Uttar Pradesh Election: मुलायमसिंह यादवांच्या घरातच फूट; सून अपर्णा यादव भाजपात; निवडणुकीच्या धामधुमीत समाजवादी पार्टीची कोंडी

उत्तर प्रदेशात सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसलेल्या समाजवादी पार्टीचे नेते मुलायम सिंह यादव यांच्या घरातच फूट पडली आहे. मुलायम सिंह यादव यांची सून अपर्णा यादव यांनी आज भाजपमध्ये प्रवेस केला.

Uttar Pradesh Election: मुलायमसिंह यादवांच्या घरातच फूट; सून अपर्णा यादव भाजपात; निवडणुकीच्या धामधुमीत समाजवादी पार्टीची कोंडी
aparna yadav
Follow us
| Updated on: Jan 19, 2022 | 11:25 AM

लखनऊ: उत्तर प्रदेशात सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसलेल्या समाजवादी पार्टीचे नेते मुलायम सिंह यादव यांच्या घरातच फूट पडली आहे. मुलायम सिंह यादव यांची सून अपर्णा यादव यांनी आज भाजपमध्ये प्रवेस केला. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या धामधुमीत समाजवादी पार्टीची कोंडी झाली आहे.

उत्तर प्रदेशचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मोर्य यांचा्या उपस्थितीत अपर्णा यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या विचारधारेवर मी नेहमीच प्रभावित राहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मोर्य यांचे मी आभार मानते. माझ्या क्षमतेनुसार जी जबाबदारी सोपवाल ती मी पूर्ण करेल. राष्ट्रधर्म माझ्यासाठी सर्वात मोठा आहे. मला राष्ट्रासाठी काम करायचं आहे, असं पक्षप्रवेश केल्यानंतर अपर्णा यादव यांनी सांगितलं.

आमच्या योजनांचं क्रेडिट घेतलं

यावेळी केशव प्रसाद मोर्य यांनी अखिलेश यादवांवर हल्ला चढवला. अखिलेश यादव घरातच अपयशी ठरली आहे. या प्रसंगी मी अधिक काही बोलणार नाही. मात्र, समाजवादी पार्टीने आमच्या योजनांचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही योगी आदित्यनाथ यांच्या उमेदवारीची घोषणा पहिल्याच यादीत केली. अखिलेश यादव यांनी अजून त्यांची उमेदवारी घोषित केली नाही. अखिलेश यादव म्हणतात त्यांनी विकास केला. मग सुरक्षित सीट शोधण्यासाठी एवढा वेळ का घेत आहेत. निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्यानंतरही त्यांना अजून मतदारसंघ सापडत नाहीये, असा चिमटा मोर्य यांनी लगावला.

कोण आहेत अपर्णा यादव?

मुलायम सिंह यादव आणि त्यांची दुसरी पत्नी साधना गुप्ता यांचा मुलगा प्रतिक यादव यांची अपर्णा यादव पत्नी आहेत. अपर्णा यादव या मूळच्या उत्तराखंडच्या आहेत. अपर्णा यादव यांनी 2017मध्ये लखनऊच्या कँट विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, भाजप उमेदवार रिटा बहुगुणा जोशींनी त्यांना पराभूत केलं होतं. मात्र, या निवडणुकीत अपर्णा यांनी 63 हजार मते मिळवली होती. रिटा बहुगुणा या खासदार झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे सुरेश चंद तिवारी चौथ्यांदा विजयी झाले होते.

त्या जागेवर दावा

दरम्यान, रिटा बहुगुणा यांनी आपल्या मुलासाठी ही जागा मागितली होती. या जागेवर अनेकांनी दावा केला आहे. आता अपर्णा यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांना ही जागा सोडली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपर्णा यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांचं नेहमीच कौतुक केलं आहे. त्यांनी राम मंदिरासाठी 11 लाख 11 हजार रुपयांची देणगीही दिली होती. तसेच दत्तात्रेय होसबळे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह झाल्यानंतर त्यांच्यासोबतचा फोटोही अपर्णा यांनी शेअर केला होता.

संबंधित बातम्या:

Uttar pradesh assembly election 2022: फॉर्ममध्ये नाव लिहा, 300 यूनिट वीज मोफत घ्या; सपाच्या ऑफरने भाजप, बसपाची कोंडी?

Nawab Malik | जिंदगी झंड बा ,फिर भी घमंड बा; भाजप नेते रवी किशन यांची नवाब मलिकांनी उडवली खिल्ली

Special Report | अरविंद केजरीवाल यांचा फॉर्म्युला अखिलेश यादव यांना उत्तर प्रदेशात विजयाच्या जवळ घेऊन जाणार?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.