उत्तर प्रदेश – युपीच्या (UP) राजकारणात रोज नवे राजकीय बॉम्ब फुटत असल्याचे आपण पाहतोय, त्यामध्ये भाजपच्या (BJP) आमदारांचं बंड, समाजवादी पक्षाच्या नेत्यांचं भाजप प्रवेश अशा अनेक गोष्टींनी युपीतलं राजकारण तापलं आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वड्रा (PRIYANKA GANDI VADRA) यांनी शनिवारी सकाळी एक राजकीय बॉम्ब फोडला असून त्याची देशात चर्चा सुरू आहे. काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? असं विचारल्यानंतर त्यांनी मीच तर सगळीकडे दिसतेय ! असं वक्तव्य केल्यानं राजकारणाची चर्चा संपुर्ण देशभर सुरू आहे.
LIVE: Shri @RahulGandhi and Smt. @priyankagandhi launch UP’s Youth Manifesto, at the AICC HQ.#कांग्रेस_का_भर्ती_विधान https://t.co/lNvavso7fH
— Congress (@INCIndia) January 21, 2022
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वड्रा यांनी युपीच्या तरूणांसाठी रोजगार निर्मिती योजनांची रूपरेषा देणारा जाहीरनामा प्रसिध्द केला आहे. प्रत्येक पक्षाकडून निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन लोकांना आश्वासने दिली आहेत. पण तिथं अधिक चुरस वाढल्याने नेमकं विजय कोणाचा होईल याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. तिथल्या कार्यक्रमात त्यांना एक प्रश्न विचारण्यात त्यांचं उत्तर देताना त्या सगळीकडे मीच तर दिसतेय ! असं म्हणाल्या आहेत.
आत्तापर्यंत प्रियांका गांधी यांना युपीत कुठेही उमेदवारी जाहीर केलेली नाही. तसेच त्यांना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर युपीत विधानसभेसाठी निवडणुक लढवावी लागेल. त्यामुळे येत्या काही दिवसात हे स्पष्ट होईल की, प्रियांका गांधी यांना खरचं मुख्यमंत्री व्हायचं आहे किंवा त्यांनी निवडणुक डोळ्यासमोर असं वक्तव्य केलं आहे.
अखिलेश यादव किंवा योगी आदित्यनाथ यांनी कधीही निवडणुक लढवलेली नाही. ते यंदाची विधानसभा निवडणुक लढवत आहेत. त्यामुळे प्रियांका गांधी या खरचं निवडणुक लढणार का ? यावर उद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाही.