West Bengal Election Results 2021: पश्चिम बंगालमध्ये तृणमूल आणि भाजपमध्ये चुरस; डावे हद्दपार होणार?
पश्चिम बंगालमध्ये सत्तेसाठी तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. बंगालमध्ये 295 जागांपैकी 213 जागांचे कल हाती आले आहेत. (West Bengal Election Results 2021: TMC, BJP locked in neck-and-neck tussle)

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये सत्तेसाठी तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. बंगालमध्ये 295 जागांपैकी 213 जागांचे कल हाती आले आहेत. त्यात तृणमूल काँग्रेसला 107 आणि भाजपला 100 जागा मिळताना दिसत आहे. तर काँग्रेसला अवघ्या चारच जागा मिळताना दिसत असून सर्वात धक्कादायक म्हणजे कधी काळी डाव्यांचा गड असलेल्या बंगालमध्ये डाव्या पक्षांना एकही जागा मिळताना दिसत नाही. त्यामुळे बंगालमधून डावे हद्दपार होणार की काय? अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. (West Bengal Election Results 2021: TMC, BJP locked in neck-and-neck tussle)
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या 295 जागांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. बंगालमधील जागांचे कल हाती आले असून त्यानुसार भाजपने बंगालमध्ये जोरदार मुसंडी मारलेली दिसत आहे. अवघ्या तीन जागा असलेल्या भाजपने 100 जागांपर्यंत उडी मारली आहे. तर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने 107 जागांपर्यंत मजल मारली आहे. काँग्रेसला अवघ्या 6 जागा मिळताना दिसत आहे. ज्या डाव्या पक्षांनी बंगालमध्ये तीस वर्षे सत्ता उपभोगली. त्या बंगालमध्ये डाव्यांचा सुपडा साफ होताना दिसत आहे. त्यामुळे डाव्यांसाठी हा मोठा हादरा असल्याचं मानलं जात आहे. बंगालमध्ये भाजप आणि तृणमूलमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. केवळ काही जागांच्या फरकाने तृणमूल काँग्रेस पुढे आहे. त्यामुळे राज्यात सत्ता कुणाची येणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
ममता बॅनर्जींना मोठा धक्का
पश्चिम बंगालमधील सर्वात प्रतिष्ठेचा मतदारसंघ असलेल्या नंदीग्राममध्ये तासाभराच्या मतमोजणीनंतर भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांनी आघाडी घेतली आहे. हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी धक्का मानला जात आहे. 14 हजार 297 मतांनी ममता बॅनर्जी या पिछाडीवर आहेत. त्यामुळे ममता बॅनर्जी विजयी होणार की आपल्या एकेकाळच्या सहकाऱ्याकडून पराभूत होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सकाळी मतमोजणी सुरू झाली तेव्हा ममता बॅनर्जी या पोस्टल मतांमध्ये आघाडीवर होत्या. त्यामुळे ममता बॅनर्जी नंदीग्राममध्ये मोठा विजय मिळवतील असं वाटत होतं. मात्र, पहिल्या फेरी अखेर त्यांना मोठा धक्का बसताना दिसत आहे.
कोणीही जिंकलं तरी फरक पडत नाही
दरम्यान, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी लक्ष वेधून घेणारे वक्तव्य केले. आज निकालाचा दिवस आहे. मात्र, इतक्या नुकसानानंतर कोणीही जिंकले तरी काही फरक पडत नाही. आजच्या घडीला लोकांचा जीव वाचवणे महत्त्वाचे आहे, असे कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे. (West Bengal Election Results 2021: TMC, BJP locked in neck-and-neck tussle)
VIDEO | पाच राज्यांच्या निवडणुकीत अपयश आल्यास राष्ट्रपती राजवट लागू करतील : शिवसेना https://t.co/aHQRCvr55o #Shivsena | #Saamana | #AssemblyElections2021 | #WestBengal
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 2, 2021
संबंधित बातम्या:
(West Bengal Election Results 2021: TMC, BJP locked in neck-and-neck tussle)