UP Election Result : उत्तर प्रदेशवर कुणाची सत्ता? भाजपची जादू चालणार की अखिलेश यादव कमबॅक करणार?
देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीच्या निकालाला अवघे काही तास उरलेय. उत्तर प्रदेशात इतिहास घडवत योगी च्या नेतृत्त्वात भाजप पुन्हा सत्तेत येणार की समाजवादी पक्षाला लॅाटरी लागणार? याचा फैसला आज होणार आहे.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh Assembly Election Result 2022),उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठीचं मतदान पार पडलेय. आता सर्वांचं लक्ष या राज्यांच्या निकालांकडे सर्वांचं लक्ष लागलंय. पाच राज्यांपैकी सर्वाधिक लक्ष उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Assembly Election Result 2022) निकालावर लागलंय. उत्तर प्रदेशातील मतदारांचा कौल कोणत्या राजकीय पक्षाला मिळणार यावर देशाच्या आगामी राजकारणाची दिशा ठरणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपनं (BJP) योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या नेतृत्त्वात निवडणूक लढवली. भाजपसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील प्रचारात उपस्थिती लावली. दुसरीकडे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या नेतृत्त्वात समाजवादी पक्ष (SP) आणि आरएलडीनं निवडणूक लढवली. मायावती यांनी बसपाच्या प्रचाराची धुरा सांभाळली. तर, काँग्रेसच्या प्रचाराचं नेतृत्त्व प्रियांका गांधी यांनी केलं. उत्तर प्रदेशातील 403 जागांपैकी कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार हे पाहावं लागणार आहे. भाजप, समाजवादी पक्ष, काँग्रेस आणि बसपा यांच्यापैकी कोणाची सत्ता येणार हे पाहावं लागणार आहे.
उत्तर प्रदेशच्या जनतेचा कौल कुणाला? योगी आदित्यनाथ की अखिलेश यादव?
उत्तर प्रदेशच्या जनतेनं 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला मोठ्या बहुमतानं विजयी केलं होतं. यूपीच्या एकूण 403 जागांपैकी 325 जागा भाजपनं मिळवल्या होत्या. तर समाजवादी पक्षाला 47, बसपाला 19 आणि काँग्रेसला 7 जागा मिळाल्या होत्या. भाजपनं सत्ता मिळाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांना संधी दिली होती. तर, यावेळची विधानसभा निवडणूक देखील भाजपनं योगी आदित्यनाथ यांच्या चेहऱ्यावर लढवलीय. भाजपसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे इतर मंत्री यांनी प्रचाराची धुरा सांभाळली.
एक्झिट पोल काय सांगतात?
उत्तर प्रदेशात (Up Elections 2022) पुन्हा भाजपची सत्ता येईल असा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आलाय. TV9 भारतवर्ष-पोलेस्टरच्या एक्झिट पोलनुसार, यूपीमध्ये भाजपला 211 ते 225 जागा, सपाला 146 ते 160, बसपाला 14 ते 24, उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला 4 ते 6 जागा मिळू शकतात. युपीत योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा सत्ता आणण्यासाठी चांगलाच जोर लावला आहे. अमित शाह यांच्यापासून ते पंतप्रधान मोदी यांच्यापर्यंत सर्वच नेते उत्तर प्रदेशात प्रचार करताना दिसून आले. त्याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
कोणत्या टप्प्यात किती टक्के मतदान
उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यात मतदान पार पडलं. पहिल्या टप्प्यातील मतदान 10 फेब्रुवारी रोजी झालं. पहिल्या टप्प्यात 62.43 टक्के मतदान झालं. दुसऱ्या टप्प्यात 64.42 टक्के मतदान पार पडलं. तर तिसऱ्या टप्प्यात 62.28 टक्के मतदान पार पडलं. तर, चौथ्या टप्प्यात 61.52 टक्के मतदानाची नोंद झाली. पाचव्या टप्प्यात 57.32 टक्के मतदान पार पडलं. सहाव्या टप्प्यात 56.25 टक्के मतदानाची नोंद झाली. तर, सातव्या टप्प्यात 54.18 टक्के मतदानाची नोंद झालीय.
दुपारी 1 पर्यंत चित्र स्पष्ट होणार
देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीच्या निकालाला अवघे काही तास उरलेय. उत्तर प्रदेशात इतिहास घडवत योगी च्या नेतृत्त्वात भाजप पुन्हा सत्तेत येणार की समाजवादी पक्षाला लॅाटरी लागणार? याचा फैसला आज होणार आहे. सकाळी आठ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून, सुरुवातीला पोस्टल बॅलेट आणि त्यानंतर इव्हीएममधील मतमोजणीला सुरुवात होईल. सकाळी 10.30 नंतर उत्तर प्रदेशातील 403 जागांवरील कौल यायला सुरुवात होईल आणि एक वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होईल.
इतर बातम्या: