागे टाकलं आणि तब्बल 43 हजारांची आघाडी घेतली. पण 31 व्या फेरीत पुन्हा पंकजा मुंडेंचा लीड कमी झाला. पंकजा मुडेंचा लीड फक्त 400 मतांवर आली. आता थरार वाढला होता. कार्यकर्त्यांमध्ये देखील काळजाचे ठोके चुकवत होता. 31 व्या फेरीत बजरंग सोनवणे यांनी आघाडी घेतली आणि मग पंकजा मुंडे देखील मतमोजणी केंद्रावर दाखल झाल्या. आता 31 व्या फेरीअखेर बजरंग सोनवणे यांनी 688 मतांची आघाडी घेतली. त्यामुळे 32 व्या फेरीत कुणाला लीड मिळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं.
बजरंग सोनवणे यांना 31 व्या फेरीअखेर 6, 74, 507 मतं मिळाली तर पंकजा मुंडे यांना 6,73,819 मतं मिळाली. पण कधी पंकजा मुंडे आघाडीवर यायच्या तर कधी बजरंग सोनवणे. प्रत्येक फेरीत चित्र बदलत होतं. पण जेव्हा अखेरची फेरी सुरु झाली. तेव्हा पाटोदा ताल्यातील 20 गावांनी दिलेला कौल निर्णायक ठरला. केवळ दोन फेरी मतमोजणीच्या बाकी असताना बजरंग सोनवणे यांनी दोन हजार मतांनी आघाडी घेतली.
1 फेरी – बंजरंग सोनवणे 1359 मतांनी आघाडीवर
2 फेरी – बजरंग सोनवणे 2349 मतांनी आघाडीवर
6 फेरी – बजरंग सोनवणे 1387 मतांनी आघाडीवर
7 फेरी – बजरंग सोनवणे 203 मतांनी आघाडीवर
10 फेरी – पंकजा मुंडे 11955 मतांनी आघाडीवर
11 वी फेरी – पंकजा मुंडे 2111 मतांनी आघाडीवर
12 वी फेरी – बजरंग सोनवणे 1644 मतांनी आघाडीवर
13 वी फेरी – बजरंग सोनवणे 6473 मतांनी आघाडीवर
15 वी फेरी – पंकजा मुंडे 3093 मतांनी आघाडीवर
18 वी फेरी – पंकजा मुंडे 24099 मतांनी आघाडीवर
19 वी फेरी – पंकजा मुंडे 24361 मतांनी आघाडीवर
20 वी फेरी – पंकजा मुंडे 16482 मतांनी आघाडीवर
21 वी फेरी – पंकजा मुंडे 33623 मतांनी आघाडीवर
22 वी फेरी – पंकजा मुंडे 38303 मतांनी आघाडीवर
23 वी फेरी – पंकजा मुंडे 34705 मतांनी आघाडीवर
24 वी फेरी – पंकजा मुंडे 30461 मतांनी आघाडीवर
25 वी फेरी – पंकजा मुंडे 22421 मतांनी आघाडीवर
26 वी फेरी – पंकजा मुंडे 10276 मतांनी आघाडीवर
27 वी फेरी – पंकजा मुंडे 7408 मतांनी आघाडीवर
28 वी फेरी – बजरंग सोनवणे 932 मतांनी आघाडीवर
29 वी फेरी – बजरंग सोनवणे 1217 मतांनी आघाडीवर
30 वी फेरी – बजरंग सोनवणे 2602 मतांनी आघाडीवर
31 वी फेरी – बजरंग सोनवणे 2688 मतांनी आघाडीवर
फेरमतदानाची मागणी
बीड आणि गेवराई विधानसभा मतदारसंघात फेरमतदान घेण्याची मागणी पंकजा मुंडेंचे प्रतिनिधी वाल्मीक कराड यांनी निवडणूक आयोगाकडे केली. पण त्यांची ही मागणी निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळून लावली. त्यानंतर बजरंग सोनवणे यांना विजयी घोषित करण्यात आले.