Assembly Election 2022: यूपीच्या निवडणुकीसाठी आज दिल्लीत महत्वपूर्ण बैठक, बिपिन रावत यांचे भाऊही रिंगणात
पंजाब विधानसभेच्या 117 जागांसाठी 20 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून मतमोजणी 10 मार्चला होणार आहे. या निवडणूक अनेक अर्थाने रंगतदार होणार आहे. या निवडणुकीत बिपिन रावत यांचे भाऊही रिंगणात उतरले आहेत.
दिल्लीः पाच राज्यातील विधानसभेसाठी होणाऱ्या निवडणुकीमध्ये (Assembly Election) जसजशा जवळ येत आहेत. तसतसा त्या अधिक रंगतदार होत आहेत. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), पंजाब (Panjab), उत्तराखंड (Uttarakhand), गोवा (Goa) आणि मणिपूरमध्ये (Manipur) 10 फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. तर 10 मार्चला निवडणुकींचा निकाल जाहीर होणार आहे. ही निवडणूक 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा अधिक लढतपूर्ण होणार आहे, कारण देशातील प्रत्येक पक्षांनी यासाठी ताकद लावली आहे. भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी आज दिल्लीत महत्वपूर्ण बैठक बोलवली आहे. या बैठकीमध्ये शिल्लक असलेल्या जागांचे वाटप याविषयी चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच गठबंधन आणि दिलेल्या उमेदवारांबाबत चर्चा केली जाणार आहे.
उत्तराखंडच्या निवडणूक जाहीर होण्यास फक्त चार दिवस राहिले आहेत. तर कॉंग्रेस आणि भाजपातील जागांसाठी डोकेदुखी ठरत आहे. दोन्ही पक्षांकडून अजून ही उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली नाही. मात्र आज तरी उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणूकीच्या या धामधूमीत कॉंग्रेसचे नेते भूपेश बघेल डेहराडूनमध्ये दाखल झाले आहेत तर भाजपकडून उत्तराखंडच्या प्रचारासाठी भलीमोठी यादी तयार करण्यात आली आहे.
भाजपचे दिवंगत नेते आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर यांनी पणजीतून अपक्ष लढण्याच्या निर्णय घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधान आले आहे. गोव्यातील पणजीमधून भाजपने उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भाजपकडून त्यांचे मन वळविण्याचा मोठा प्रयत्न करण्यात येत आहे, तर त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवारीबाबत पुनर्विचार करावा असेही पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सपा, बसपा आणि कॉंग्रेसचा शंभरीचा आकडाही होणार नाही पार
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी सांगितले आहे की, समाजवादी पक्ष, बहूजन समाज पार्टी आणि त्यांच्यासोबत असणारे पक्ष हे सगळे एकत्र आले तरी या निवडणुकीत त्यांच्या 100 च्या वरही जागा जाऊ शकत नाहीत असे वक्तव्य त्यांनी केले आहे. प्रादेशिकवाद, राजकारणातील घराणेशाही आणि गुन्हेगारी यांचे उच्चाटन करण्यासाठी भाजप कटीबद्ध असून ही निवडणूक आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन लढणार आहे असंही त्यांनी सांगितले आहे.
भाजप भाजपचेच रिकॉर्ड तोडणार
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारी बोलताना त्यांनी प्रियंका गांधी आणि कॉंग्रेसवर निशाना साधला. या निवडणूकीत कॉंग्रेसला केवळ सात किंवा आठ जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यांनी भाजपच्या विजयाविषयी सांगताना म्हणाले मागील निवडणुकीतील जेवढ्या जागा मिळाल्या होत्या त्या पेक्षा जास्त जागा भाजप यावेळि जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
यूपीत मतदारांसाठी दारू वाटप
उत्तर प्रदेशमधील बादलपूरमध्ये मतदारांना दारुचे वाटप करतान मध्यरात्री काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दारुच्या वीस पेट्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
बिपिन रावत यांचे लहान भाऊही निवडणुकीच्या रिंगणात
तिन्ही सुरक्षा दलाचे प्रमुख बिपिन रावत यांचे लहान भाऊ माजी कर्नल विजय रावत हेही या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ही निवडणूक मी फक्त लोकांची सेवा करण्यासाठी म्हणून लढत आहे. त्यासाठीच माझी उमेदवारी आहे असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
ओपिनियन पोलच्या प्रक्षेपणावर बंदी आणाः सपा
विविध चॅनेल्सवरून सुरू असलेल्या ओपनियन पोलवर निवडणूक आयोगाकडून प्रेक्षपणावर बंदी आणावी अशी मागणी समाजवादी पक्षाने केली आहे. याबाबत समाजवादी पक्षाने निवडणूक आयुक्तांना पत्र लिहिले आहे. ओपनियन पोलमुळे आचारसंहितेचे उल्लंघन होत असून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.