Uttar pradesh assembly election 2022: फॉर्ममध्ये नाव लिहा, 300 यूनिट वीज मोफत घ्या; सपाच्या ऑफरने भाजप, बसपाची कोंडी?

उत्तर प्रदेशात निवडणुकीची हवा तापलेली असतानाच समाजवादी पार्टीने मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवा फंडा वापरला आहे. समाजवादी पार्टीने 300 यूनिट वीज मोफत देण्याची घोषणा केली आहे.

Uttar pradesh assembly election 2022: फॉर्ममध्ये नाव लिहा, 300 यूनिट वीज मोफत घ्या; सपाच्या ऑफरने भाजप, बसपाची कोंडी?
Akhilesh Yadav
Follow us
| Updated on: Jan 18, 2022 | 2:23 PM

लखनऊ: उत्तर प्रदेशात निवडणुकीची हवा तापलेली असतानाच समाजवादी पार्टीने मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवा फंडा वापरला आहे. समाजवादी पार्टीने 300 यूनिट वीज मोफत देण्याची घोषणा केली आहे. समाजवादी पार्टीच्या एका फॉर्ममध्ये आपलं नाव नोंदवा आणि 300 यूनिट वीज मोफत मिळवा, असं आवाहन सपा नेते अखिलेश यादव यांनी केलं आहे. विशेष म्हणजे उद्यापासून हे फॉर्म भरण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे समाजवादी पार्टीच्या या नव्या ऑफरमुळे भाजपसह बहुजन समाजवादी पार्टीची कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सपा नेते अखिलेश यादव यांनी आज लखनऊमध्ये पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. ज्यांना 300 यूनिट वीज मोफत हवी आहे, त्यांनी फॉर्ममध्ये आपलं नाव लिहून हा फॉर्म पक्षाकडे जमा करा. तुम्हाला वीज देऊ. मोफत वीज देण्याचा हा मुद्दा निवडणूक घोषणापत्रातही समाविष्ट करण्यात आला आहे, असं सांगतानाच उद्यापासूनच हे फॉर्म भरण्याचं अभियान सुरू करण्यात येईल. ज्या नावाने विजेचे बिल येते, तेच नाव या फॉर्ममध्ये भरायचं आहे, असं अखिलेश यादव यांनी सांगितलं.

मीटर नसतानाही वीज बिल

ज्या लोकांनी वीज वापरली नाही किंवा ज्यांच्याकडे मीटरच नाही, अशा लोकांनाही वीज बिल पाठवण्यात आलं आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही. ओला दुष्काळ झाला, जनावरे दगावली त्याचीही भरपाई शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही, असं त्यांनी सांगितलं.

लॅपटॉप वाटप केल्याने 4000 लोकांना नोकरी मिळाली

आम्ही लॅपटॉपचं वाटप केलं होतं. त्यांना नोकरी मिळाली. लखनऊमध्ये एचसीएलमध्ये 4000 तरुणांना नोकरी मिळाली. कानपूर मेट्रोमध्येही हजारोंच्या संख्येने नोकरी मिळाली. आता 18 लाख लॅपटॉपमुळे किती नोकऱ्या मिळाल्या हेही पाहावं लागेल, असं त्यांनी सांगितलं.

चंद्रशेखर आजाद बाबात ही भाष्य

चंद्रशेखर आजाद यांच्या भीम आर्मीसोबत युती झाली नाही. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. ओम प्रकाश राजभर यांनी सल्ला दिला आहे. त्यांचा जो काही सल्ला असेल तो ऐकून त्याची अंमलबजावणी केली जाईल, असं अखिलेश म्हणाले.

संबंधित बातम्या:

यूपी विधानसभा 2022: असदुद्दीन ओवेसी बिघडवू शकतात अखिलेश यादवांचा खेळ

Explained | भाजपाला तिकीटं कापल्याचा फटका महाराष्ट्रात बसला होता, यूपीमध्ये काय होणार?

Nawab Malik | जिंदगी झंड बा ,फिर भी घमंड बा; भाजप नेते रवी किशन यांची नवाब मलिकांनी उडवली खिल्ली

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.