UP Assembly Election: काँग्रेसच्या 125 उमेदवारांची यादी जाहीर; बलात्कार पीडीतेच्या आईला तिकीट
उत्तर प्रदेश – उत्तरप्रदेश विधानसभा (UP Assembly Election) निवडणुकीसाठी काँग्रेस (UP Congress) पक्षाकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत काँग्रेसच्या 125 उमेदवारांना स्थान देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे त्यामध्ये 50 महिला उमेदवारांना (Women Candidates) स्थान देण्यात आलं आहे. महिला उमेदवारांच्याध्ये काही समाजसेविका आणि पत्रकार महिलांना उमेदवारी दिल्याचे प्रियांका गांधी यांनी स्पष्ट केले. उन्नाव बलात्कार पीडीतेच्या आईला विधानसभेची उमेदवारी देऊन भाजपच्या विरोधात काँग्रेसने चांगलीचं खेळी केल्याची चर्चा सुध्दा आहे. भाजपच्या विरोधात उत्तर प्रदेशमध्ये अनोखी राजकीय खेळी केल्याशिवाय पर्याय नाही, हे लक्षात आलेल्या काँग्रेसने अखेर उमेदवारी जाहीर करून भाजपला घाम फोडला आहे.
काँग्रेस पक्षाकडून जाहीर केलेल्या यादीत अनेक मोठ्या नावांना सुध्दा संधी देण्यात आली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने नाव घेतलं जातंय ते सलमान खुर्शीद यांच्या पत्नीचं लुईस खुर्शीद. त्यानंतर सदफ जाफर यांना सुध्दा उमेदवारी जाहीर केली आहे. उन्नाव विधानसभा क्षेत्रातून आशा सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रियांका गांधी म्हणाल्या की, “त्यांच्या मुलीवरती बलात्कार झाला होता. त्याच्यानंतर सत्तेत असलेल्यांनी अपघात सुध्दा घडवून आणला. त्याच्यापेक्षा वेगळं म्हणजे NRC-CAA विरोधात आंदोलन करणा-या वाली सदफ जाफर आणि पूनम पांडे यांना सुध्दा उमेदवारी दिली आहे.
In the first list of 125 candidates for UP polls, 50 candidates are women, including Asha Singh, mother of the Unnao rape victim. From Shahjahanpur, we have fielded Asha worker Poonam Pandey who led an agitation for a raise in honorarium: Congress leader Priyanka Gandhi Vadra pic.twitter.com/x9WrFsqzvb
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 13, 2022
काँग्रेसकडून नव्या राजकारणाला सुरूवात
भाजपच्या विरोधात अनोखी शक्कल लढल्याशिवाय पर्याय नाही, असं वाटणा-या काँग्रेसने अखेर महिलांना, बलात्कार पीडीतेच्या आईला, सामाजिक कार्यकर्त्या आणि महिला पत्रकार यांनी उमेदवारी जाहीर करून जनतेची मनं जिंकण्याचा प्रयत्न केला आहे. 125 उमेदवारांपैकी, 40 टक्के युवा महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईला उन्नाव विधानसभा क्षेत्रात तिकीट दिल्याने, आम्ही भाजपसाठी एक संघर्ष निर्माण केला असल्याचे प्रियांका गांधी म्हणाल्या. उन्नावमध्ये सत्ता असताना ज्यांनी पीडितेवरती बलात्कार केला. त्यांच्या घरच्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचवलं, पुन्हा त्यांनी उन्नावमध्य़े सत्ता मिळवून दाखवावी असं आवाहन प्रियांका गांधी यांनी भाजपला दिलं आहे.
लुईस खुर्शीद, सदफ जाफर, आशा सिंह, पूनम पांडे या महिला उमेदवारांच्या विरोधात उभ्या राहणा-या भाजपच्या उमेदवारांना मोठा संघर्ष करावा लागणार आहे. सरकारकडून यांचे पोस्टर छापून त्यांना अनेकदा मानसिक त्रास दिला आहे. तसेच तुम्हाला कोणाकडून त्रास दिला तर त्याविरोधात तुम्ही नक्की लढा, अशा माहिलांच्यासोबत काँग्रेस पक्ष कायम असेल. सात टप्प्यात मतदान होणार असून 403 विधानसभा क्षेत्र आहेत.
उन्नाव में जिनकी बेटी के साथ भाजपा ने अन्याय किया, अब वे न्याय का चेहरा बनेंगी- लड़ेंगी, जीतेंगी!#Election2022
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 13, 2022
उन्नावमध्ये ज्यांच्या मुलीवरती भाजपने अत्याचार केला, त्या मुलीची आई न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. मुळात पीडीतेची आई न्यायासाठी लढत आहे, आणि जिंकेल असा विश्वासही राहूल गांधी व्यक्त केला आहे.