31 वर्षीय बॉलिवूड अभिनेत्री चक्क 70 वर्षीय अभिनेत्याच्या प्रेमात? म्हणाली ‘स्वतःची मानसिक तयारी…”
31 वर्षीय बॉलिवूड अभिनेत्री चक्क 70 वर्षीय अभितेच्या प्रेमात पडल्याच्या चर्चा समोर येत आहेत. या अभिनेत्रीने त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत प्रेम व्यक्त करणाऱे कॅप्शन दिलं आहे. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य झालं असून त्या अभिनेत्रीला प्रचंड ट्रोलही करण्यात येत आहे.
‘प्रेम आणि आनंद लपवता येत नाही.’ असं म्हणतात. कारण असच काहीस घडलं आहे एका अभिनेत्रीबाबत. या अभिनेत्रीने शेअर केलेल्या एक फोटोमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. कारण ही अभिनेत्री चक्क 70 वर्षांच्या अभिनेत्याच्या प्रेमात पडली असल्याचं म्हटलं जात आहे.
70 वर्षीय अभिनेत्याच्या प्रेमात 31 वर्षीय अभिनेत्री?
‘न उम्र की सीमा हो, न जन्मों का हो बंधन, जब प्यार करे कोई, तो देखे केवल मन’ जगजीत सिंह यांची ही लोकप्रिय गजल सर्वांना माहितच असेल. याचा संदर्भ देण्यामागचे कारण म्हणजे तरुण बॉलिवूड अभिनेत्री आहे. कारण या अभिनेत्रीने एका 70 वर्षीय दिग्गज अभिनेत्यासोबतचा फोटो शेअर करत त्यांच्यावरील प्रेम व्यक्त केलं आहे. ही पोस्ट शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट करत ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
ही 31 वर्षीय अभिनेत्री म्हणजे शिवांगी वर्मा आहे. शिवांगीने दिग्गज अभिनेते गोविंद नामदेव यांच्यासोबतचा एक फोटो व्हायरल करत “असं म्हणतात की प्रेमाला कोणतीही वय आणि मर्यादा नसते” असं कॅप्शन दिलं आहे. तिने तिच्या इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. लोक तिला गोविंद नामदेवांची नवीन गर्लफ्रेंड म्हणत आहेत.
नेटकऱ्यांकडून ट्रोलिंग
या फोटोनंतर गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडचं नाव देत नेटकऱ्यांनी चिडवण्यास सुरुवात केली आहे. हा फोटो पाहून एका यूजरने लिहिले की, ‘म्हणूनच पैसा महत्त्वाचा आहे.’ दुसऱ्या युजरने विचारलं आहे, ‘हे तुझे बॉयफ्रेंड आहे का?. शिवांगी वर्माच्या काही चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त करत ‘तुम्ही लग्न करणार आहात का?’ असा थेट प्रश्न विचारला आहे. तर दुसरा युजरने त्याच्या फोटोची खिल्ली उडवत म्हटलं, ‘पैसा असेल तर वय नसते, मर्यादा नसते.’ अशा पद्धतीने शिवांगीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. तर ,काही लोक शिवांगी वर्माच्या फोटोला पब्लिसिटी स्टंट म्हणत आहेत.
View this post on Instagram
शिवांगीकडून चित्रपटाची घोषणा
वास्तविक पाहाता तिचा गोविंद नामदेव यांच्यासोबत एक चित्रपट येत आहे. कॉमेडी चित्रपटात दोघेही एकमेकांसोबत काम करताना दिसणार आहेत, ज्याबद्दल शिवांगी वर्मा खूप उत्सुक आहे. एका रिपोर्टनुसार, शिवांगी तिच्या व्यक्तिरेखेबद्दल म्हणाली, ‘ही भूमिका माझ्या खऱ्या आयुष्यातील व्यक्तिमत्त्वापेक्षा खूपच वेगळी आहे.’
तसेच पुढे ती म्हणाली “मी भूमिकेसाठी ऑडिशन आणि लुक टेस्ट दिली. माझी भूमिका माझ्या खऱ्या व्यक्तिमत्त्वापेक्षा खूप वेगळी असल्याने मला स्वतःची मानसिक तयारी करावी लागली. व्यक्तिरेखा समजून घेण्यासाठी मी टीम, दिग्दर्शक आणि लेखक यांच्यासोबत वेळ घालवला” असं म्हणत तिने गोविंद नामदेव आणि ब्रिजेंद्र काला यांसारख्या दिग्गजांसह स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
शेअर केलेला फोटो चित्रपटाचा भाग?
शिवांगीने शेअर केलेला फोटो हा केवळ तिच्या चित्रपटाचा एक भाग असल्याचं लक्षात येत आहे. दरम्यान नेटकऱ्यांच्या या ट्रोलिंगवर अद्याप तरी शिवांगा किंवा गोविंद नामदेव यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. या फोटोचा नेमका अर्थ पुढे काही दिवसांत नक्कीच समोर येईल. गोविंद नामदेव हे बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते आहेत, त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘बँडिट क्वीन’, ‘सरफरोश’, ‘सत्या’ यांसारख्या चित्रपटांमुळे त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या मनावर कोरल्या गेल्या आहेत .
70 वर्षांचे गोविंद नामदेव गेल्या 3 दशकांहून अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीत काम करत आहेत. ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मधून त्यांनी अभिनयाचे शिक्षण घेतले. त्यांनी कधीही स्वतःला कोणत्याही पात्राशी बांधले नाही. नवनवीन व्यक्तिरेखा साकारत त्यांनी स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘शोला और शबनम’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं.