BTS बँडच्या सदस्यासारखा दिसण्यासाठी अभिनेत्याने केले 12 प्लास्टिक सर्जरी; वयाच्या 22 व्या वर्षी झाला मृत्यू

2019 मध्ये वॉन कलुची हा कॅनडाहून दक्षिण कोरियाला संगीतविश्वात करिअर करण्यासाठी आला होता. दक्षिण कोरियातील तीन मोठ्या एंटरटेन्मेंट कंपन्यांपैकी एका कंपनीत तो ट्रेनी म्हणून काम करत होता.

BTS बँडच्या सदस्यासारखा दिसण्यासाठी अभिनेत्याने केले 12 प्लास्टिक सर्जरी; वयाच्या 22 व्या वर्षी झाला मृत्यू
Von Colucci and Park JiminImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Apr 25, 2023 | 1:48 PM

दक्षिण कोरिया : जगप्रसिद्ध के-पॉप बँड बीटीएसचा (BTS) सदस्य पार्क जिमिनसारखा दिसण्याच्या मोहापायी एका तरुण अभिनेत्याने आपला जीव गमावला आहे. 12 शस्त्रक्रियांनंतर 22 वर्षीय कॅनेडियन अभिनेता सेंट वॉन कलुचीचा मृत्यू झाला. दक्षिण कोरियातील एका रुग्णालयात त्याने रविवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. काही महिन्यांपूर्वी त्याच्यावर 12 विविध कॉस्मेटिक सर्जरी करण्यात आले होते. त्या सर्जरींमुळे निर्माण झालेल्या समस्यांमुळे वॉन कलुचीने आपले प्राण गमावले.

प्लास्टिक सर्जरीवर खर्च केले तब्बल इतके डॉलर

वॉन कलुचीने 12 प्लास्टिक सर्जरीसाठी तब्बल 2 लाख 20 हजार डॉलर खर्च केले होते. अमेरिकी स्ट्रीमिंग नेटवर्कसाठी के-पॉपस्टार बनण्याचं त्याचं स्वप्न होतं. नोव्हेंबर 2022 मध्ये सर्जरीद्वारे त्याच्या जबड्यात इम्प्लांट बसवण्यात आले होते. ते काढण्यासाठी शनिवारी रात्री त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. याच इम्प्लांट्समुळे त्याला संसर्ग झाला आणि आरोग्याशी संबंधित गुंतागुंत वाढली. त्यानंतर काही तासांतच त्याचा मृत्यू झाला.

दिसण्याविषयी होता न्यनगंड

2019 मध्ये वॉन कलुची हा कॅनडाहून दक्षिण कोरियाला संगीतविश्वात करिअर करण्यासाठी आला होता. दक्षिण कोरियातील तीन मोठ्या एंटरटेन्मेंट कंपन्यांपैकी एका कंपनीत तो ट्रेनी म्हणून काम करत होता. वॉनसोबत मार्च 2022 पासून काम करणाऱ्या एरिक ब्लेकने त्याच्या निधनाच्या वृत्तावर शोक व्यक्त केला. “हे अत्यंत दु:खद आणि दुर्दैवी आहे”, असं तो म्हणाला. वॉन कलुचीला त्याच्या दिसण्याबद्दल खूपच न्यूनगंड होता, असंही त्याने सांगितलं.

हे सुद्धा वाचा

12 सर्जरींनंतर मृत्यू

“वॉन त्याच्या दिसण्याबाबत खुश नव्हता. त्याच्या जबड्याचा आकार चौकोनी होता आणि त्याला तो V आकाराचा हवा होता. गेल्या वर्षभरात त्याच्यावर जबड्याची शस्त्रक्रिया, इम्प्लांट्स, फेस लिफ्ट, नाकाची सर्जरी, डोळ्यांच्या पापण्यांची सर्जरी, भुवयांची सर्जरी, ओठांचा आकार कमी करण्याची सर्जरी यांसह इतरही काही छोट्यामोठ्या सर्जरी करण्यात आल्या होत्या”, अशी माहिती ब्लेकने दिली. जबड्याची सर्जरी किती धोकादायक असते हे वॉनला माहीत होतं. कारण त्यात तुमच्या नैसर्गिक जबड्याचा आकार बदलण्यासाठी इम्प्लांट्स लावले जातात. मात्र तरीसुद्धा त्याला ती सर्जरी करायची होती, असं ब्लेक म्हणाला.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.