UP Opinion Poll : उत्तर प्रदेशातील मतदारांची मुख्यमंत्रीसाठी पसंती कुणाला? काय सांगतो निवडणूक पूर्व कल?
एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या सर्व्हेनंतर आता झी मीडिया आणि डिझाईन बॉक्स्ड यांचाही ओपिनियन पोल जाहीर करण्यात आलाय. या पोलमध्ये 10 लाखापेक्षा अधिक लोकांचं मत घेतल्याचा दावा या संस्थेनं केलाय. या पोलनुसार उत्तर प्रदेशात पुन्हा भाजपचं कमळ फुलणार की समाजवादी पार्टीची सायकल वेगाने धावणार? हे जाणून घेणार आहोत.
मुंबई : लोकसभा निवडणुकीची (LokSabha Election) लिटमस टेस्ट म्हणून पाहिलं जात असलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची (5 State Assembly Election) रणधुमाळी पाहायला मिळत आहे. संपूर्ण देशाचं लक्ष या पाच राज्यांच्या निवडणुकीकडे लागलं आहे. अशावेळी विविध संस्थाचे ओपिनियन पोल (Opinion Poll) यायला आता सुरुवात झाली आहे. एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या सर्व्हेनंतर आता झी मीडिया आणि डिझाईन बॉक्स्ड यांचाही ओपिनियन पोल जाहीर करण्यात आलाय. या पोलमध्ये 10 लाखापेक्षा अधिक लोकांचं मत घेतल्याचा दावा या संस्थेनं केलाय. या पोलनुसार उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) पुन्हा भाजपचं कमळ फुलणार की समाजवादी पार्टीची सायकल वेगाने धावणार? हे जाणून घेणार आहोत.
उत्तर प्रदेशातील मतदारांची मुख्यमंत्री पदासाठी कुणाला सर्वाधिक पसंती?
>> योगी आदित्यनाथ – उत्तर प्रदेशातील 47 टक्के लोकांनी मुख्यमंत्री पदासाठी पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ यांना पसंती दिली आहे.
>> अखिलेश यादव – सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना उत्तर प्रदेशातील 35 टक्के लोकांनी मुख्यमंत्रीपदासाठी पसंती दिलीय.
>> मायावती – बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांना 9 टक्के लोकांनी मुख्यमंत्रीपदासाठी पसंती दिलीय.
>> प्रियंका गांधी – मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांना 5 टक्के लोकांनी पसंती दिली आहे.
>> तर 4 टक्के लोक मुख्यमंत्रीपदासाठी दुसराच चेहरा असावा अशी इच्छा व्यक्त करत आहेत.
एबीपी-सी व्होटरच्या सर्व्हेतही योगींनाच सर्वाधिक पसंती
एबीपी आणि सी व्होटरच्या ओपिनियन पोलनुसार उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांनाच सर्वाधिक लोकांनी पसंती दिली आहे. या सर्व्हेमध्ये योगी आदित्यनाथ यांना 43 टक्के लोकांनी पसंती दिलीय. तर अखिलेश यादव हे मुख्यमंत्री होतील असं उत्तर प्रदेशातील 35 टक्के लोकांना वाटतं. त्यानंतर 14 टक्के लोक मायावती आणि 4 टक्के लोक प्रियंका गांधी यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती देत आहेत.
झी मीडियाच्या सर्व्हेनुसार उत्तर प्रदेशात यंदा कुणाला किती जागा मिळणार?
>> 2017 च्या तुलनेत यंदा भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. असं असलं तरी भाजपाच मोठा पक्ष ठरेल. भाजपला 245 ते 267 जागा मिळण्याची शक्यता
>> समाजवादी पार्टी 2017 च्या तुलनेत चांगली कामगिरी करेल. यंदा सपाला 125 ते 148 जागा मिळण्याचा अंदाज
>> बसपाची आणि काँग्रेसची अवस्था मात्र दयनीय होत असल्याचं या सर्व्हेतून पाहायला मिळत आहे. बसपाला 5 ते 9 जागा, तर काँग्रेसला 3 ते 7 जागा मिळण्याची शक्यता
>> इतर 2 ते 6 जागांवर अन्य पक्ष निवडून येण्याची शक्यता
कोणत्या पक्षाला किती टक्के मतं मिळणार?
या सर्व्हेनुसार भाजपला 41 टक्के मतं मिळतील, तर समाजवादी पार्टीला 34 टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे. बसपा आणि काँग्रेसची अवस्था यंदाच्या निवडणुकीतही वाईट होणार असल्याचं दिसून येत आहे. बसपाला 10 टक्के तर काँग्रेसला 6 टक्के मतांवर समाधान मानावं लागणार आहे. तर अन्य पक्षांच्या पारड्यात 9 टक्के लोक मत टाकतील.
इतर बातम्या :