UP Assembly Election 2022 : उत्तरप्रदेशात भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरणार, मात्र 100 जागांचा फटका! – सर्व्हे

उत्तर प्रदेश प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकार पुन्हा किमया करणार की यंदा अखिलेश यादव बाजी मारणार याचे आडाखे आता बांधले जाऊ लागले आहेत. अशावेळी एबीपी माझा आणि सी व्होटरचा ओपिनियन पोल आज जाहीर करण्यात आला. त्यात उत्तर प्रदेशात भारतीय जनता पार्टीच सर्वात मोठा पक्ष ठरेल. मात्र, भाजपच्या जागा मात्र मोठ्या प्रमाणात कमी होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.

UP Assembly Election 2022 : उत्तरप्रदेशात भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरणार, मात्र 100 जागांचा फटका! - सर्व्हे
योगी आदित्यनाथ, अखिलेश यादव, मायावती, अखिलेश यादव
Follow us
| Updated on: Jan 10, 2022 | 8:41 PM

मुंबई : एकीकडे देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. अशावेळी निवडणूक आयोगाकडून 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची (5 State Assembly Election 2022) घोषणा करण्यात आलीय. त्यात उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यांचा समावेश आहे. पंजाब वगळता अन्य चार राज्यात भाजपचं सरकार आहे. मात्र, आता फासे पलटणार का? उत्तर प्रदेश प्रदेशात योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) सरकार पुन्हा किमया करणार की यंदा अखिलेश यादव (Akhilesh Yadav) बाजी मारणार याचे आडाखे आता बांधले जाऊ लागले आहेत. अशावेळी एबीपी माझा आणि सी व्होटरचा ओपिनियन पोल आज जाहीर करण्यात आला. त्यात उत्तर प्रदेशात भारतीय जनता पार्टीच सर्वात मोठा पक्ष ठरेल. मात्र, भाजपच्या जागा मात्र मोठ्या प्रमाणात कमी होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.

2017 च्या तुलनेत भाजपला मोठा फटका?

2017 च्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी, बसपा आणि काँग्रेसचा सुपडा साफ करत भाजपनं 300 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवला होता. मोदी लाटेत स्वार झालेल्या भाजपने 2017 च्या निवडणुकीत 47 वरुन थेट 312 जागांवर मजल मारली होती. तर अखिलेश यादवांच्या समाजवादी पार्टीची 224 वरुन 47 जागांवर घसरण झाली होती. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला जवळपास 100 जागांचा तोटा होण्याची शक्यता या सर्व्हेत व्यक्त करण्यात आलीय. 2017 मध्ये भाजपनं नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली होत. तर यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कामाचं परीक्षणही मतदार करत असल्याचं या सर्व्हेतून पाहायला मिळत आहे.

भाजपला किती जागा मिळतील?

2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला एकहाती सत्ता मिळाली होती. मात्र, यंदा भाजपला 223 ते 235 जागा मिळण्याची शक्यता या ओपिनियन पोलमध्ये व्यक्त करण्यात आली आहे. तर 2017 च्या तुलनेत समाजवादी पार्टीला 100 जागा अधिक मिळून, 145 ते 157 जागांवर विजयाचा अंदाज व्यक्त केला जातोय. तर काँग्रेसला मात्र केवळ 3 ते 7 जागांवर समाधान मानावं लागेल असं या ओपिनियन पोलमध्ये सांगितलं गेलं आहे.

मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांनाच अधिक पसंती

उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांनाच सर्वाधिक लोकांनी पसंती दिली आहे. या सर्व्हेमध्ये योगी आदित्यनाथ यांना 43 टक्के लोकांनी पसंती दिलीय. तर अखिलेश यादव हे मुख्यमंत्री होतील असं उत्तर प्रदेशातील 35 टक्के लोकांना वाटतं. त्यानंतर 14 टक्के लोक मायावती आणि 4 टक्के लोक प्रियंका गांधी यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती देत आहेत.

इतर बातम्या :

पंतप्रधान मोदींच्या सूरक्षेतील चूक प्रकरणाला नवं वळण मिळणार? ‘या’ संघटनेनं स्वीकारली जबाबदारी!

कोरोनाच्या इतर व्हेरिएंटपेक्षा लहान मुलांसाठी ओमिक्रॉन अधिक घातक?, जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.