जॅकलिन, नोरा, शिल्पासह ‘या’ 12 अभिनेत्रींसोबत सुकेशचे क्लोज कनेक्शन? ईडीसमोर खळबळजनक खुलासे

सुकेशला तिहार जेलमध्ये तब्बल 12 अभिनेत्री भेटल्याची आणि जेल कर्मचाऱ्यांना महिन्याला तब्बल 1 कोटी रुपये लाच देत असल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे.

जॅकलिन, नोरा, शिल्पासह 'या' 12 अभिनेत्रींसोबत सुकेशचे क्लोज कनेक्शन? ईडीसमोर खळबळजनक खुलासे
श्रद्धा कपूर आणि शिल्पा शेट्टी
Follow us
| Updated on: Dec 17, 2021 | 6:56 PM

नवी दिली : जॅकलीन आणि नोरा फतेहीसोबत कनेक्शन आढळून आलेला ठग सुकेश चंद्रशेखरचे आणखी काही मोठे कनेक्शन बाहेर येत आहेत. सुकेशचे बॉलिवूडमधील आणखी बड्या अभिनेत्रींशीही कनेक्शन असल्याची माहिती समोर आली आहे. सुकेशची सध्या 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग केसमध्ये चौकशी सुरू आहे, त्याने ईडीच्या चौकशीवेळी आणखी काही नावं घेतली आहेत. सुकेशला तिहार जेलमध्ये तब्बल 12 अभिनेत्री भेटल्याची आणि जेल कर्मचाऱ्यांना महिन्याला तब्बल 1 कोटी रुपये लाच देत असल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे.

श्रद्धा कपूर, शिल्पा शेट्टीशी कनेक्शन

सुकेशने ईडीला दिलेल्या जबाबात त्याने जॅकलीन, नोरा फतेही यांच्यासोबतच शिल्पा शेट्टी आणि श्रद्धा कपूर यांच्याशी आपले कनेक्शन असल्याची कबूली दिली आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे. आतापर्यंत ईडीच्या रडारावर फक्त जॅकलीन फर्नांडीस आणि नोरा फतेही होती, मात्र आता आणखी काही बड्या अभिनेत्रींच्या अडचणी वाढण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ईडीच्या चौकशीत खळबळजनक खुलासे

सुकेशने श्रद्धा कपूरला 2015 पासून ओळखत असल्याचे सांगितले आहे. सुकेशने ड्रग्ज केसमध्ये श्रद्धा कपूरची मदत केल्याचीही माहिती समोर आली आहे. सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज केसमध्ये श्रद्धा कपूरचे कनेक्शन समोर आले होते, यावेळी ईडीने श्रद्धा कपूरला चौकशीलाही बोलावले होते. सुकेशचा दावा आहे की, तो हरमन बावेजाला ओळखतो. हरमन बावेजा त्याचा जुना मित्र आहे, असेही सुकेशने सांगितले आहे. तो हरमनचा कॅप्टन हा चित्रपट प्रड्यूसही करणा होता. या चित्रपटात मुख्य भूमिका कार्तिक आर्यनने साकारली आहे. इतकेच नाही तर त्याने राज कुंद्राच्या केसमध्ये शिल्पा शेट्टीशी संपर्क केल्याचीही माहिती ईडीला दिली आहे. ईडीने शिल्पा शेट्टी आणि त्याच्याबाबत विचारले असता शिल्पाची आणि त्याची मैत्री असल्याचे सुकेशने सांगितले आहे. सुकेशच्या या खळबळजनक दाव्यानंतर श्रद्धा कपूर, शिल्पा शेट्टी आमि हरमन बावेजा हेही आता ईडीच्या रडारवर आले आहेत. सुकेशने जॅकलीन आणि नोराला महागडे गिफ्ट दिल्याची माहिती समोर आली आहे. सुकेश आणि जॅकलीनचा एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुकेशकडून जॅकलीनसोबत प्रेमप्रकरण असल्याची माहिती देण्यात आली आहे, तर जॅकलीनने हे नाकारले आहे.

Zoomcar : तुमच्याकडे कार आहे का? महिन्याला कमवा 20 ते 30 हजार; कसे ते वाचा…

महावितरण अन् शेतकऱ्यांचीही आर्थिक स्थिती बिकटच, अशोक चव्हाणांनी सांगितला मधला मार्ग

AUS vs ENG, Ashes 2nd Test, Day 2: ऑस्ट्रेलियाचा भेदक मारा, इंग्लंडची नाजूक अवस्था, 456 धावांनी पिछाडीवर

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.