‘3 इडियट्स’मधील राजू रस्तोगीची गरीब आई आठवतेय? खऱ्या आयुष्यात त्यांची मुलगी दिसते इतकी सुंदर
'थ्री इडियट्स' या चित्रपटातील प्रत्येक भूमिका विशेष गाजली. यात राजू रस्तोगीच्या आईची भूमिका अभिनेत्री अमरदीप झा यांनी साकारली होती. त्यांची खऱ्या आयुष्यातील मुलगी अभिनयात आईला चांगलीच टक्कर देते. सौंदर्याच्या बाबतीतही श्रिया अभिनेत्रींना टक्कर देते.
मुंबई : 14 मार्च 2024 | आमिर खानच्या ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटातील एक इडियट होता राजू रस्तोगी.. त्याच्या भूमिकेबाबत असलेली विशेष गोष्ट म्हणजे त्याचं कुटुंब. राजू रस्तोगीच्या कुटुंबात एक अविवाहित बहीण, आजारी वडील आणि निवृत्त आई होती. ‘थ्री इडियट्स’मध्ये राजूच्या आईची भूमिका साकारली होती अभिनेत्री अमरदीप झा यांनी. भाज्यांचा आणि पनीरचा दर सांगणारा त्यांचा डायलॉग आजही प्रेक्षकांना तोंडपाठ असेल. अमरदीप या इंडस्ट्रीतील नामवंत अभिनेत्री आहेत. त्यांची मुलगी श्रिया झासुद्धा त्यांच्यापेक्षा काही कमी नाही. अमरदीप यांची मुलगी श्रिया काय करते आणि ती कशी दिसते, ते पाहुयात..
श्रियासुद्धा आईच्या पावलांवर पाऊल टाकत फिल्म इंडस्ट्रीत काम करतेय. आईसारखीच तीसुद्धा दमदार अभिनेत्री आहे. सौंदर्याच्या बाबतीत तर आईपेक्षा काही पावलं पुढे गेली आहे. श्रियाने 2008 मध्ये ‘गीता’ या तेलुगू चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने ‘तोमार जोन्यो’, ‘ओल्ट पोल्ट’ या बंगाली आणि ‘लुछाकली’, ‘अमा भीतारे अची’, ‘शत्रूसंहार’ यांसारख्या ओडिया चित्रपटांमध्ये काम केलं. चित्रपटांनंतर श्रिया मालिकांकडे वळली. ‘झिलमिल सितारों का आंगन होगा’ या मालिकेत तिने अंगना रायचंदची मुख्य भूमिका साकारली होती. तर ‘दो दिल बंधे एक डोरी से’ आणि ‘उतरन’ या गाजलेल्या मालिकांमध्ये तिने खलनायकी भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय ‘निमकी मुखिया’, ‘निमकी विधायक’, ‘इशारों इशारों में’ आणि ‘जिद्दी दिल माने ना’ यांसारख्या मालिकांमध्येही आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली.
View this post on Instagram
अमरदीप झा यांना अभिनयविश्वातून चांगली प्रसिद्धी मिळाली. परंतु त्यांचं खासगी आयुष्य खडतर गोतं. लग्नाच्या काही काळानंतर त्यांच्या पतीचं निधन झालं. त्यानंतर त्यांनीच मुलीचं संगोपन केलं. श्रियानेही आपल्या आईच्या मेहनतीची जाणीव ठेवली आणि अभिनयक्षेत्रात नाम कमावलं.
अमरदीप यांना मोठ्या पडद्यावर जितकं यश मिळालं, तितकंच त्यांना छोट्या पडद्यावरही मिळालं. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या लोकप्रिय मालिकेत त्यांनी शंकरी ताईची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका खूप गाजली होती. याशिवाय ‘दिल से दिल तक’, ‘रेत’, ‘सिंदूर तेरे नाम का’, ‘सपना बाबुल का.. बिदाई’, ‘बा, बहु और बेबी’, ‘एक हजारों में मेरी बहना है’, ‘कुछ तो लोग कहेंगे’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.