भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर, 21 नव्या उमेदवारांना संधी; 20 आमदारांना मिळाला नारळ
योगी सरकारमधील अनेक मंत्र्यांना नारळ मिळणार अशी शक्यता व्यक्त केली जात होती. ते खरं ठरलं आहे, कारण सरकारमधील 20 विद्यमान आमदारांना नारळ दिल्याचं जाहीर झालंय.

उत्तर प्रदेश – निवडणुक आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यापासून भाजपमधील (bjp) अनेक आमदारांनी इतर पक्षात पक्षप्रवेश सुरू केला होता. ज्यांना भाजपने यावेळी निवडणुक लढण्याची पुन्हा संधी दिली, त्यांनी निवडणुक लढण्याची तयारी केली आहे. आज भाजपच्या केंद्रीय निवडणुक आयोगाकडून संधी मिळालेल्या उमेदवारांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. विशेष म्हणजे पहिल्यांदा निवडणुक लढवत असलेल्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (yogi adityanath) यांना उमेदवारी कुठे मिळते यावर जोरदार चर्चा सुरू होती. पण त्यांना गोरखपूरमधून (gorakhpur) आज उमेदवारी जाहीर केली आहे.
योगी सरकारमधील अनेक मंत्र्यांना नारळ मिळणार अशी शक्यता व्यक्त केली जात होती. ते खरं ठरलं आहे, कारण सरकारमधील 20 विद्यमान आमदारांना नारळ दिल्याचं जाहीर झालंय. हे 20 आमदार आता समाजवादी पार्टीत जाणार का ? किंवा नाराज आमदार अपक्ष म्हणून उभे राहणार ? याचा फायदा अखिलेश यादव यांना कितपत होईल येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. पत्रकार परिषद सुरू असताना केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी योगी आदित्यनाथ यांची उमेदवारी जाहीर करीत असताना त्यांचं कौतुकं केलं. तसेच योगीच्या काळात शाळा सुरू झाल्या, रूग्णालये, विमानतळ अशा अनेक चांगल्या गोष्टी सुरू झाल्याचंही त्यांनी सांगितलं.
उत्तर प्रदेश विधानसभा चुनाव-2022 के लिए घोषित सभी प्रत्याशियों को हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं (1/2)#आएगी_बीजेपी_ही pic.twitter.com/FuluCSmgEr
— BJP Uttar Pradesh (@BJP4UP) January 15, 2022
आज भाजपची 107 जागांसाठी उमेदवारी जाहीर झाली, त्यामध्ये पहिल्या टप्प्यातील 57 उमेदवारांना संधी देण्यात आली. तसेच दुस-या टप्प्यातील 48 मतदारसंघातील उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे भाजपकडून युपीत 21 नव्या चेह-यांना संधी दिली आहे. त्यामध्ये तरूण महिला, समाजसेविका आणि डॉक्टरांचा समावेश असल्याचे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
युपीत सात टप्प्यात मतदान होणार असून जाहीर झालेल्या यादी पहिल्या दोन टप्प्यांसाठी आहे. त्यामध्ये नवीन 20 चेह-यांना संधी देण्यात आली आहे, तर 21 आमदारांना संधी मिळालेली नाही. युपीत एकूण 403 जागांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे उरलेल्या 5 टप्प्यांमध्ये आणखी किती आमदारांना नारळ मिळतोय अशी चर्चा सुरू आहे. 107 जागांवरती 20 जणांना नारळ मिळाला. तर उरलेल्या जागांवर आणखी आमदारांना भाजपकडून डावललं जाईल हे पाहणं गरजेचं आहे. उत्तर प्रदेशात एकूण 403 जागा आहेत. राज्यात सात टप्प्यात मतदान होणार आहे. या टप्प्यानुसार 10 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 3 मार्च आणि 7 मार्च रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीचे निकाल 10 मार्च रोजी जाहीर होणार आहेत.