AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uttar Pradesh Assembly Election Voting 2022 Live Streaming: : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उद्या मतदान; येथे जाणून घ्या प्रत्येक अपडेट

पहिल्या टप्प्यात पश्चिम उत्तर प्रदेशातील 9 जिल्ह्यातील 58 जागांसाठी मतदान होणार आहे. या टप्प्यात एकूण 623 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. या निवडणुकीत मुख्य लढाई ही भाजप विरुद्ध समाजवादी पार्टी अशीच असणार आहे. तर बसपा आणि काँग्रेससह अन्य राजकीय पक्षही काही जागांवर मजबूत स्थितीत दिसून येत असल्याचा अंदाज आहे.

Uttar Pradesh Assembly Election Voting 2022 Live Streaming: : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उद्या मतदान; येथे जाणून घ्या प्रत्येक अपडेट
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 7:05 PM

मुंबई : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक (Uttar Pradesh Assembly Elections) एकूण 7 टप्प्यात होणार आहे. या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान उद्या म्हणजेच 10 फेब्रुवारीला होणार आहे. पहिल्या टप्प्यात पश्चिम उत्तर प्रदेशातील (West Uttar Pradesh) 9 जिल्ह्यातील 58 जागांसाठी मतदान होणार आहे. या टप्प्यात एकूण 623 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. या निवडणुकीत मुख्य लढाई ही भाजप (BJP) विरुद्ध समाजवादी पार्टी (Samajwadi Party)अशीच असणार आहे. तर बसपा आणि काँग्रेससह अन्य राजकीय पक्षही काही जागांवर मजबूत स्थितीत दिसून येत असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे अनेक जागांवर त्रिशंकू लढत होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

पहिल्या टप्प्यात 623 उमेदवारांना 15 निरक्षर

पहिल्या टप्प्यातील उमेदवारांबाबत एडीआरने काही दिवसांपूर्वीच एक अहवाल सादर केला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात निवडणूक लढवणाऱ्या 623 उमेदवारांपैकी 15 उमेदवार निरक्षर आहेत. तर 58 उमेदवार हे केवळ साक्षर आहेत. 10 उमेदवार असे आहेत ज्यांनी केवळ 5 वी पर्यंतचंच शिक्षण घेतलं आहे, तर 62 उमेदवारांनी 8वी पर्यंतचं, 65 उमेदवारांनी 10 वी पर्यंतचं आणि 102 उमेदवारांनी 12वी पर्यंतचं शिक्षण घेतलं आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती जागांसाठी उद्या मतदान?

मुजफ्फरनगर – 6 शामली – 3 मेरठ – 7 बागपत – 3 गाजियाबाद – 5 हापुड – 3 गौतमबुद्ध नगर – 3 बुलंदशहर – 7 अलीगड – 7

मतदानाची प्रत्येक अपडेट कशी पाहाल?

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उद्या मतदान होणार आहे. या मतदानाची तासा तासाची टक्केवारी तुम्ही tv9marathi.com वर पाहू शकणार आहात. तसंच मतदान काळात उत्तर प्रदेशातील प्रत्येक राजकीय अपडेटही तुम्ही या ठिकाणी वाचू शकणार आहात. त्यासोबतच मतदानाची प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी तुम्ही tv9 Marathi च्या यूट्युब चॅनेलवरही लाईव्ह पाहू शकणार आहेत.

इतर बातम्या :

10 दिवसांच्या आत शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करु, प्रियंका गांधींची मोठी घोषणा, जाहीरनाम्यात आणखी काय?

VIDEO: अगर काँग्रेस ना होती तो.. PM नरेंद्र मोदींनी सभागृहात पाढा वाचला, काँग्रेसच्या जखमेवर मीठ, प्रचंड गदारोळ

भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही.
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्...
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्....
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?.
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय.
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब.
मोठी बातमी, भारत-पाकच्या DGMO च्या चर्चेची वेळी बदलली, आता कधी चर्चा?
मोठी बातमी, भारत-पाकच्या DGMO च्या चर्चेची वेळी बदलली, आता कधी चर्चा?.
भारताच्या हल्लावेळी गायब झालेला असीम मुनिर कुठे होता?
भारताच्या हल्लावेळी गायब झालेला असीम मुनिर कुठे होता?.
या पुढची लढाई झाली तर.. ; भारतीय सैन्य दलांचा थेट इशारा
या पुढची लढाई झाली तर.. ; भारतीय सैन्य दलांचा थेट इशारा.
पाकिस्तानला तीव्र भूकंपाचा धक्का, आठवड्यात तिसऱ्यांदा पाक हादरलं
पाकिस्तानला तीव्र भूकंपाचा धक्का, आठवड्यात तिसऱ्यांदा पाक हादरलं.
इशारा ही काफी है... भारत पुढील मिशनसाठी सज्ज, बघा 10 महत्त्वाचे मुद्दे
इशारा ही काफी है... भारत पुढील मिशनसाठी सज्ज, बघा 10 महत्त्वाचे मुद्दे.