ममता बॅनर्जींनी फोन करून नंदीग्राममध्ये मदत मागितली; भाजप नेत्याचा मोठा दावा
पश्चिम बंगालमध्ये आज पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. (Mamata Banerjee called me asking for help in Nandigram, claims Suvendu aide)
कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये आज पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. निवडणुकीची ही रणधुमाळी सुरू असतानाच भाजप नेते प्रलय पाल यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्याला फोन करून नंदीग्राममधील विजयासाठी मदत मागितली असल्याचा दावा प्रलय पाल यांनी केला आहे. पाल यांच्या या दाव्याने बंगालच्या राजकारणात चांगलाच खळबळ उडाली आहे. (Mamata Banerjee called me asking for help in Nandigram, claims Suvendu aide)
ममता बॅनर्जी या नंदीग्राममधून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे विद्यमान आमदार शुभेंद्रू अधिकारी लढत आहेत. त्यामुळे ही लढत प्रचंड चुरशीची होणार असल्याने त्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. नंदीग्राममधील प्रचारही शिगेला पोहोचलेला असतानाच प्रलय पाल यांनी हा गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली आहे. शनिवारी सकाळी ममता बॅनर्जी यांनी मला फोन केला होता. नंदीग्राममध्ये मदत करण्याची विनंती त्यांनी केली होती, असं पाल यांनी म्हटलं आहे. या संभाषणाची ऑडिओ क्लिपही भाजपने व्हायरल केली आहे. तर ऑडिओ क्लिपमधील आवाज व्हेरिफाईड नसल्याचं टीएमसीने म्हटलं आहे.
तेव्हा अधिकारी कुटुंबच होतं
मी त्यांच्यासाठी काम करावं आणि टीएमसीमध्ये प्रवेश करावा असं ममता बॅनर्जींचं म्हणणं होतं. परंतु मी गेल्या अनेक वर्षांपासून शुभेंदू अधिकारी यांच्या कुटुंबासोबत आहे. आता मी भाजपसाठी काम करत आहे. डाव्यांच्या सत्तेच्या काळात अत्याचार वाढले होते. तेव्हा नंदीग्रामच्या जनतेच्यापाठी केवळ अधिकारी कुटुंबच उभं राहिलं होतं. मी कधीच अधिकारी कुटुंबाच्या विरोधात गेलो नाही आणि यापुढेही कधी अशी हिंमत करणार नाही, असं त्यांनी सांगितलं.
भाजपची सेवा करणार
नंदीग्राममधील लोकांना टीएमसीने कधीच त्यांचा अधिकार मिळवून दिला नाही. त्यामुळे मी भाजपची सेवा करत राहणार आहे, असं ममता दीदींना सांगितल्याचंही पाल म्हणाले. अधिकारी निवडून यावेत म्हणून आम्ही जीवाचं रान करू असंही त्यांनी सांगितलं.
मालवीय यांचा टोला
या प्रकरणावर भाजपचे नेते अमित मालवीय यांनी ट्विट केलं आहे. ममता बॅनर्जी यांनी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रलय पाल यांना फोन करून मदत मागितली आहे. पाल यांना टीएमसीमध्ये अपमानित करण्यात आलं होतं. त्यामुळे ते कुटुंबासह भाजपला कधीच धोका देणार नाहीत. या सर्व प्रकारामुळे ममता बॅनर्जी नंदीग्राममधून पराभूत होणार हे निश्चित झालं आहे, असं मालवीय यांनी म्हटलं आहे. (Mamata Banerjee called me asking for help in Nandigram, claims Suvendu aide)
VIDEO : SuperFast 100 News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 27 March 2021https://t.co/8X5Dx7UZLT
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 27, 2021
संबंधित बातमी:
आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान; दिग्गजांचे भविष्य मतपेटीत बंद होणार
पश्चिम बंगालच्या रणधुमाळीतून गांधी कुटुंब दूर का?; भाजपला रोखण्यासाठी खेळी?
(Mamata Banerjee called me asking for help in Nandigram, claims Suvendu aide)