Uttar Pradesh Assembly Elections 2022 : योगींचे टेन्शन वाढणार ! भाजपला सत्ता राखण्यासाठी घ्यावी लागणार मेहनत, उत्तर प्रदेशच्या जनतेचा कौल काय ?

उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा भाजपचे सरकार स्थापन होणार आहे. मात्र यावेळी भाजप तसेच उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निवडणूक जिंकण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.

Uttar Pradesh Assembly Elections 2022 : योगींचे टेन्शन वाढणार ! भाजपला सत्ता राखण्यासाठी घ्यावी लागणार मेहनत, उत्तर प्रदेशच्या जनतेचा कौल काय ?
yogi adityanath and akhilesh yadav
Follow us
| Updated on: Jan 02, 2022 | 10:19 AM

लखनौ : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या राजकीय हालचाली होताना दिसत आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी भाजप, काँग्रेस, सपासह इतर पक्ष राजकीय समीकरणे जुळवण्याचा प्रयत्न करत आहेत. जाहिरातबाजीदेखील मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. विधानसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर टाईम्स नाऊ नवभारत या इंग्रजी वृत्तवाहिनीने एक महत्त्वाचा सर्व्हे केला आहे. या सर्व्हेनुसार उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा भाजपचे सरकार स्थापन होणार आहे. मात्र यावेळी भाजप तसेच उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निवडणूक जिंकण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.

403 जागांवर करण्यात आला सर्व्हे 

या सर्व्हेमध्ये उत्तर प्रदेशची चार भागात विभागणी केली आहे. यूपीच्या सर्वच म्हणजेच 403 जागांवर हा सर्व्हे करण्यात आलाय. सर्व्हेनुसार भाजपला यावेळी 239 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर समजवादी पार्टीला एकूण 144 जागा मिळू शकतात. यावेळी बसपा आणि काँग्रेस मतदारांवर काही प्रभाव पाडणार नसल्याचं या सर्व्हेत सांगण्यात आलंय. सर्व्हेनुसार बसपाला 12 तर काँग्रेसला फक्त सहा जागा मिळण्याची शक्यता आहे.

पश्चिम यूपीत कोणाची सरशी ?

दिल्लीच्या सीमांवर चाललेल्या तसेच शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याच्या घटनेचा फटका भाजपला बसेल असे सांगण्यात येत आहे. मात्र पश्चिम यूपीमध्ये भाजप मोठ्या प्रमाणात जागा जिंकण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशच्या पश्चिमी भागात भाजपला 97 जागांपैकी 57 ते 60 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे सपा 35 ते 38 जागा जिंकू शकते.

पूर्वांचलमध्ये भाजपला धोबीपछाड

पूर्वांचल भागात भाजपला यावेळी मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. येथे भाजपला मागच्या निवडणुकीत 74 जागांवर विजय मिळाला होता. मात्र यावेळी भाजपला येथे फक्त 49 ते 58 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर या भागात सपा चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे. येथे सपाला 39 ते 45 जागांवर विजय मिळू शकतो. मागील निवडणुकीत सपाला या भागात 12 जागा मिळाल्या होत्या.

रुहेलखंड कोण सरस ठरणार ?

नवभारत टाईम्सच्या सर्व्हेनुसार रुहेलखंड या भागात भाजपला 30 ते 36 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे सपाला 17 ते 18 जागा, बसपाला 1 किंवा दोन जागा तर काँग्रेसला फक्त एक सीट मिळण्याची शक्यता आहे.

बुंदेलखंडमध्ये भाजपला कौल ?

बुंदेलखंड या भागात एकूण 19 जागा आहेत. यापैकी भाजप 14 ते 15 जागांवर विजय मिळवण्याची शक्यता आहे. तर सपाला 3 ते 5 आणि बसपाला एक जागा मिळू शकते.

मध्य उत्तर प्रदेशमध्ये कोणाची आघाडी ?   

सेंट्रल उत्तर प्रदेशमध्ये 35 जागांवर सर्व्हे करण्यात आला होता. येथे भाजपला 17 ते 21 जागा मिळू शकतात. तर सपाला 12 ते 13 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजप आणि बसपा यांच्या खात्यात एक एक जागा जाण्याची शक्यता आहे.

तसेच अवध भागात 98 जागा आहेत. पैकी 57 ते 65 जागांवर भाजपचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. तर समाजवादी पार्टीला 31 ते 33 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या खात्यात दोन ते तीन तसेच बसपाकडे तीन जागा जाण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या :

Mumbai Bank Election | मुंबई जिल्हा बँकेच्या चार जागांसाठी आज निवडणूक, पोलिसांचा चोख बंदोबस्त

नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच नवाब मलिक आक्रमक, आरोपांची मालिका कायम राहणार?

Breaking : पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण! मुंबईतील निवासस्थानी क्वारंटाईन

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.