भाजप: बंगालमध्ये मोठी मुसंडी, आसाममध्ये सत्ता राखली, पुद्दुचेरीत सत्तेत, तामिळनाडू, केरळात फाईट; नॉट बॅड

भाजपसाठी आजचा दिवस दिग्विजयी आनंदाचा नसला तरी नैराश्याचाही नाही. कारण भाजपने बंगालमध्ये सत्ता मिळवली नसली तरी मोठी मुसंडी मारली आहे. (five states election results, analysis of bjp's Success and failure)

भाजप: बंगालमध्ये मोठी मुसंडी, आसाममध्ये सत्ता राखली, पुद्दुचेरीत सत्तेत, तामिळनाडू, केरळात फाईट; नॉट बॅड
पाच राज्यांचा निवडणूक निकाल
Follow us
| Updated on: May 02, 2021 | 1:13 PM

कोलकाता: भाजपसाठी आजचा दिवस दिग्विजयी आनंदाचा नसला तरी नैराश्याचाही नाही. कारण भाजपने बंगालमध्ये सत्ता मिळवली नसली तरी मोठी मुसंडी मारली आहे. आसाममध्ये सत्ता राखण्यात यश मिळवलं आहे. पुद्दुचेरीत सत्ता आली आहे. तामिळनाडूत जोरदार टक्कर दिली आहे. तर केरळात अस्तित्व निर्माण केलं आहे. त्यामुळे भाजपसाठी आजचा दिवस नैराश्याचा नसल्याचं दिसून आलं आहे. (five states election results, analysis of bjp’s Success and failure)

पश्चिम बंगालमध्ये सत्ता नाही, पण हनुमान उडी

पश्चिम बंगालमधील 292 जागांपैकी 284 जागांचे कल हाती आले आहेत. यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने 202 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपने 77 जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे बंगालमध्ये सत्ता परिवर्तन करण्याचं भाजपचं स्वप्न भंगलं आहे. मात्र असं असलं तरी 2016च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला बंगालमध्ये अवघ्या तीन जागा मिळाल्या होत्या. त्या तुलनेत भाजपने 77 जागांवर घेतलेली उडी ही भाजपसाठी हनुमान उडी ठरली आहे. भाजपच्या या प्रचंड यशामुळे ममता बॅनर्जींसमोरही आव्हान निर्माण झालं आहे. काहीच अस्तित्व नसतानाही एखाद्या राज्यात भाजप मुसंडी मारू शकतो, हेच या निवडणुकीतून भाजपने दाखवून दिलं आहे. निवडणुकीचं अचूक नियोजन, टीमवर्क आणि जनमताची नाडी ओळखून केलेला प्रचार या बळावर भाजपला एवढं मोठं यश मिळाल्याचं बोललं जात आहे.

केरळमध्ये एकाच जागेचा फायदा?

केरळमध्ये भाजपला फारसं यश आलेलं नाही. केरळमध्ये गेल्यावेळी भाजपचा एक आमदार होता. यावेळी भाजप दोन जागांवर आघाडीवर आहे. केरळमध्ये भाजपने मेट्रो मॅन ई. श्रीधरन यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केलं होतं. श्रीधरन या निवडणुकीत आघाडीवर आहेत. मात्र, ते भाजपला दोन अंकी संख्येपर्यंतही पोहोचू शकले नसल्याचं दिसून आलं आहे. मल्याळी अभिनेते मोहनलालसह अनेक सेलिब्रिटींनी श्रीधरन यांना पाठिंबा दर्शविला होता. त्याचा फायदा श्रीधरन यांना वैयक्तिक होताना दिसत असल्याचं चित्रं आहे. दरम्यान, केरळमध्ये सत्तेतील पक्षाला येथील मतदार दुसऱ्यांदा संधी देत नाही. मात्र, पहिल्यांदाच सत्तेतील डाव्या पक्षांना केरळच्या जनतेने कौल दिल्याचं दिसून आलं आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी वादळ, ओला दुष्काळ आणि कोरोनाच्या संकटात प्रचंड चांगलं काम केलं. देशभरात त्यांच्या कामाचं कौतुक झालं. त्यामुळेही त्यांना केरळच्या जनतेने पुन्हा संधी दिल्याचं बोललं जात आहे.

तामिळनाडूत केवळ तीन जागांवर आघाडी

तामिळनाडूतही भाजपला फारसा करिश्मा करता आलेला नाही. तामिळनाडूत भाजपने एआयएडीएमकेसोबत युती केली होती. सत्ताधारी पक्षासोबत युती करून 10-15 जागा जिंकून सत्तेत येण्याचा भाजपचा प्रयत्न होता. मात्र, मतदारांनी एआयएडीएमके आघाडीला साफ नाकारलं असून डीएमकेच्या पारड्यात कौल दिला आहे. तामिळनाडूत डीएमकेला 140 आणि एआयएडीएमकेला अवघ्या 89 जागा मिळताना दिसत आहेत. तर भाजपला तीन जागांवर आघाडी मिळालेली दिसत आहे. तामिळनाडूत नेहमीच सेलिब्रिटींच्या बाजूने कौल असतो. परंतु या निवडणुकीत येथील जनतेने सेलिब्रिटींनाही नाकारले आहे. अभिनेते कमल हसन यांची ही पहिलीच निवडणूक होती. त्यांनाही तामिळनाडूतील जनतेने नाकारलेलं दिसत आहे.

आसाम राखले

भाजपला आसाममध्ये सत्ता राखण्यात यश मिळाले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या आसाममध्ये तळ ठोकून होते. या दोघांनीही आसाममध्येच प्रचार केला. आसामची निवडणूक संपल्यावर राहुल गांधी हे बंगालमध्ये गेले होते. चहाच्या मळ्यातील कामगार आणि कोळी लोकांशी राहुल आणि प्रियंका यांनी संवाद साधला होता. त्यामुळे आसाममध्ये काँग्रेस सत्ता परिवर्तन करू शकेल असं वाटत होतं. तर भाजपकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आसामची सूत्रे हाती घेतली होती. यावेळी त्यांनी राहुल गांधींना टार्गेट केलं होतं. आसाममध्ये भाजप आघाडी 77 तर काँग्रेस आघाडी 49 जागांवर आघाडीवर आहे. भाजपने सुरुवातीपासूनच काँग्रेसवर 20 जागांवर आघाडी घेतली आहे. हे चित्रं असंच राहिल्यास आसाममध्ये भाजपची सत्ता कायम राहण्याचे संकेत मिळत आहेत.

पुद्दुचेरीत सत्ता परिवर्तन

पुद्दुचेरीत भाजपला सत्ता परिवर्तन घडवण्यात यश आलं आहे. पुद्दुचेरीत काँग्रेसची सत्ता होती. मात्र, या ठिकाणी भाजपने चांगली कामगिरी केल्याचं दिसत आहे. पुद्दुचेरीत भाजप आघाडीला 17 आणि काँग्रेसला 11 जागा मिळताना दिसत आहे. या ठिकाणी काँग्रेसला चार जागांचं नुकसान होताना दिसत आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला 15 जागा मिळाल्या होत्या. मात्र, एकंदरीत या पाचही राज्यांचे निकाल पाहता भाजपची परिस्थिती अगदीच वाईट आहे, असं म्हणता येणार नसल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. (five states election results, analysis of bjp’s Success and failure)

संबंधित बातम्या:

2021 Vidhan Sabha Election Results LIVE : तामिळनाडूत द्रमुक आघाडीवर, केरळात डावे पुन्हा सत्तेत?

Belgaum Election Result 2021 LIVE | मंगला अंगडींचे मताधिक्य घटते, सतीश जारकीहोळी पुन्हा आघाडी घेण्याची शक्यता

West Bengal Election Results 2021 LIVE: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींपुढे मोदी-शाहांचा करिष्मा फेल, तृणमूल काँग्रेसला 203 जागांवर आघाडी

(five states election results, analysis of bjp’s Success and failure)

'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.