Salman Khan | ‘जवानी हमारी एकदम…’, भाईजानसाठी आजचा दिवस खास, जाणून घ्या कारण…

Salman Khan | चाहत्यांच्या भाईजानसाठी आजचा दिवसा अत्यंत महत्त्वाचा आणि खास... सलमान खान याने व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांसोबत शेअर केला आनंद... व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Salman Khan | 'जवानी हमारी एकदम...', भाईजानसाठी आजचा दिवस खास, जाणून घ्या कारण...
Follow us
| Updated on: Aug 27, 2023 | 10:03 AM

मुंबई | 2 7 ऑगस्ट 2023 : ‘हम यहां के रॉबिनहुड पांडे है, रॉबिनहुड पांडे… स्वागत नहीं करोगे आप हमारा?’, ‘दोस्ती का एक उसूल है मैडम… नो सॉरी, नो थैंक यू’, ‘एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं अपने आप की भी सुनता।’, ‘मुझपे ​​एक एहसान करना, मुझसे कोई एहसान मत करना।’ अशा असंख्य डायलॉगमुळे आणि आपल्या खास शैलीमुळे अभिनेता सलमान खान याने चाहत्यांच्या मनाच केलं. ९० चं दशक गाजवणार सलमान आज देखील बॉलिवूडवर राज्य करत आहेत. बॉलिवूडमध्ये अद्याप सलमान खान याची जागी कोणताही अभिनेता घेवू शकलेला नाही. ९० दशकातील अनेक अभिनेते आता बॉलिवूडपासून दूर आहे, पण सलमान खान याच्यासोबत स्क्रिन शेअर करण्यासाठी अभिनेत्री उत्सुक असतात. आज सर्वत्र सलमान खान याची चर्चा रंगत आहे. त्यामागे कारण देखील तसंच आहे.

बॉलिवूडचा टायगर आणि चाहत्यांचा भाईजान याच्यासाठी आजचा दिवस अत्यंत खास आणि कधीही विसरता न येणारा आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करून सलमान खान याला आज ३५ वर्ष झाली आहेत. सलमान खान याने १९८८ साली ‘बीबी हो तो ऐसी’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर आयुष्यात अनेक चढ – उतार आले. पण अभिनेत्याने कधीही मागे वळून पाहिलं नाही.

हे सुद्धा वाचा

‘बीबी हो तो ऐसी’ सलमान खान याने मैंने प्यार किया, बागी, सनम बेवफा, पत्थर के फूल, साजन यांसरख्या अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. अभिनय विश्वात ३५ वर्ष पूर्ण केल्यामुळे सलमान खान याने चाहत्यांचे आभार मानले आहेत.

सोशल मीडियावर सलमान खान याने सिनेमातील काही डायलॉग कॉलाज करत एक व्हिडीओ तयार केला आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये, ‘३५ वर्ष ३५ दिवसांप्रमाणे गेले… तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी आभार…’ असं लिहिलं आहे. सध्या सलमान खान याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अभिनेत्याच्या व्हिडीओवर अनेकांनी केमेंटमध्ये प्रतिक्रिया देत प्रेम व्यक्त केलं आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘याठिकाणी कधीही दुसरा सलमान खान जन्म घेवू शकत नाही…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘मी वृद्ध झालो तरी, सलमान खान माझा फेव्हरेट असेल.. ‘ इंडस्ट्रीमध्ये ३५ वर्ष पूर्ण झाल्यामुळे अनेकांनी सलमान खान याला शुभेच्छा दिल्या आहेत.

सलमान खान याचा आगामी सिनेमा

सलमान खान लवकरच ‘टायगर ३’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. १० नोव्हेंबर २०२३ रोजी सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सिनेमात पुन्हा सलमान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांची जोडी झळकरणार आहे. सिनेमात सलमान, कतरिना यांच्यासोबत इमरान हाश्मी, विशाल जेठवा आणि रिद्धी डोगरा देखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.

...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.