Uttarakhand Election Exit Poll Result 2022: उत्तराखंडमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरस, कोण जिंकणार बाजी ?
उत्तराखंडमधील 70 विधानसभा जागांसाठी TV9 भारतवर्ष/पोलस्ट्रॅट एक्झिट पोलचे ट्रेंड समोर आले आहेत. यामध्ये भाजपला 31-33 तर काँग्रेसला 33-35 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर आम आदमी पार्टीला 0-3 जागा आणि इतरांना 0-2 जागा मिळू शकतात.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानासोबतच 5 राज्यांचे मतदान पूर्ण झाले आहे. आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. उत्तराखंडसह सर्व 5 राज्यांची मतमोजणी 10 मार्च रोजी होणार आहे. याआधी, एक्झिट पोल (Exit Poll)च्या माध्यमातून आम्ही तुम्हाला निकालापूर्वीचे ट्रेंड दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. उत्तराखंडमधील 70 जागांसाठी 14 फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. राज्यातील 632 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद झाले आहे. बहुतांश जागांवर सत्ताधारी भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) यांच्यात चुरशीची शक्यता आहे. तथापि, आम आदमी पक्षाने (आप) देखील सर्व 70 जागांवर उमेदवार उभे करून अनेक जागांवर तिरंगी लढत करण्याचा प्रयत्न केला आहे. (Who will establish power in Uttarakhand, know the exit polls numbers)
TV9 पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलनुसार भाजपला 31-33 मते मिळणार आहेत. दुसरीकडे, काँग्रेसला 33-35 जागा मिळतील. तर इतरांना 2 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. उत्तराखंडमधील 70 विधानसभा जागांसाठी TV9 भारतवर्ष/पोलस्ट्रॅट एक्झिट पोलचे ट्रेंड समोर आले आहेत. यामध्ये भाजपला 31-33 तर काँग्रेसला 33-35 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर आम आदमी पार्टीला 0-3 जागा आणि इतरांना 0-2 जागा मिळू शकतात.
उत्तराखंडमध्ये कुणाला किती जागा ?
एबीपी-सी वोटरच्या पोलनुसार काँग्रेस सर्वात मोठा पक्ष
एबीपी-सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार, सत्ताधारी पक्षाला 26-32 जागा मिळतील. तर दुसरीकडे काँग्रेसला 32-38 जागा मिळताना दिसत आहेत. तर आम आदमी पक्षाला 2 जागा आणि इतरांना 3-7 जागा मिळू शकतात. अशा परिस्थितीत एबीपी-सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार राज्यात काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळू शकते. मात्र भाजपही बहुमतापासून दूर नसल्याने येथेही अन्य उमेदवारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
टाईम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार भाजप पुन्हा सरकार स्थापन करणार
टाईम्स नाऊच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला 37 जागा मिळू शकतात. दुसरीकडे, काँग्रेसला 31 जागा मिळू शकतात. तसेच आम आदमी पक्षाच्या कोर्टात एक जागा जाऊ शकते. तर इतरांना जागा मिळत नाही. टाईम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार राज्यात पुन्हा भाजपचे सरकार स्थापन होणार आहे. त्याचबरोबर काँग्रेसच्या जागाही वाढणार आहेत. आम आदमी पक्षाला फक्त आपले खाते उघडता येणार आहे. (Who will establish power in Uttarakhand, know the exit polls numbers)
इतर बातम्या