Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UP Assembly Election 2022 Live Result : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची 10 वैशिष्ट्य

उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा 'योगी'राज, भाजपला स्पष्ट बहुमत, मात्र जागा घडल्या, स्वतःच्या जागेसह सत्ता राखण्यात योगी आदित्यनाथ यांना यश

UP Assembly Election 2022 Live Result : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची 10 वैशिष्ट्य
उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा 'योगी'राज, भाजपला स्पष्ट बहुमतImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 10, 2022 | 7:22 PM
  1. उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा ‘योगी’राज, भाजपला स्पष्ट बहुमत, मात्र जागा घडल्या, स्वतःच्या जागेसह सत्ता राखण्यात योगी आदित्यनाथ यांना यश
  2. अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टी बनली नंबर दोनचा पक्ष, सपाच्या जागांमध्ये वाढ, अखिलेश यादव यांचाही विजय!
  3. लखीमपूरमध्ये सगळ्या सगळ्या 10 विधानसभेच्या जागा भाजपनं जिंकल्या आहेत. लखीमपूरमध्येच एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलानं शेतकऱ्याच्या अंगावर गाडी घालून त्याला चिरडल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी सध्या चौकशी आणि कारवाई सुरु आहे. मात्र लखीमपूर घटनेचा आणि यूपीतील निवडणुकांचा कोणताही परिणाम मतांवर जाणवलेला नाही, हे निकालातून स्पष्ट झालंय
  4. उत्तर प्रदेशात पुन्हा भाजपची सत्ता येण्याचे कल दिसू लागताच, शेअर बाजारात तेजी, गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
  5. तुरुंगात राहून निवडणूक लढवत असलेले बाहुबली नेते विजय मिश्रा पराभूत, भाजप आघाडीचे उमेदवार विपुल दुबे यांचा विजय, तुरुंगात असलेल्या विजय मिश्रांसाठी पत्नी आणि मुलगी यांचा सुरु होता प्रचार, पण मतदारांची दुबेंना साथ
  6. योगी सरकारमधील उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्या यांचा पराभव, सिराथू मतदारसंघातून लढवली होती निवडणूक
  7. भाजपला सोडचिट्ठी देत सपाच्या सायकलवरुन स्वार झालेले स्वामी प्रसाद मौर्य यांचा पराभव
  8. उत्तर प्रदेशात शिवसेनेला शून्य जागा, 41 जागा लढवल्या, आदित्य ठाकरेंची सभा झाली, मात्र त्याचा यूपीतील मतदारांवर कोणताही परिणाम नाही, उलट आता यूपी शिवसेनेच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होण्याची भीती
  9. शिवसेनेसोबत काँग्रेसनंही यूपीत सपाटून मार खाल्ला आहे, काँग्रेसला कशाबशा अवघ्या दोन जागांवर यश मिळालं आहे. तर मायावतींच्या बसपाला अवघ्या एका जागी यश मिळालंय.
  10. केजरीवालांची आम आदमी पार्टी, ओवेसींची एमआयएम यांना उत्तर प्रदेशात भोपळाही फोडता आलेली नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आप, एमआयएम, काँग्रेस, शिवसेना आणि बसपापेक्षा एसबीएसपी (सुहेलदेव भारतीय समाज पार्टी) पक्षानं यूपीत सहा जागी विजय नोंदवला आहे.

Uttar Pradesh Election Result 2022 : ‘उत्तर प्रदेशातील प्रचंड विजयाचं श्रेय पंतप्रधान मोदी, कार्यकर्ते आणि जनतेला’, योगी आदित्यनाथांची पहिली प्रतिक्रिया

Election Result 2022 Live: यूपीतील जनतेकडून जातीवाद, घराणेशाही आणि वंशवादाच्या राजकारणाला तिलांजली, योगींचा विरोधकांवर हल्लाबोल

UP Assembly Elections 2022: उत्तर प्रदेशातल्या विजयानं योगी आदित्यनाथ आता भाजपाचे नंबर 2 चे नेते झालेत का?

कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा.
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड.
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला.
कराडला मारणारा महादेव गीते कोण?
कराडला मारणारा महादेव गीते कोण?.