UP Assembly Election 2022 | एक मौर्य रुसले राजीनामा देऊन बसले! अमित शहांनी समजूत घालायला दुसरे मौर्य धाडले!

केशव प्रसाद मौर्या यांनी ट्वीट करत स्वामी प्रसाद मौर्या यांना शांतपणे परिस्थिती हाताळण्याचं आवाहन केलंय. घाईघाईत घेतलेले निर्णय अनेकदा अडचणीत आणतात, अशा आशयाचं ट्वीटही त्यांनी केलंय. स्वामी प्रसाद मौर्य यांच्या राजीनाम्या नंदर बिल्होर, बांदा आणि शाहजहापूरच्या भाजप आमदारांनीही आपला राजीनामा दिला आहे.

UP Assembly Election 2022 | एक मौर्य रुसले राजीनामा देऊन बसले! अमित शहांनी समजूत घालायला दुसरे मौर्य धाडले!
उत्तर प्रदेशमधील राजकीय घडामोडींना वेग
Follow us
| Updated on: Jan 11, 2022 | 5:05 PM

उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री असलेल्या स्वामी प्रसाद मोर्या (Swami Prasad Mourya) यांनी राजीनामा दिला आहे. भाजपवर (Bhartiya Janata Party) गंभीर आरोप करत त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानं उत्तर प्रदेशातील राजकारण चांगलंच तापलं आहे. सेवायोजन आणि समन्वय मंत्री असलेल्या स्वामी प्रसाद मौर्या यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यामुळे उत्तर प्रदेशातील राजकारण ढवळून निघालं आहे. दरम्यान, भाजपलाही या राजीनाम्यानं धक्का दिला असून आता त्यांची समजून काढण्यासाठी भाजपनं मौर्या आडनावाच्याच दुसऱ्या एका नेत्याला कामाला लावलं आहे. अमित शहा (Amit Shah) यांना स्वामी प्रसाद मौर्या यांच्या राजीनामानंतर आमदारकीचा राजीनामा दिलेल्या नाराज नेत्यांची समजून काढण्यासाठी आणि त्यांचं मनपरिवर्तन करण्यासाठी केशव प्रसाद मौर्या यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. भाजपवर गंभीर आरोप करत स्वामी प्रसाद मौर्या यांनी उत्तर प्रदेशच्या राजकारण खळबळ उडवून दिली आहे.

काय आरोप केले?

राजीनामा दिलेल्या स्वामी प्रसाद मौर्या यांनी भाजपवर गंभीर आरोप करणारं एक ट्वीट केलं आहे. या ट्विटमध्ये ‘दलित, मागासलेले, शेतकरी, बेरोजदार, युवा तसंत छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांची घोर निराशा झाली असून योगी सरकारच्या काळात त्याची उपेक्षा करण्यात आल्यामुळे मी मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे’, असं स्वामी प्रासद मौर्यांनी म्हटलंय.

राजीनामा देतानाच त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहे. राज्यपालांना पाठवलेल्या राजीनाम्यात त्यांनी राज्यात बेरोजगारी वाढल्याचं नमूद केलं आहे. तसंच सरकार दलित आणि मागासवर्गीयांची उपेक्षा करत असल्याचा गंभीर आरोप केलाय. यानंतर आता स्वामी प्रसाद मौर्या यांना समजवण्यासाठी भाजपच्या उत्तर प्रदेशातील सर्व वरीष्ठ नेते कामाला लागले आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतल केशव प्रसाद मौर्या यांना राजीनामा दिलेल्या आमदारांची समजूत घालण्याच्या मोहिमेवर पाठवलंय. सध्या उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री असलेले केशव प्रसाद मौर्य हे सातत्यानं नाराज आमदारांच्या संपर्कात असून त्यांच्यासोबत चर्चा करत आहेत.

अति घाई संकटात नेई!

दरम्यान, केशव प्रसाद मौर्या यांनी ट्वीट करत स्वामी प्रसाद मौर्या यांना शांतपणे परिस्थिती हाताळण्याचं आवाहन केलंय. घाईघाईत घेतलेले निर्णय अनेकदा अडचणीत आणतात, अशा आशयाचं ट्वीटही त्यांनी केलंय. स्वामी प्रसाद मौर्य यांच्या राजीनाम्या नंदर बिल्होर, बांदा आणि शाहजहापूरच्या भाजप आमदारांनीही आपला राजीनामा दिला आहे. भगवती सागर, वृजेश प्रतापती आणि रोशन लाल यांच्या राजीनाम्यानं उत्तर प्रदेश भाजपमध्ये सगळंकाही आलबेल नाही, हेही स्पष्ट झालंय. तसंच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही मोठी घडामोड असून याचे दूरगामी परिणाम आगामी विधानसभा निवडणुकांवर होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

वडीलांचा राजीनामा, पण मुलगी आहेच!

दरम्यान, मी जरी राजीनामा देत असलो तरी माझी मुलगी ही भाजपची खासदार म्हणून काम करतच राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. भाजपच्या वागणुकीला कंटाळून त्यांनी राजीनामा देत असल्याचं सांगितलं जातंय. 14 फेूब्रुवारीपासून उत्तर प्रदेशात सात टप्प्यात विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीचा निकाल हा 10 मार्च रोजी जाहीर केला जाणार आहे.

ओपिनियन पोलचा काय अंदाज?

एबीपी न्यूज सी वोटरच्या ओपिनियल पोलनुसार, उत्तर प्रदेशात भाजपच्या जागा कमी होण्याची दाट शक्यता आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी, बसपा आणि काँग्रेसचा सुपडा साफ करत भाजपनं 300 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवला होता. मोदी लाटेत स्वार झालेल्या भाजपने 2017 च्या निवडणुकीत 47 वरुन थेट 312 जागांवर मजल मारली होती. तर अखिलेश यादवांच्या समाजवादी पार्टीची 224 वरुन 47 जागांवर घसरण झाली होती. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला जवळपास 100 जागांचा तोटा होण्याची शक्यताय.

2017 मध्ये भाजपनं नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली होती. तर यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कामाचं परीक्षणही मतदार करत असल्याचं या सर्व्हेतून पाहायला मिळत आहे. यंदा भाजपला 223 ते 235 जागा मिळण्याची शक्यता या ओपिनियन पोलमध्ये व्यक्त करण्यात आली आहे. तर 2017 च्या तुलनेत समाजवादी पार्टीला 100 जागा अधिक मिळून, 145 ते 157 जागांवर विजयाचा अंदाज व्यक्त केला जातोय. तर काँग्रेसला मात्र केवळ 3 ते 7 जागांवर समाधान मानावं लागेल असं या ओपिनियन पोलमध्ये सांगितलं गेलं आहे.

संबंधित बातम्या –

Assembly Elections 2022 : यूपी, गोव्यासह मणिपुरात कमळ कोमेजणार? ओपनिअन पोल भाजपचं टेन्शन वाढवणारा

Sanjay Raut on UP election| उत्तर प्रदेशातून गंगा उलटी वाहणार…शेतकऱ्यांसमोर शरणागती पत्करली तसेच मिश्रांबाबत होणार, राऊतांचा घणाघात…

UP Election : उत्तर प्रदेशात काका-पुतण्या पुन्हा एकत्र, अखिलेश आणि शिवपाल यादव 5 वर्षानंतर एकत्र निवडणूक लढवणार

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...