उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक (Uttar Pradesh Assembly Elections) एकूण 7 टप्प्यात होणार आहे. या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज म्हणजेच 10 फेब्रुवारीला होणार आहे. पहिल्या टप्प्यात पश्चिम उत्तर प्रदेशातील (West Uttar Pradesh) 9 जिल्ह्यातील 58 जागांसाठी मतदान होणार आहे. या टप्प्यात एकूण 623 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. या निवडणुकीत मुख्य लढाई ही भाजप (BJP) विरुद्ध समाजवादी पार्टी (Samajwadi Party)अशीच असणार आहे. तर बसपा आणि काँग्रेससह अन्य राजकीय पक्षही काही जागांवर मजबूत स्थितीत दिसून येत असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे अनेक जागांवर त्रिशंकू लढत होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करुन मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलंय.
उत्तर प्रदेशमधील पहिल्या टप्प्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहा टीव्ही 9 मराठी
मतदानाच्या तारखा निवडणूक आयोगाने बदलल्या
पहिल्या टप्प्यातील मतदान 27 ऐवजी 28 फेब्रुवारीला
दुसऱ्या टप्प्यातील मतदान 3 ऐवजी 5 मार्चला
स्थानिक पातळीवरच्या कारणांमुळे बदल
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी हरदोई येथे सांगितले की, दहशतवाद्यांना या पृथ्वीवर कोणताही आश्रय मिळू नये, त्यामुळे आम्ही देवबंद, मेरठ, आझमगढ, रामपूर, बहराइच, कानपूर येथे ‘अँटी टेररिस्ट कमांडो सेंटर’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही उत्तर प्रदेशला भयमुक्त करण्याचा संकल्प घेतला आहे.
यूपीतील 11 जिल्ह्यांतील 58 जागांवर मतदान होत आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्व 58 जागांवर 7.79 टक्के मतदान झाले आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बागपतमध्ये 61.30 टक्के आणि मथुरेत 58.12 टक्के मतदान झाले आहे.
आग्रा येथे बोगस मतदानावरून सपा आणि भाजप आमनेसामने आले. मिळालेल्या माहितीनुसार, सपा कार्यकर्त्यांनी बोगस मतदाराला रोखले असता भाजप उमेदवाराच्या समर्थकांनी गुंडगिरी दाखवली. हे युवक बनावट आधारकार्ड घेऊन मतदान करणार होते. प्रकरण बाह शहरातील माजी माध्यमिक विद्यालय ज्युनियर हायस्कूलचे आहे.
#Elections2022 #agra
फर्जी मतदान को लेकर SP और BJP आमने-सामने
SP कार्यकर्ताओं ने फर्जी मतदाता को रोका तो BJP प्रत्याशी समर्थकों ने दिखाई गुंडई, युवक फर्जी आधार कार्ड से डालने जा रहा था वोट, बाह कस्बे के पूर्व माध्यमिक विद्यालय जूनियर हाई स्कूल का मामला।@agrapolice | @ceoup | pic.twitter.com/H7PabLHROw— TV9 Uttar Pradesh (@TV9UttarPradesh) February 10, 2022
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर
चर्चेत
काँग्रेसचा जाहीरनामा एका मोटर मेकॅनिकला समजावून सांगितला
प्रियांका गांधी यांनी थेट गॅरेजमध्ये जाऊन मोटर मेकॅनिकला जाहीरनामा समजावून सांगितला
सोशल मीडियावर प्रियंका गांधी यांच्या व्हिडिओची जोरदार चर्चा
समाजवादी पक्षाने निवडणूक आयोगाला सांगितले आहे की, अलीगढ जिल्ह्यातील छारा विधानसभा-74, बूथ क्रमांक-443 येथे ईव्हीएम मशीन 1 तास बंद आहे. जिल्हा प्रशासन व निवडणूक आयोगाने दखल घेऊन मतदान सुरळीत पार पडेल याची दक्षता घ्यावी.
अलीगढ़ जिले की छर्रा विधानसभा-74, बूथ नंबर- 443 पर ईवीएम मशीन 1 घंटे से बंद है जिला प्रशासन और चुनाव आयोग संज्ञान लेते हुए कृपया सुचारू रूप से मतदान कराना सुनिश्चित करें। @ECISVEEP @Dm_Aligarh
— Samajwadi Party (@samajwadiparty) February 10, 2022
उत्तर प्रदेशातील 11 जिल्ह्यामधील 58 विधानसभामतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 35 टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगानं दिली आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा सामान्य निर्वाचन-2022
प्रथम चरण के अंतर्गत 11 जनपदों में अपराह्न 01 बजे तक कुल औसतन मतदान 35.03% रहा।#ECI#विधानसभाचुनाव2022#AssemblyElections2022 #GoVote #GoVoteUP #GoVoteUP_Phase1 pic.twitter.com/FfJZE01vY9
— CEO UP #DeshKaMahaTyohar (@ceoup) February 10, 2022
मेरठच्या किठौर विधानसभा मतदारसंघाती भडौली गावात सपा आणि भाजपा कार्यकर्ते बोगस मतदानावरुन भिडले असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी जमावाला पांगवलं आहे. दोन्ही गटात यापूर्वी देखील बाचाबाची झाली होती.
मेरठमध्ये 1 वाजेपर्यंत 34 टक्के मतदान झालं
हस्तिनापूरमध्ये 35 टक्के मतदान
मेरठ दक्षिणमध्ये 37 टक्के मतदानाची नोंद झाली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याविरोधात पुण्यातही काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भाजप कार्यकर्ते देखील यावेळी आक्रमक झालेले पाहयला मिळालं आहे.
Uttar Pradesh Voting Percentage Updates: उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यात 20 टक्के मतदान
उत्तर प्रदेश विधानसभा सामान्य निर्वाचन-2022
प्रथम चरण के अंतर्गत 11 जनपदों में पूर्वाह्न 11 बजे तक कुल औसतन मतदान 20.03% रहा।#ECI#विधानसभाचुनाव2022#AssemblyElections2022 #GoVote #GoVoteUP #GoVoteUP_Phase1 pic.twitter.com/u12yZRLJZI
— CEO UP #DeshKaMahaTyohar (@ceoup) February 10, 2022
शामलीमध्ये 23 टक्के मतदान झालं असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगानं दिली आहे.
Aligarh Election Updates: अलिगढमध्ये सकाळी 11 पर्यंत 18 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे.
सकाळी 11 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार हापूडमध्ये 23 टक्के मतदान झाल्याची माहिती आहे.
Meerut Election Updates: मेरठमध्ये 17 टक्के मतदान झाल्याची माहिती आहे. मेरठमधील 7 विधानासभा मतदारसंघातील 11 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार 17 टक्के मतदान झाल्याची माहिती आहे.
बुलंदशहरमध्ये मतदारांमध्ये उत्साह दिसून आला आहे. मतदार मोठ्या संख्येनं मतदानासाठी बाहेर पडत आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरा समोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरा समोर आंदोलन करण्याचा काँग्रेस ने इशारा दिला
त्यामुळे नागपुरातील गडकरी यांच्या घरा समोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
गडकरी यांच्या घरा बाहेर बॅरिकेट लावण्यात आले
पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा उपस्थित
12 वाजता ची काँग्रेस च्या आंदोलनाची वेळ
भाजप कार्यकर्त्यांकडून काँग्रेस विरोधात घोषणाबाजी
नव्या यूपीचा नारा, विकासचं बनेल विचारधारा : अखिलेश यादव
न्यू यूपी का नया नारा :
विकास ही विचारधारा बने!
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) February 10, 2022
उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यात 9 वाजेपर्यंत 8 टक्के मतदान
उत्तर प्रदेश विधानसभा सामान्य निर्वाचन-2022
प्रथम चरण के अंतर्गत 11 जनपदों में प्रात: 09 बजे तक कुल औसतन मतदान 7.93% रहा।#ECI#विधानसभाचुनाव2022#AssemblyElections2022 #GoVote #GoVoteUP #GoVoteUP_Phase1 pic.twitter.com/1Kf4pP9yun
— CEO UP #DeshKaMahaTyohar (@ceoup) February 10, 2022
लता मंगेशकर यांच्या अस्थींचं नाशिकमध्ये विसर्जन
मंगेशकर कुटुंबीय नाशिकमध्ये दाखल
थोड्याच वेळात अस्थी विसर्जन होणार
आग्रा येथील खेरागढमध्ये भाजपा खासदार राजकुमार चाहर यांनी मतदान केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी हे लोकशाही व्यवस्थेतील मोठं पर्व असल्याचं म्हटलं. लोकांनी घराबाहेर पडावं आणि मतदान करावं, असं ते म्हणाले.
आग्रा इथं सकाळी 9 वाजेपर्यंत 6 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आलीय.
गाझियाबादमध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 8 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आलीय
Hapur Election Updates : हापूडमध्ये 9 वाजेपर्यंत 9 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे.
Kairana Voting Update : शामली जिल्ह्यातील कैराना -8 विधानसभा मतदारसंघातील डुंडुखेडा येथील 347 ते 350 मध्ये मतदारांना धमकावलं जातंय. मतदानाच्या रांगामधून घरी पाठवलं जात असल्याचा आरोप समाजवादी पार्टीनं केला आहे.निवडणूक आयोगानं याची दखल घ्यावी, अशी मागणी समाजवादी पार्टीनं केलीय.
शामली जिले की कैराना-8 विधानसभा के ग्राम डुंडुखेड़ा के बूथ संख्या 347,348,349,350 पर गरीब वर्ग के मतदाताओं को डरा धमका कर, वोट की लाइनों से हटा वापस भेजा जा रहा है।
तत्काल संज्ञान ले कार्रवाई कर सुचारू, भयमुक्त, निष्पक्ष मतदान सुनिश्चित करे चुनाव आयोग। @ECISVEEP @dm_shamli
— Samajwadi Party (@samajwadiparty) February 10, 2022
Ghaziabad Voting Update : गाझियाबाद विधानसभा मतदारसंघातील मतदानाला सुरुवात झाली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं यासंदर्भातील फोटो जारी केले आहेत.
उत्तर प्रदेश: गाजियाबाद में विधानसभा चुनाव के पहले चरण के लिए मतदान चल रहे हैं। तस्वीरें पोलिंग बूथ कवि नगर विधानसभा, मुरादनगर से हैं। #UPElections2022 pic.twitter.com/lX82bb0QVS
— ANI_HindiNews (@AHindinews) February 10, 2022
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक
सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात
अनेक मतदान केंद्रांवर मतदानासाठी मोठ्या रांगा
संवेदनशील ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात
उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यातील मतदान सुरु
58 जागांसाठी आज पहिल्या टप्प्यातील मतदान
राहुल गांधी यांचं मतदारांना आवाहन
देश को हर डर से आज़ाद करो-
बाहर आओ, वोट करो!— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 10, 2022