बंगालमध्ये M फॅक्टरचीच लढाई; भाजपच्या ‘जय श्रीराम’च्या नाऱ्याविरोधात दीदीचे स्पेशल ’42 M’ वाचा स्पेशल रिपोर्ट

श्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच तृणमूल सुप्रिमो आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 294 पैकी 291 जागांवरील उमदेवारांची नावे घोषित केली आहे. (West Bengal Election 2021: Mamata Banerjee To Contest From Nandigram, List For 291 Seats Announced)

बंगालमध्ये M फॅक्टरचीच लढाई; भाजपच्या 'जय श्रीराम'च्या नाऱ्याविरोधात दीदीचे स्पेशल '42 M' वाचा स्पेशल रिपोर्ट
ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल
Follow us
| Updated on: Mar 05, 2021 | 3:14 PM

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच तृणमूल सुप्रिमो आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 294 पैकी 291 जागांवरील उमदेवारांची नावे घोषित केली आहे. ममता बॅनर्जी यांनी तिकीट वाटप जाहीर करताना त्यांनी स्वत:चा मतदारसंघ बदलला असून त्या नंदिग्राममधून निवडणूक लढणार आहेत. ममता बॅनर्जी यांनी भाजपला ललकारण्यासाठीच नंदिग्रामची निवड केल्याचं बोललं जात आहे. या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी 42 मुस्लिम उमदेवारांना तिकीट दिलं आहे. त्यामुळे बंगालमध्ये एम फॅक्टरच चालणार असल्याचं चित्रं आहे. (West Bengal Election 2021: Mamata Banerjee To Contest From Nandigram, List For 291 Seats Announced)

ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेऊन आज केवळ तीन जागा वगळता सर्व जागांवरील उमेदवारांची नावे घोषित करून उमेदवारी जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे. ममता बॅनर्जी यांनी कालिपांग, दार्जिलिंग और कार्सियांग या तीन जागा मित्रपक्षांसाठी सोडल्या आहेत.

‘जय श्रीराम’ नाऱ्याविरोधात स्पेशल ‘एम 42’

पश्चिम बंगालमध्ये भाजपने दमदार एन्ट्री केली आहे. भाजपने जय श्रीरामच्या घोषणा देऊन धार्मिक ध्रुवीकरण केलं आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी एका मंचावर आले असता ममता बॅनर्जी भाषणाला उभ्या राहताच जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. त्यामुळे भाजपच्या या धार्मिक ध्रुवीकरणाला छेद देण्यासाठी त्यांनी थेट 42 मुस्लिमांना तिकिट देऊन भाजपची कोंडी केली आहे. त्यामुळे जय श्रीरामचं जलवा चालणार की ममता दीदींचे स्पेशल ’42 M’ करिष्मा घडवणार? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

रणरागिणी आणि सोशल इंजीनियरिंग

ममता बॅनर्जी यांनी केवळ मुस्लिमांनाच उमदेवारी दिली नाही. तर सोशल इंजीनियरिंगवरही भर दिला आहे. त्यांनी 50 महिलांना, 42 मुस्लिमांना, 79 अनुसूचित जाती आणि 17 अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना तिकिट दिलं आहे.

दीदीच्या मतदारसंघातून कोण?

ममता बॅनर्जी यांचा भवानीपूर हा पारंपारिक मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून आता सोवानदेव चटर्जी यांना तिकीट दिलं जाणार आहे.

27 जणांचे तिकीट कापलं

यावेळी ममता बॅनर्जी यांनी 27 जणांचे तिकीट कापलं आहे. तब्येत खराब असल्याने अर्थमंत्री अमित मित्रा निवडणूक लढणार नाहीत. पुर्णेंदू बसूही निवडणूक लढणार नाहीत. तर पार्थो चटोपाध्याय यांनाही तिकीट नाकारण्यात आलं आहे. तसेच 80 वर्षांवरील नेत्यांना तिकीट देण्यात येणार नसल्याचंही त्यांनी आधीच जाहीर केलं आहे. त्यामुळे 80 वर्षांवरील सर्वच नेत्यांची तिकिट कापण्यात आले आहेत.

‘खेला होबे, देखा होबे, जीता होबे’

उमदेवारांची यादी जारी करतानाच टीएमसीचा मोठा विजय होणार असल्याचा दावाही ममता बॅनर्जी यांनी केला. या निवडणुकीत खेला होबे, देखा होबे, जीता होबे (आम्ही खेळणार, लढणार आणि आम्ही जिंकणार) असं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी भाजपने निवडणुकीत पैशाचा भरमसाठ वापर सुरू केल्याचा आरोप केला आहे.

सिने कलाकार, क्रिकेटपटूही मैदानात

ममता बॅनर्जी यांनी भाजपला जशास तसे उत्तर देण्यासाठी काहीही कसर सोडलेली नाही. त्यांनी सिने कलाकारांनाही तिकिट देऊन भाजपची डोकेदुखी वाढवली आहे. बांकुरा येथून अभिनेत्री सायानतिका, उत्तरपाड्यातून कांचन मलिक, शिबपूरमधून क्रिकेटपटू मनोज तिवारी, तर राजरहाटमधून गायिका आदिती मुंशी आणि नॉर्थ दमदममधून चंद्रीमा भट्टाचार्य यांनी तिकिट देण्यात आलं आहे. या शिवाय

या कलाकारांना तिकिट

>> जून मालिया – मिदनापूर (अभिनेत्री) >> मनोज तिवारी – शिबपूर (क्रिकेटर) >> इदरिस अली – मुर्शिदाबाद >> राज चक्रवर्ती – बैरकपूर (डायरेक्टर) >> सयंतिका बनर्जी – बांकुरा (अभिनेत्री) >> कंचन मलिक – उत्तरपाड़ा (अभिनेत्री) >> शोभानदेब चट्टोपाध्याय – भवानीपूर >> अदिती मुंशी – राजरहाट (सिंगर) >> सयोनी घोष – आसनसोल साउथ (अभिनेत्री) >> कौशनी मुखर्जी – कृष्णानगर उत्तर (अभिनेत्री) >> सोहम चक्रवर्ती – चांदीपूर (अभिनेता)

नंदीग्राममधून लढणार

ममता बॅनर्जी यांचे एकेकाळचे सहकारी शुभेंद्रू अधिकारी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. नंदीग्राम हा शुभेंद्रू यांचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या एका दशकापासून नंदीग्रामची सीट टीएमसीकडे आहे. परंतु शुभेंद्रू यांनी टीएमसीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर हा गडही भाजपकडे जाणार की काय? असा सवाल केला जात होता. त्यामुळेच ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममधून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. नंदीग्राममधील 40 ते 45 जागांवर शुभेंद्रू यांचा प्रभाव आहे. त्यांचा हा प्रभाव कमी करण्यासाठी आणि टीएमसीचे बालेकिल्ले मजबूत करण्यासाठीच ममतादीदींनी नंदीग्रामची निवड केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

नंदीग्रामचं महत्त्व काय?

नंदिग्राममध्ये 2007 मध्ये सर्वात उग्र आंदोलन झालं होतं. जमीन अधिग्रहणाविरोधात आंदोलन करुन, ममता बॅनर्जींनी डाव्यांचं सरकार हद्दपार करुन सत्तेत आल्या होत्या. 2007 मध्ये तत्कालिन बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या नेतृत्त्वातील सरकारने जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरु केली होती. बुद्धदेव भट्टाचार्य सरकारने सलीम ग्रुपला ‘स्पेशल इकॉनॉमिक झोन’ म्हणून नंदिग्राममध्ये एक केमिकल फॅक्टरी उभी करण्यास मान्यता दिली होती. याविरोधात बंगालमध्ये रान उठलं होतं.

ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला होता. तृणमूलने विरोधी पक्षांची मोट बांधून सरकारविरोधात पवित्रा घेत आंदोलन केलं. या आंदोलनाचं नेतृत्त्व तत्कालीन विरोधी पक्षनेत्या ममता बॅनर्जी यांनी केलं होतं. तर या आंदोलनाचे नायक होते शुभेंदू अधिकारी. 2007 मधील या आंदोलना दरम्यान 14 जणांचा जीव गेला होता. तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी हे आंदोलन औद्योगिकीकरणाच्या विरोधात असल्याचं म्हटलं होतं. हल्दियाचे तत्कालीन खासदार लक्ष्मण सेठ यांच्या नेतृत्वातील ‘हल्दिया डेवलपमेंट अथॉरिटी’ने भूमी अधिग्रहणासाठी नोटीस जारी केल्यानंतर परिस्थिती आणखी चिघळली होती. त्यामुळे CPI (M) आणि विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसक संघर्ष झाला. 14 मार्च 2007 रोजी या संघर्षादरम्यान जवळपास 14 जणांची हत्या झाली होती.

नंदिग्राम आंदोलनानंतर डाव्यांची सत्ता उलथली

नंदिग्राममध्ये झालेल्या आंदोलनानंतर लगेचच डाव्यांची सत्ता उलथवण्यात ममता बॅनर्जींना यश आलं. ममतांच्या नेतृत्त्वातील या आंदोलनात बंगालमधील लेखक, कलाकार, कवी, शिक्षकांसह सर्वसामान्य जनता सहभागी झाली होती. त्यावेळी सर्वांनी जमीन अधिग्रहणाला कडाडून विरोध केला होता. या आंदोलनाने ममता बॅनर्जी यांना सर्वसामान्यांमध्ये नवी ओळख निर्माण करुन दिली. त्याचा परिणाम म्हणून 2011 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत, तब्बल 34 वर्ष सत्तेत असलेल्या डाव्यांना पायउतार व्हावं लागलं. ममतांनी घातलेली मां, माटी, मानुषची साद बंगालवासियांनी ऐकली आणि त्यांच्याकडे सत्तेच्या चाव्या दिल्या. (West Bengal Election 2021: Mamata Banerjee To Contest From Nandigram, List For 291 Seats Announced)

पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यात मतदान

पहिला टप्पा – 27 मार्च, 30 जागा दुसरा टप्पा – 1 एप्रिल, 20 जागा तीसरा टप्पा – 6 एप्रिल, 31 जागा चौथा टप्पा – 10 एप्रिल, 44 जागा पाचवा टप्पा – 17 एप्रिल, 45 जागा सहावा टप्पा – 22 एप्रिल, 43 जागा सातवा टप्पा – 26 एप्रिल, 36 जागा आठवा टप्पा – 29 एप्रिल, 25 जागा मतमोजणी आणि निकाल – 2 मे रोजी

बंगालमधील पक्षीय बलाबल (2016)

तृणमूल काँग्रेस -219 काँग्रेस -23 डावे – 19 भाजप – 16 एकूण – 294

संबंधित बातम्या:

आसाममध्ये भाजपचा युतीचा फॉर्म्युला ठरला; वाचा भाजप किती जागांवर लढणार

पुद्दुचेरीत शिवसेनेच्या भूमिकेत एनआर काँग्रेस, भाजपा चेकमेट?

पश्चिम बंगाल विधानसभेच्या उमेदवारांबाबत भाजपचं मंथन सुरु, ममता बॅनर्जींविरोधात भाजपकडून कोणता चेहरा?

(West Bengal Election 2021: Mamata Banerjee To Contest From Nandigram, List For 291 Seats Announced)

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....