अपर्णा यादव यांच्या संपत्तीची युपीत चर्चा, भाजपकडून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता ?
दिल्लीमध्ये अमित शहा यांच्या बैठकीनंतर अपर्णा यादव यांनी हा निर्णय घेतला आहे.
उत्तर प्रदेश – घरच्यांना न जुमानता किंवा घरच्यांच्या विचाराला न मानता भाजपमध्ये (bjp) प्रवेश केलेल्या अपर्णा यादव (aprna yadav) संपत्तीची (property) चर्चा सद्या युपीत सुरू आहे. कारण त्यांनी दाखल उमेदवारी अर्जात त्यांच्या संपत्तीचा उल्लेख केलेला आहे. तसेच समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी सुध्दा त्यांच्या प्रवेशानंतर प्रतिक्रिया दिली आहे. अपर्णा यांनी नेत्यांचं ऐकलं नसून त्यांच्या मतानुसार निर्णय घेतला आहे.
दिल्लीमध्ये अमित शहा यांच्या बैठकीनंतर अपर्णा यादव यांनी हा निर्णय घेतला आहे. भाजपमध्ये जाण्याच्या आगोदर त्यांना मुलायम सिंह यादव यांनी खूपदा समजावलं होतं. परंतु त्यांना जो निर्णय योग्य वाटला, तो त्यांनी घेतला असं अखिलेश यादव यांनी स्पष्ट केलं आहे.
अपर्णा यादव यांचा अल्प परिचय
त्याचं पुर्ण नाव अपर्णा बिष्ट यादव, त्या युपीतील सामाजिक आणि राजकीय नेत्या म्हणून प्रसिध्द आहेत. त्याच्यानंतर मुलायम सिंह यांच्या सुनबाई आहेत. 2011 मध्ये मुलायम सिंह यांच्या मुलाने अपर्णा यांच्यासोबत लग्न केलं. लखनऊ मधून 2017 ला त्यांना समाजवादी पार्टीकडून निवडणुक लढण्याची परवानगी देण्यात आली. त्यांनी आत्तापर्यंत महिलांच्या कामांना अधिक प्राधान्य दिले आहे.
नाव – अपर्णा बिष्ट यादव पक्ष – भाजप शिक्षण- पदव्युत्तर व्यवसाय- सामाजिक कार्यकर्ता वडिलांचे नाव- अरविंद सिंह बिश्त पतीचे नाव- प्रतीक यादव
अपर्णा यादव यांची संपत्ती
अपर्णा यादव यांनी नुकतीच 22.95 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. अपर्णा यादव यांच्याकडे मालमत्तेत 3.27 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि 12.5 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे, असे त्यांनी प्रतिज्ञापत्रात देखील नमूद केले आहे.
अपर्णा यादव यांनी प्रतिज्ञापत्रात 2015-16 मध्ये 50.18 लाख रुपयांचे आयकर रिटर्न भरल्याचे सांगितले होते. त्याचवेळी, त्यांचे पती प्रतीक यादव यांनी 2015-16 मध्ये 1.47 कोटी रुपयांपेक्षा जास्त आयकर रिटर्न भरले होते. प्रतीक यादव यांच्याकडे 5.23 कोटी रुपयांची लॅम्बोर्गिनी आहे, ज्यासाठी त्यांनी युनियन बँक ऑफ इंडियाकडून 4.5 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते.
अपर्णाकडे खूप दागिने आहेत
अपर्णा यादव यांच्याकडे शेतजमीन आणि इमारतीसह १२.५० लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे, तर प्रतीककडे ६.१५ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. 2017 च्या प्रतिज्ञापत्रानुसार, अपर्णावर सुमारे 8.54 लाख रुपये अतिरिक्त कर्ज आहे तर प्रतीकवर 8.7 कोटी रुपयांचे कर्ज आहे. यात सावत्र भाऊ आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या 81.50 लाख रुपयांचा समावेश आहे. अपर्णा यांच्याकडे 1.88 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने आहेत.