Bollywood actors | रणबीर कपूर याच्यासह बाॅलिवूडचे तब्बल इतके स्टार ईडीच्या रडारवर, मोठी खळबळ
रणबीर कपूर हा सध्या तूफान चर्चेत आहे. रणबीर कपूर याचा नुकताच ईडीकडून समन्स पाठवण्यात आलाय. यामुळे रणबीर कपूर याच्या चाहत्यांमध्ये मोठा धक्का बसलाय. रणबीर कपूर हा नेहमीच चर्चेत असणारा अभिनेता आहे.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झालीये. रणबीर कपूर याला थेट ईडीने (ED) नोटीस पाठवलीये. रणबीर कपूर याची आता 6 ऑक्टोबर रोजी चाैकशी करण्यात येणार आहे. रणबीर कपूर याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचे दिसतंय. इतकेच नाही तर रणबीर कपूर याचे या प्रकरणात पाय खोलात असल्याचे देखील सांगितले जातंय. ऑनलाईन गेमिंग (Online gaming) प्रकरणात रणबीर कपूर याला हा समन्स ईडीकडून बजावण्यात आलाय. मात्र, यावर अजूनही रणबीर कपूर याच्याकडून काही भाष्य केले गेले नाहीये.
महादेव गेमिंग अॅपची जाहिरात करताना रणबीर कपूर हा दिसला. हे अॅप रणबीर कपूर प्रमोट करताना दिसला. या अॅपचे प्रमोशन करण्यासाठी रणबीर कपूर याला तगडी रक्कम मिळाल्याचे देखील सांगितले जातंय. फक्त भारतच नव्हे तर इतरही देशांमध्ये या अॅपचे काॅल सेंटर असल्याची देखील माहिती पुढे येतंय.
या प्रकरणात रणबीर कपूर याचे नाव आल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे फक्त रणबीर कपूर हाच नाही तर महादेव गेमिंग अॅपच्या प्रकरणात ईडीच्या रडारावर तब्बल 15 ते 20 बाॅलिवूड स्टार आहेत. रणबीर कपूर याच्यासोबत इतरही कलाकारांची नाव पुढे येत असल्याने बाॅलिवूडमध्ये मोठी खळबळ निर्माण झालीये.
रणबीर कपूर याच्यासोबतच टायगर श्राॅफ, राहत फतेह अली खान, आतिफ असलम, विशाल ददलानी, अली असगर, नेहा कक्कर, सनी लिओनी, भारती सिंह, पुलकित सम्राट, किर्ती खरबंदा, नुसरत भरूचा यासोबत काही काॅमेडी क्षेत्रातील व्यक्तींची देखील नावे या प्रकरणात पुढे आलीयेत. यामुळे लोक हैराण आहेत.
या प्रकरणात आता अजून काही मोठे खुलासे होण्याची दाट शक्यता आहे. रणबीर कपूर याला ईडीने 6 ऑक्टोबर रोजी चाैकशीसाठी बोलावले आहे. आता रणबीर कपूर याच्या चाैकशीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मुंबई, भोपाळ आणि कोलकता यासाठी ईडीकडून छापेमारी देखील करण्यात आलीये. फक्त बाॅलिवूड कलाकारच नाही तर या प्रकरणात अजून काही मोठ्या नावांचा खुलासा होऊ शकतो.
ईडीने समन्स पाठवल्यानंतर रणबीर कपूर या प्रकरणात नेमके काय भाष्य करतो, याकडे सर्वांच्या नजरा आहेत. मात्र, अजून तरीही रणबीर कपूर याने यावर माैन बाळगल्याचे दिसतंय. रणबीर कपूर हा त्याच्या आगामी चित्रपटामध्ये बिझी असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.