मोदी बांगलादेशच्या दौऱ्यातून बंगाल, आसामचे सत्ता समीकरण साधणार?; वाचा, सविस्तर
बांगलादेशाच्या 50 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ढाका येथे पोहोचणार आहेत. (Why PM Modi’s Bangladesh visit is linked to Bengal Assembly polls)
कोलकाता: बांगलादेशाच्या 50 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ढाका येथे पोहोचणार आहेत. मोदी यांच्या या दौऱ्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. मोदी यांच्या बांगलादेश निवडणुकीचे उद्या होणाऱ्या पश्चिम बंगाल आणि आसाममधील विधानसभा निडवणुकीच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीशी कनेक्शन जोडले जात आहेत. आसाम आणि पश्चिम बंगालमधील समीकरणे साधण्याचा मोदींचा प्रयत्न असणार आहे, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. (Why PM Modi’s Bangladesh visit is linked to Bengal Assembly polls)
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शुक्रवारी 11च्या सुमारास बांगालदेशच्या ढाकामध्ये पोहोचतील. यावेळी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना शाह जलाल विमानतळावर मोदींचं स्वागत करतील. त्यानंतर 36 तासात मोदी हे शेख हसीना यांनी आयोजित केलेल्या पाच कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. तब्बल आठ तास ते बंगालमध्ये राहणार आहेत. भारत आणि बांगलादेशाचे मैत्रीसंबंध मजबूत करण्यासाठी मोदी या निमित्ताने प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
धार्मिक स्थळांना भेटी
मोदी आज बांगलादेशातील सुगंधा शक्तीपीठ आणि ओरकंडी मंदिरातही जाणार आहेत. बरीसाल जिल्ह्यातील सुगंधा शक्तीपीठाला 51 शक्तीपीठांपैकी एक मानलं जातं. हा प्रश्न हिंदुंच्या आस्थेशी जोडलेला आहे. तसेच ओरकांडीचं मंदिर मतुआ महासंघाच्या संस्थापक हरिचंद्र ठाकूर हे आहेत. त्यांना मानणारा मोठा वर्ग पश्चिम बंगालमध्ये राहतो. त्याचप्रमाणे मोदी कुसतियामध्ये रविंद्र कुटी बारीतही जाण्याची शक्यता आहे.
मतुआ समाज किंगमेकर
मोदींच्या बांगलादेशाच्या दौऱ्याचा संबंध आसामशीही जोडला जात आहे. बंगालमध्ये उद्या शनिवारी 30 आणि आसाममध्ये 47 जागांवर मतदान होणार आहे. कालच या दोन्ही राज्यातील पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रचार थांबला आहे. बांगलादेशाच्या स्वातंत्र्यानंतर बांगलादेशातील लोक मोठ्या प्रमाणावर पश्चिम बंगालमध्ये आले होते. त्यात मतुआ समुदायाचे लोक मोठ्या प्रमाणावर होते. राज्यातील अनुसूचित जातीच्या पाच टक्के लोक मतुआ समुदायातील आहेत. 2011च्या जनगणनेनुसार राज्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 23.51 टक्के आहे. राज्यातील 294 विधानसभा जागांपैकी 21 जागांवर मतुआ समुदायाचा मोठा प्रभाव आहे. 1947 नंतर हे लोक पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगना, दक्षिण 24 परगना आणि नदियामध्ये येऊन वास्तव्य करू लागले. (Why PM Modi’s Bangladesh visit is linked to Bengal Assembly polls)
मोदींची सोशल इंजिनीयरिंग
त्यामुळेच या तिन्ही जिल्ह्यात मतुआ समुदायाचा मोठा प्रभाव आहे. या जिल्ह्यात राहणाऱ्या अनेक लोकांचे नातेवाईक आजही बांगलादेशात राहतात. त्यामुळे सत्तेची चावी हातात असलेल्या मतुआ समुदायाला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न मोदी हे बांगलादेशच्या दौऱ्यातून करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. (Why PM Modi’s Bangladesh visit is linked to Bengal Assembly polls)
VIDEO : SuperFast 100 News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 26 March 2021https://t.co/pgKeMxpqC5
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 26, 2021
संबंधित बातम्या:
बंगाल-आसाममध्ये आज पहिल्या टप्प्यातील तोफा थंडावणार; वाचा, कुणाचं किती पारडं जड!
केरळमध्ये भाजपला मतदान का होत नाही?; भाजप नेत्याचं उत्तर वाचाल तर चक्रावून जाल
शरद पवारांनी काँग्रेसचा ‘तो’ प्रस्ताव नाकारला; पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या मदतीला जाणार?
(Why PM Modi’s Bangladesh visit is linked to Bengal Assembly polls)