Trust of Nation Survey : लोकसभा निवडणुकीत कुणाचा विजय होणार? डेलिहंटच्या सर्व्हेतील देशवासियांची ‘मन की बात’ काय?
लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा सुरू व्हायला दोन दिवस बाकी आहे. त्याआधीच डेलिहंटने एक देशव्यापी सर्व्हे केला आहे. त्यात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच जलवा दिसत आहे. 77 लाख लोकांमध्ये जाऊन हा सर्व्हे करण्यात आला आहे. या सर्व्हेत देशातील सर्वाधिक लोकांनी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावालाच पहिली पसंती दिली आहे. तर, मोदी तिसऱ्यांदा सत्तेत येत असल्याचं सर्व्हेतून दिसून आलं आहे.
लोकसभा निवडणूक 2024चं बिगुल वाजलं आहे. एका बाजूला सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार आपल्या आपल्या विजयाचा दावा करत आहेत. तर आपल्या पसंतीचं सरकार काय असावं याचा विचारही मतदारांनी करून ठेवला आहे. या सर्व धामधुमीत डेलिहंटने जनताची नस शोधण्याचा प्रयत्न केला आहे. कुणाचं पारडं जड आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न डेलिहंटने एक सर्व्हे केला आहे. त्यासाठी 11 भाषिक राज्यात 77 लाख लोकांशी चर्चा करण्यात आली. या सर्व लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले. त्या आधारे एक रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. या सर्व्हेत 64 टक्के लोकांनी देशात पुन्हा एकदा मोदी सरकारच येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
सर्व्हेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पुन्हा पंतप्रधानपदासाठी पसंती देण्यात आल्याचं दिसून आलं आहे. मोदी हेच पुन्हा पंतप्रधान असावेत असं 64 टक्के लोकांना वाटतं. तर राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत असं 21.8 टक्के लोकांनी सांगितलं. त्याशिवाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान म्हणून 4.3 टक्के लोकांनी तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना 1.3 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर इतरांना पंतप्रधानपदासाठी 8 टक्के लोकांनी पसंती दिली आहे.
कर्नाटकात 72 टक्के लोकांची भाजपला पसंती
डेलिहंटच्या सर्व्हेत 63 टक्के लोकांनी देशात पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वातील एनडीए सरकार येणार असल्याचं मान्य केलं आहे. यावेळी देशातील अधिक राज्यात भाजप विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचं दिसत आहे. सर्व्हेनुसार, कर्नाटकातील 72 टक्के लोकांना 2024मध्ये एनडीए विजयी होईल असं वाटत आहे. तर कर्नाटकातील 20 टक्के लोकांना इंडिया आघाडी विजयी होईल असं वाटत आहे. याच प्रकारे महाराष्ट्रात 58 टक्के लोकांनी भाजपच्या बाजूने तर 33 टक्के लोकांनी इंडिया आघाडीच्या बाजूने मत व्यक्त केलं आहे.
तामिळनाडूत हा आकडा 50-50 टक्के आहे. दोन्ही आघाड्यांना 45-45 टक्के मते मिळताना दिसत आहे. तेलंगणा, पश्चिम बंगाल, दिल्ली, आंध्र प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशात 65 टक्क्याहून अधिक लोकांनी एनडीएच्या बाजूने आपलं मत व्यक्त केलं आहे. तर सुमारे 25 टक्के लोकांनी इंडिया आघाडीच्या बाजूने मत व्यक्त केलं आहे. ओडिशात मात्र भाजपला विजय मिळताना दिसत आहे.
या सर्व्हेत ओडिशात सर्वाधिक 74 टक्के लोकांनी एनडीएची बाजू उचलून धरली आहे. या राज्यात 10 टक्के लोकांनी इंडिया आघाडी जिंकणार असल्याचं म्हटलं आहे. दिल्लीच्या बाबत मात्र भाजपसाठी चांगली बातमी नाही. भाजप दिल्लीतील सर्व सातही जागा जिंकणार असल्याचा दावा करत आहे. पण फक्त 68 टक्के दिल्लीकरांनी भाजपच्या म्हणण्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आहे. तर 23 टक्के लोकांनी भाजपच्या विरोधात मत व्यक्त केलं आहे.
तरुणांची पसंती मोदींना
45 ते 73 वर्ष वयोगटातील लोकांना नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसावेत असं वाटतं. तर 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या 70 टक्के लोकांनाही मोदीच पंतप्रधान व्हावेत असं वाटत आहे. नोकरपेक्षा वर्गाची मानसिकता समजून घेतली तर 71 टक्के पगारदार लोकांनी आणि 72 टक्के निवृत्तांनी मोदींनाच पंतप्रधान म्हणून पहिली पसंती दिली आहे.
राज्यनिहाय आकडे पाहिले तर सर्व्हेनुसार, उत्तर प्रदेश, दिल्ली, महाराष्ट्र, तेलंगणा, पश्चिम बंगाल, गुजरात, बिहार, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, ओडिशा, केरळ आणि हरियाणातील सर्वाधिक नागरिकांनी मोदींना पंतप्रधान म्हणून पसंती दिली आहे. तर तामिळनाडूतील सर्वाधिक लोकांना राहुल गांधीच पंतप्रधान हवे आहेत. तामिळनाडूतील 44.1 टक्के लोकांनी राहुल गांधींना पंतप्रधान म्हणून पसंती दिली आहे. तर 43.2 टक्के लोकांनी मोदींना पंतप्रधान म्हणून पसंती दिली आहे.
आर्थिक प्रगतीत मोदी सरकार किती सक्षम
डेलिहंटच्या सर्व्हेत लोकांनी उघडपणे भाग घेतला आहे. तसेच प्रश्नांची उत्तरेही दिली आहेत. देशातील 60 टक्के लोकांनी मोदी सरकारच्या काळात देशात आर्थिक प्रगती होत असल्याचं म्हटलं आहे. तर मोदी सरकारने देशातील अर्थव्यवस्था व्यवस्थितपणे सांभाळल्याचं 53 टक्के लोकांनी म्हटलं आहे. तर अर्थव्यवस्था अजून चांगली करता आली असती असं 21 टक्के लोकांनी म्हटलं आहे. तर साडे बारा टक्के लोकांनी यात नवीन काहीच नाही असं म्हटलं आहे. मोदी सरकारमध्ये देशाच्या आर्थिक प्रगतीवर 60 टक्के लोक समाधानी असल्याचं दिसून आलं. तर 22 टक्के लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
डेलिहंटने प्रदेशनिहाय सर्व्हेही केला आहे. देशातील कोणत्या भागावर मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांचा कसा परिणाम झाला? हे जाणून घेण्याचा यात प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रश्नाचं उत्तर देताना 64 टक्के लोकांनी आनंद व्यक्त केलेला दिसून आला. पूर्व आणि पश्चिम भारतात सुमारे 63 टक्के लोकांनी आनंद व्यक्त केला. तर दक्षिणेतील 55 टक्के लोक कमी नाराज असल्याचं दिसून आलं. याच प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक धोरणांवर 64 टक्के विद्यार्थी समाधानी असल्याचं दिसून आलं.
परराष्ट्र धोरणाचा रिपोर्ट काय?
63 टक्के निवृत्त लोक, 61 टक्के नोकरदार, 55 टक्के व्यावसायिक आणि 54 टक्के होम मेकर्स यांनी मोदींच्या परराष्ट्र धोरणावर समाधान व्यक्त केलं आहे. या क्रमात डेलिहंटने वयानुसार सर्व्हे केला आहे. त्यात 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या 67 टक्के लोकांनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणाला चांगलं म्हटलं आहे. तर 45 वर्षापेक्षा अधिक वयाच्या 65 टक्के लोकांनी समाधान व्यक्त केलं आहे. तथापि 18 ते 24 वयोगटातील 57 टक्के लोकांनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणाला चांगलं म्हटलं आहे.
गेल्या काही वर्षात वैश्विक स्तरावर आव्हाने वाढली आहेत. कोरोना महामारीशिवाय रशिया- युक्रेन युद्ध आणि इस्रायल-हमास युद्धसहीत अनेक प्रकारची आव्हाने समोर आली आहेत. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारच्या वैश्विक धोरणावर सर्व्हेच्या माध्यमातून मोदी सरकार परराष्ट्र धोरणात किती यशस्वी झालं हे पाहण्याचा प्रयत्न करण्यात आला. सर्व्हेत 64 टक्क्याहून अधिक लोकांनी मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाला अत्यंत चांगलं म्हटलंय. तर 14.5 टक्के लोकांनी मोदी सरकारचं परराष्ट्र धोरण आणखी चांगलं झालं असतं असं म्हटलं आहे. तर 11 टक्के लोकांनी तटस्थ राहणं पसंत केलं आहे.
कोणता वर्ग नाराज, कोणता खूश?
प्रोफेशनच्या आधारे कोणता वर्ग मोदी सरकारच्या कामगिरीवर अधिक खुश आहे आणि कोणता नाराज आहे याची पाहणीही या सर्व्हेतून करण्यात आली. नोकरदार, उद्योजक, विद्यार्थी आणि निवृत्तांच्या कॅटेगिरीत 60 टक्क्याहून अधिक लोकांनी मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर समाधान व्यक्त केलं आहे. मात्र, या मुद्द्यावर होम मेकर्स अधिक खूश असलेले दिसले. या कॅटेगिरीत 58 टक्के लोक सरकारचं परराष्ट्र धोरण चांगलं मानत असल्याचं दिसून आलं.
सरकारच्या कल्याणकारी कामांवर लोक किती समाधानी आहेत हे सुद्धा जाणून घेण्याचं काम या सर्व्हेतून करण्यात आलं. या सर्व्हेत केवळ 54 टक्के लोक मोदी सरकारवर खूश असल्याचे दिसून आले. तर 25 टक्के लोक सरकारवर खूश नसल्याचे दिसून आले. 15 टक्क्याहून अधिक लोक तटस्थ असल्याचं दिसलं.