AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Birthday Special : दिवसाला 40 अंडी आणि 8 तास व्यायाम, भल्लालदेवच्या भूमिकेसाठी राणाची खास मेहनत

दक्षिणात्य सुपरस्टार राणा दग्गुबाती आज त्याचा वाढदिवस साजरा करतोय.(40 eggs and 8 hours of exercise a day, Rana's special effort for the role of Bhallaldev)

Birthday Special : दिवसाला 40 अंडी आणि 8 तास व्यायाम, भल्लालदेवच्या भूमिकेसाठी राणाची खास मेहनत
Follow us
| Updated on: Dec 14, 2020 | 11:37 AM

मुंबई : दक्षिणात्य सुपरस्टार राणा दग्गुबाती आज म्हणजेच 14 डिसेंबरला त्याचा वाढदिवस साजरा करतोय. त्याचा चित्रपटसृष्टीतील खूप मोठा प्रवास आहे, त्यानं अनेक सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केलं आणि त्याला अनेक पुरस्कारांनीही गौरविण्यात आलं. मात्र लोक त्याला भल्लालदेव म्हणूनच जास्त ओळखतात.देशातील सर्वात यशस्वी चित्रपट म्हणजेच बाहुबलीमध्ये भक्कम अशी भूमिका साकारलेला भल्लालदेव आजही सर्वांच्या मनात आहे. प्रभास या चित्रपटात मुख्य भूमिकेत असला तरी राणाची भूमिका देखिल महत्वाची होती. राणाशिवाय या चित्रपटाची कल्पनाही करता येणार नाही.

राणा ते भल्लालदेव, कसा होता प्रवास ? भल्लालदेव बनण्यासाठी राणाला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. या चित्रपटासाठी त्यानं शारीरिक मेहनत जास्त घेतली. मिळालेल्या माहितीनुसार भल्लालदेवच्या भूमिकेसाठी राणाला रोज 4000 कॅलरीज घेण्याची गरज होती. या मोठ्या इनटेकसाठी तो रोज 40 अंडी खायचा. या व्यतिरिक्त रोज आठ कसरत करुन तो आठ वेळा जेवणही करायचा.

राणानं सांगितलेल्या माहितीनुसार त्यानं या भूमिकेसाठी जवळजवळ 100 किलो वजन वाढवलं होतं. आता इतक्या वजनात कोणाचंही पोट बाहेर येईल, मात्र राणानं शारीरिक व्यायाम मोठ्या प्रमाणात केले, त्यामुळे वाढलेलं वजन देखील केवळ स्नायूंच्या रूपात दिसून आलं आणि अशा प्रकारे भल्लालदेवचं भक्कम शरीर पाहायला मिळालं.

राणाचा चित्रपटसृष्टीलील प्रवास राणानं बॉलिवूडमध्ये देखील अनेक चित्रपट केले. ज्यात त्यानं अभिनेत्री बिपाशा बासुसोबत काम केलं, खिलाडी अभिनेता अक्षय कुमारसोबतसुद्धा राणानं स्क्रिन शेअर केली.दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये तर त्यानं कमालीचे अॅक्शन सीन दिलेत, यासाठी त्यांचं मोठ्या प्रमाणात कौतुक केलं जातं. कोरोना काळात राणा त्यांच्या लग्नामुळे खास चर्चेत होता. कोरोना काळात त्यानं मिहिका बजाजसोबत लग्नगाठ बांधली. सोशल मीडियावर यांच्या लग्नाचे फोटो ट्रेंडमध्ये होते.

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.