बाबुल सुप्रियोंसह चार खासदारांना विधानसभेचं तिकीट; बंगाल सर करण्यासाठी भाजपची खेळी!
बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये टीएमसीला शह देण्यासाठी भाजपने नवीच खेळी खेळली आहे. (Minister Babul Supriyo, BJP MP Locket Chatterjee Drafted For Bengal Polls)
कोलकाता: बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये टीएमसीला शह देण्यासाठी भाजपने नवीच खेळी खेळली आहे. भाजपने थेट केंद्रीय मंत्री आणि खासदार बाबुल सुप्रियोसहीत चार खासदारांना विधानसभेच्या मैदानात उतरवले आहे. भाजपच्या या नव्या खेळीवर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (Minister Babul Supriyo, BJP MP Locket Chatterjee Drafted For Bengal Polls)
भाजपने बाबुल सुप्रियो यांना टॉलिगंजमधून निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. खासदार निशीथ प्रमाणिक यांना दिनहाटा विधानसभा मतदारसंघातून तर खासदर लॉकेट चटर्जी यांना चुंचुरा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं आहे. तसेच राज्यसभा सदस्य स्वपन दास गुप्ता यांना तारकेश्वरमधून तिकीट देण्यात आलं आहे. भाजपने आज उमदेवारांची तिसरी यादी जारी केली आहे. त्यात एकूण 27 जणांची नावं आहेत. यात अभिनेते आणि अभिनेत्रींचाही समावेश आहे. टीएमसी सोडून भाजपमध्ये आलेल्या राजीव बॅनर्जी यांना डोमजूर विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं आहे.
चौघांच्या नावाची जोरदार चर्चा
दरम्यान, बाबुल सुप्रियो, निशीथ प्रमाणिक, लॉकेट चॅटर्जी आणि स्वपन दास गुप्ता यांना निवडणूक मैदानात उतरवल्याने आज दिवसभर त्यांचीच चर्चा होती. भाजपला बंगालमध्ये पराभव दिसत असून चांगले उमेदवार मिळत नसल्यानेच खासदारांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचा निर्णय भाजपने घेतल्याचीही चर्चा आहे.
दीदीचे सुरक्षा संचालक निलंबित
दरम्यान, नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात प्रचार करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाला आणि त्यात त्यांच्या पायाला दुखापत झाल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसनं केला आहे. त्यावर ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाल्याचे कुठलेही पुरावे नसल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलंय.
ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला नाही तर त्यांचा अपघात झाल्याचं एका अहवालातून समोर आल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठा हलगर्जीपणा झाल्याचा ठपका ठेवत निवडणूक आयोगाने बड्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार मुख्यमंत्र्यांचे सुरक्षा संचालक विवेक सहाय यांना तात्काळ निलंबित करण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांना झेड प्लस सुरक्षा होती. पण त्यात कुठेतरी कमतरता निर्माण झाली आणि ते आपल्या कर्तव्यात कमी पडले, असा ठपका ठेवत त्यांच्यावर आठवड्याभरात गुन्हा नोंदवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाने पूर्व मेदिनीपूरचे डीएम आणि डीईओ विभू पांडेय यांची बदली केली आहे. त्यांना निवडणूक व्यतिरिक्त काम देण्यात आलं आहे. त्यांच्या जागी स्मिता पांडेय यांच्याकडे डीएम पदाचा कारभार देण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार पूर्व मेदिनीपूरचे एसपी प्रवीण प्रकाश यांनाही निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्याविरोधातही कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांना झालेली दुखापत अधिकाऱ्यांना चांगलीच महागात पडली आहे. (Minister Babul Supriyo, BJP MP Locket Chatterjee Drafted For Bengal Polls)
पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यात मतदान
पहिला टप्पा – 27 मार्च, 30 जागा दुसरा टप्पा – 1 एप्रिल, 20 जागा तीसरा टप्पा – 6 एप्रिल, 31 जागा चौथा टप्पा – 10 एप्रिल, 44 जागा पाचवा टप्पा – 17 एप्रिल, 45 जागा सहावा टप्पा – 22 एप्रिल, 43 जागा सातवा टप्पा – 26 एप्रिल, 36 जागा आठवा टप्पा – 29 एप्रिल, 25 जागा मतमोजणी आणि निकाल – 2 मे रोजी (Minister Babul Supriyo, BJP MP Locket Chatterjee Drafted For Bengal Polls)
LIVE : महत्त्वाच्या घडामोडी https://t.co/36HEJwXNx1
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 14, 2021
संबंधित बातम्या:
तृणमूल काँग्रेसला सर्वात मोठं खिंडार?, नाराज 76 नेते मुकुल रॉय यांना भेटले; भाजप प्रवेशाची शक्यता
आसाममध्ये भाजपचा युतीचा फॉर्म्युला ठरला; वाचा भाजप किती जागांवर लढणार
(Minister Babul Supriyo, BJP MP Locket Chatterjee Drafted For Bengal Polls)