West Bengal Election Results 2021: ममता बॅनर्जींना नंदीग्राममध्ये पराभवाचा धक्का?; तृणमूल म्हणते, अफवा पसरवू नका

| Updated on: May 02, 2021 | 6:57 PM

पश्चिम बंगालमधील बहुचर्चित नंदीग्राम मतदारसंघातून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला आहे. (Suvendu Adhikari beats Mamata Banerjee, wins Nandigram by 1622 votes)

West Bengal Election Results 2021: ममता बॅनर्जींना नंदीग्राममध्ये पराभवाचा धक्का?; तृणमूल म्हणते, अफवा पसरवू नका
Mamata banerjee
Follow us on

कोलकाता: पश्चिम बंगालमधील बहुचर्चित नंदीग्राम मतदारसंघातून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला आहे. अटीतटीच्या लढतीत भाजपचे उमेदवार शुभेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जींचा अगदी थोडक्या मतांनी पराभव केला असल्याचं वृत्त आहे. तर अजून मतमोजणी सुरू असून कुणीही अफवा पसरवू नये, असं आवाहन तृणमूलने केलं आहे. त्यामुळे ममता बॅनर्जींच्या विजयाचं सस्पेन्स वाढलं आहे. (Suvendu Adhikari beats Mamata Banerjee, wins Nandigram by 1622 votes)

सकाळी मतमोजणी सुरू झाली तेव्हापासून शुभेंदू अधिकारी नंदीग्राममध्ये आघाडीवर होते. त्यानंतर दुपारी ममता बॅनर्जी यांनी आघाडी घेतली होती. कधी ममता बॅनर्जी तर कधी अधिकारी आघाडीवर असल्याचं वृत्त येत होतं. त्यानंतर काही वेळापूर्वीच ममता बॅनर्जी यांचा विजय झाल्याची बातमी आली. ममता बॅनर्जी यांनी 1200 मतांनी विजय मिळवला असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांच्या कालीघाट येथील निवासस्थानसमोर ममता बॅनर्जी यांच्या समर्थकांनी प्रचंड जल्लोष केला होता. नंदीग्राममधील मतमोजणी संपल्याचं वाटत असतानाच थोड्यावेळापूर्वी ममता बॅनर्जी यांचा पराभव झाल्याची बातमी येऊन धडकली. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

दीदींना म्हणाल्या…

ममता बॅनर्जी यांचा 1622 मतांनी पराभव झाला आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार शुभेंदू अधिकारी विजयी झाल्याचं वृत्त आहे. या वृत्तावर ममता बॅनर्जी यांनी भाष्य केलं आहे. नंदीग्रामबाबत चिंता करू नका. मी नंदीग्रामसाठी संघर्ष केला आहे. जनता जो निर्णय देईल, तो मान्य असेल, असं त्यांनी म्हटलं आहे.

अफवा पसरवू नका

दरम्यान, मतमोजणीची प्रक्रिया सुरू आहे. नंदीग्रामचा निकाल जाहीर झालेला नाही. त्यामुळे कुणीही अफवा पसरवू नये, असं ट्विट तृणमूल काँग्रेसने केलं आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी विजयी झाल्या की पराभूत झाल्या? याबाबतचं सस्पेन्स वाढलं आहे.

शपथविधी साधेपणाने

दरम्यान, ममता दीदींनी मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. कोरोना हे आपलं पहिलं प्राधान्य असल्याचं त्यांनी सांगितलं. (Suvendu Adhikari beats Mamata Banerjee, wins Nandigram by 1622 votes)

 

संबंधित बातम्या:

West Bengal Election Results 2021 LIVE: अफवा पसरवू नका, मतमोजणी सुरु, ममता बॅनर्जींच्या पराभवाच्या बातम्यांवर टीएमसीचं स्पष्टीकरण

2021 Vidhan Sabha Election Results LIVE : नंंदीग्राममधून ममता दीदींचा पराभव, सुवेंदू अधिकारी विजयी

Belgaum Election Result 2021 LIVE | भाजपच्या मंगला अंगडी विजयी, काँग्रेसच्या सतीश जारकीहोळी यांचा 1622 मतांनी पराभव

(Suvendu Adhikari beats Mamata Banerjee, wins Nandigram by 1622 votes)