VIDEO: उत्तर प्रदेशात विधानसभेच्या 60 अन् लोकसभेच्या 20 जागाही लढवणार; शिवसेना यूपीत भाजपचा खानाखराब करणार?

उत्तर प्रदेशातील (uttar pradesh) सत्ता राखण्यासाठी भाजपने कंबर कसलेली असतानाच शिवसेनेनेही (shivsena) उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत दंड थोपटले आहेत. शिवसेनेने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत 50 ते 60 उमेदवार उभे केले आहेत.

VIDEO: उत्तर प्रदेशात विधानसभेच्या 60 अन् लोकसभेच्या 20 जागाही लढवणार; शिवसेना यूपीत भाजपचा खानाखराब करणार?
शिवसेना नेते संजय राऊत
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 1:46 PM

संदीप राजगोळकर, लखनऊ: उत्तर प्रदेशातील (uttar pradesh) सत्ता राखण्यासाठी भाजपने कंबर कसलेली असतानाच शिवसेनेनेही (shivsena) उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत दंड थोपटले आहेत. शिवसेनेने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत 50 ते 60 उमेदवार उभे केले आहेत. तसेच विधानसभेची निवडणूक संपताच आम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या कामाला लागणार आहोत. उत्तर प्रदेशात आम्ही लोकसभा निवडणुकीत 15 ते 20 उमेदवार देणार आहोत. संपूर्ण देशात शिवसेना लोकसभेच्या 100 जागा लढवणार आहोत. त्यात यूपीतील 20 जागा असतील असं शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी स्पष्ट केलं. विशेष म्हणजे शिवसेनेने उत्तर प्रदेशात शेतकरी आणि हिंदुत्ववादी पक्षांशी युती केली आहे. हिंदुत्ववादी मतांना पदरात पाडून घेण्यासाठी शिवसेनेने ही स्ट्रॅटेजी आखली आहे. त्यामुळे शिवसेना विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भाजपचा खानाखराबा करणार असल्याचं चित्रं निर्माण झालं आहे.

शिवसेना नेते संजय राऊत आज उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. शिवसेना आणि मित्रपक्षांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ते उत्तर प्रदेशात आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. उत्तर प्रदेशातील निवडणूक महत्त्वाची आहे. उत्तर प्रदेशातील निकालाने देशाची दिशा आणि दशा दाखवली जाते. त्यामुळे संपूर्ण देश उत्तर प्रदेशच्या निवडणुकीकडे पाहत आहे. मी आमच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यात आलो आहे. उत्तर प्रदेश ही देशातील सर्वात मोठी विधानसभा आहे. याच राज्यातून पंतप्रधान निवडून येतात. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही 50 ते 60 उमेदवार आम्ही उभे केले आहेत. पहिल्या दोन टप्प्यात 15 उमेदवार रिंगणात आहेत. पाचव्या आणि सातव्या टप्प्यात 30 उमेदवार उभे करणार आहोत, असं राऊत म्हणाले.

उत्तर प्रदेशातून लढण्यास सुरुवात

430 विधानसभा जागा असलेल्या राज्यात 50 ते 60 उमेदवारांनी लढणं ही मोठी गोष्ट नाही. पण आम्ही गंभीरपणे लढू. आमची कोणत्याही मोठ्या पक्षाशी युती केली नाही. आम्ही किसान रक्षा पार्टी, करणी सेना, अवध केसरी सेना आणि इतर छोट्या पक्षांसोबत आघाडी केली आहे. विधानसभा निवडणूक संपताच आम्ही लोकसभेच्या तयारीला लागणार आहोत. उत्तर प्रदेशात आम्ही लोकसभेच्या 15 ते 20 जागा लढवणार आहोत. त्याची तयारी सुरू आहे. महाराष्ट्राच्या बाहेर आम्ही 100 च्या आसपास जागा लढवणार आहोत. आम्ही दादरा नगर हवेलीत खातंही खोललं आहेय दादरा नगर हवेली हा भाजपचा गड होता. यावेळी शिवसेनेने ही लोकसभा जागा जिंकली आहे. गुजरातला लागूनच हा मतदारसंघ आहे. त्यामुळे आम्ही दक्षिण गुजरातेत जाऊन निवडणूक लढणार आहोत. संपूर्ण देशात निवडणुका लढवू. पण उत्तर प्रदेशातून सुरुवात करू, असं त्यांनी सांगितलं.

बाबाजी आमचेही आहेत

या राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत मोठमोठ्या गप्पा मारल्या जातात. माफिया राज संपलं असं म्हटलं जातं. मुख्यमंत्र्यांचा आम्ही आदर करतो. बाबाजी आमचेही आहेत. तरीही प्रमुख पक्षातील नेते येतात आणि त्यांच्यावर पाच राऊंड गोळ्या झाडल्या जातात याचा अर्थ काय? शेतकऱ्यांनी सर्वाधिक आंदोलनं यूपीत झाले, याकडे लक्ष वेधतानाच उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूक 2024च्या निवडणुकांवर परिणाम करेल असं त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या:

उत्तर प्रदेशातून शिवसेनेनं मोदींविरोधात दंड थोपटले, लोकसभेला 100 जागा लढवण्याची घोषणा, राऊतांनी पूर्ण प्लॅन सांगितला

Uttar pradesh assembly election 2022: बसपाची 51 उमेदवारांची यादी जाहीर, मायावतींचा ‘नवा नारा’ काय?

UP Assembly Election 2022: काँग्रेसचा युथ मॅनिफेस्टो, 20 लाख नोकऱ्या देण्याचं आश्वासन; काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आणखी काय?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.