UP Goa Uttarakhand Assembly Election Voting 2022 Live Streaming: उत्तर प्रदेशमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी लढत, गोवा उत्तराखंडमध्ये मतदारांचा कौल कुणाला, उद्या मतदान

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक (Uttar Pradesh Assembly Elections) एकूण 7 टप्प्यात होत आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या म्हणजेच 14 फेब्रुवारीला होणार आहे.

UP Goa Uttarakhand Assembly Election Voting 2022 Live Streaming: उत्तर प्रदेशमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी लढत, गोवा उत्तराखंडमध्ये मतदारांचा कौल कुणाला, उद्या मतदान
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Feb 13, 2022 | 2:18 PM

मुंबई : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक (Uttar Pradesh Assembly Elections) एकूण 7 टप्प्यात होत आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या म्हणजेच 14 फेब्रुवारीला होणार आहे. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) 9 जिल्ह्यातील 55 जागांसाठी मतदान होणार आहे. या टप्प्यात एकूण 586 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. या निवडणुकीत मुख्य लढाई ही भाजप (BJP) विरुद्ध समाजवादी पार्टी (Samajwadi Party)अशीच असणार आहे. दुसरीकडे गोवा आणि उत्तराखंडमध्ये ही विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. गोव्यात 40 जागांसाठी मतदान होईल. उत्तराखंडमध्ये 70 जागांसाठी मतदान होणार आहे. उत्तर प्रदेश, गोवा आणि उत्तराखंड या तिन्ही राज्यात भाजप सत्तेत आहे. गोवा आण उत्तराखंडमध्ये भाजपला सत्ता टिकवण्याचं आव्हान आहे. तर, गोव्यात आणि उत्तराखंडमध्ये काँग्रेस किती करिष्मा दाखवणार हे पाहावं लागणार आहे.

उत्तर प्रदेशमध्ये दुसऱ्या टप्प्याचं मतदान

उत्तर प्रदेशातील निवडणूक 7 टप्प्यात पार पडत आहे. दुसऱ्या टप्प्यात सहारनपूर, बिजनौर, मुरादाबाद, संभल, रामपूर, बरेली, अमरोहा, शाहजहांपूर या जिल्ह्यातील 55 विधानसबा मतदारासंघाठी मतदान पार पडेल. यासाठी 586 उमदेवार मतदानाच्या रिंगणात आहेत. तर, 12538 मतदान केंद्रावर मतदानाची पक्रिया पार पडेल, अशी माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. योगी आदित्यनाथ आणि अखिलेश यादव यांच्यासाठी हा टप्पा महत्त्वाचा आहे.

उत्तराखंडमध्ये एकाच टप्प्यात मतदान

उत्तर प्रदेशमधून वेगळं झालेलं राज्य म्हणजे उत्तराखंड होय. या राज्यातील पाचवी विधानसभा निवडणूक यावर्षी पार पडत आहे. उत्तराखंड विधानसभेच्या 70 जागांसाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक प्रचाराची मुदत शनिवारी संपली असून 14 फेब्रुवारीला 70 जागांसाठी निवडणूक होणार आहे. सध्या उत्तराखंडमध्ये भाजपची सत्ता असून त्यांच्यासमोर सत्ता टिकवण्याचं आव्हान आहे. काँग्रेसनं देखील जोरदार तयारी केलेली आहे. हिमवृष्टी होत असल्यानं निवडणूक आयोगापुढं देखील आव्हानात्मक स्थिती आहे.

गोव्यात 40 जागांसाठी मतदान

गोवा विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय पक्षांनी ताकद पणाला लावलीय. गोव्यात काँग्रेस, (Congress) मगोप, भाजप (BJP) यांच्यात लढत व्हायची. मात्र, यावर्षी ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादीनं ताकद लावली आहे. गोव्यात सध्या भाजपचं सरकार आहे. गेल्या दहावर्षांपासून गोव्यात भाजप सरकार असून यावेळी मतदार कुणाला कौल देतात हे पाहावं लागणार आहे.गोव्यातील 40 जागांसाठी 301 उमदेवार रिंगणात आहेत. गोव्यातील सत्ता मिळवण्यासाठी भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस यांनी ताकद लावली आहे. गोव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस नेते राहुल गांधी, नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, शिवसेना खासदार संजय राऊत आणि पर्यटन विकासमंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रचारात हजेरी लावली. आता गोव्यातील जनता कुणाला सत्ता देणार हे उद्या होणाऱ्या मतदानावरुन ठरणार आहे.

मतदानाची प्रत्येक अपडेट कशी पाहाल?

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उद्या मतदान होणार आहे. या मतदानाची तासा तासाची टक्केवारी तुम्ही tv9marathi.com वर पाहू शकणार आहात. तसंच मतदान काळात उत्तर प्रदेशातील प्रत्येक राजकीय अपडेटही तुम्ही या ठिकाणी वाचू शकणार आहात. त्यासोबतच मतदानाची प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी तुम्ही tv9 Marathi च्या यूट्युब चॅनेलवरही लाईव्ह पाहू शकणार आहेत.

इतर बातम्या

Goa Election 2022 : गोव्याच्या विधानसभेसाठी उद्या मतदान, 40 जागांसाठी भाजप, काँग्रेससह राजकीय पक्षांनी लावला जोर

VIDEO: प्रचार करू नका म्हणून मेसेज आले, पण कुठून आले हे सांगणार नाही; आदित्य ठाकरेंचा मोठा दावा

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.