3 राज्यांमध्ये यामुळे विरोधकांचा पराभव, PM मोदींनी अशी पलटवली बाजी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा विरोधकांना जोरदार धक्का दिला आहे. तीन राज्यात सत्ता मिळवण्यात भाजपला यश मिळालं आहे. काँग्रेसने रणनीती पुन्हा एकदा फसली आहे. मोदींनी काँग्रेसच्या रणनितीला असा सुरुंग लावला की, काँग्रेस भुईसपाट झाली.

3 राज्यांमध्ये यामुळे विरोधकांचा पराभव, PM मोदींनी अशी पलटवली बाजी
modi
Follow us
| Updated on: Dec 03, 2023 | 4:43 PM

Assembly election result 2023 : विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपने तीन राज्यांमध्ये सत्ता मिळवला आहे. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजप सरकार स्थापन करणार आहे. तर तेलंगणामध्ये काँग्रेसचा विजय झाला आहे. भाजपला मध्यप्रदेश आणि छत्तीसडमध्ये पराभवाचा सामना करावा लागेल अशी शक्यता एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली होती. पण लोकांनी भाजपच्याच पारड्यात मत दिले आहे. 2018 मध्ये भाजपला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. पण यातून धडा घेत भाजपने काम केले आणि विजय मिळवला. काँग्रेससह विरोधी पक्षांना 2024 मध्ये देखील या पराभवातून धडा घेतला पाहिजे.

PM नरेंद्र मोदींची जादू कायम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये प्रचार केला होता. भाजपने मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराशिवाय निवडणूक लढवली होती. लोकांनी मोदींच्या हमीवर विश्वास दाखवला. त्यामुळे मोदींची जादू कायम असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. PM मोदींची प्रतिमा अजून चमकली आहे. याचा फायदा भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीत होणार आहे.

बिहारमध्ये जात जनगणना करण्याची मागणी झाली. त्यानंतर देशभरात विरोधकांनी जाती निहाय जनगणना करण्याची मागणी केली. यावर पंतप्रधान मोदींनी उत्तर देत म्हणाले होते की, गरीबी ही सर्वात मोठी जात आहे. त्यामुळे विरोधकांचा हा प्रयत्न देखील फसला आहे.

आदिवासींमध्येही मोदींचा प्रभाव

छत्तीसगडमध्ये 29 आदिवासी राखीव जागांपैकी 18 जागा भाजपने जिंकल्या आहेत. त्यामुळे भाजपला आदिवासी समाजातील लोकांची मोठी मते मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय 2024 मध्ये ही भाजपला आदिवासी समाजाची मते मिळतील अशी आशा आहे.

मुस्लीम समाजाचा काँग्रेसला पाठिंबा

तेलंगणात मुस्लीम समाजाने काँग्रेसला पाठिंबा दिल्याचे दिसून येते. तेलंगणातील मुस्लीमबहुल जागांवर काँग्रेसने चांगली कामगिरी केली आहे. बीआरएसला 39 मुस्लिमबहुल जागांपैकी केवळ 12 जागा मिळाल्या आहेत. ओवेसी यांच्या पक्षालाही केवळ तीन विजय मिळाले आहेत. तेलंगणात काँग्रेस आणि बीआरएस यांच्यात थेट लढत होती.

मध्य प्रदेशात लाडली बहना योजना आणि छत्तीसगडमध्ये महतरी वंदन योजना यामुळे भाजपला चांगली मते मिळाली. महिलांच्या पाठिंब्याचा भाजपला फायदा झाला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.