उत्तर प्रदेश – जेव्हापासून उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या (UP Assembly Elections) तारखा जाहीर झाल्या आहेत, तेव्हापासून या पक्षातून त्या पक्षात जाणा-या बंडखोर आमदारांचे प्रमाण वाढले आहे. आज (bjp) भाजपचे 9 बंडखोर आमदार समाजवादी पार्टीत (samajwadi party) पक्षप्रवेश करणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. आत्तापर्यंत भाजपच्या अनेक आमदारांनी अन्य पक्षात प्रवेश केल्याने भाजप समोर युपीत मोठे आवाहन उभे राहिले आहे. तसेच होणा-या निवडणुकीत भाजपला मोठा संघर्ष करावा लागेल अशी चिन्ह दिसत आहेत. काल राज्याचे आयुष मंत्री, फिरोजाबादमधील शिकोहाबादचे आमदार मुकेश वर्मा, सहारनपूरच्या नकुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार धरम सिंह सैनी, लखीमपूरमधील धौरहराचे आमदार अवस्थी बाला प्रसाद यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ते नेमके कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत मोठी चर्चा सुरू आहे.
इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी वृत्तपत्राच्या बातमीनूसार, राज्याचे आयुष मंत्री, फिरोजाबादमधील शिकोहाबादचे आमदार मुकेश वर्मा, सहारनपूरच्या नकुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार धरम सिंह सैनी, लखीमपूरमधील धौरहराचे आमदार अवस्थी बाला प्रसाद यांनी आपल्या पदाचा गुरूवारी राजीनामा दिला आहे. तसेच राज्यात भाजपसोबत सरकार चालवणारे अपना दल आमदार अमरसिंह चौधरी यांनी सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेतल्याने ते सपामध्येही प्रवेश करतील अशीही चर्चा आहे.
भाजपच्या या तीन मंत्र्यांचा राजीनामा
निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून भाजप आमदार इतर पक्षात प्रवेश करण्याची संख्या वाढली आहे. आत्तापर्यंत सरकारमधील तीन मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. सुरूवातीला स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा दिला, त्यानंतर दारा सिंह चौहान आणि धरमसिंह सैनी यांनी राजीनामा देऊन योगी सरकारवरती आरोप केले आहेत. विशेष म्हणजे आत्तापर्यंत भाजपच्या 9 आमदारांनी राजीनामे दिले आहेत. भाजपचे बंडखोर आमदारांनी काल समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांची भेट घेतल्याने ते पक्षप्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 2017 च्या निवडणुकीपूर्वी अनेक आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तसेच 2017 च्या निवडणुकीपर्वी भाजप सोडून गेलेल्या नेत्यांनी घरवापसी सुध्दा केली होती.