Miss Universe 2021 | Harnaaz Sandhu ला मिस युनिव्हर्सचा किताब, 21 वर्षांनी भारताची उंचावली मान

इस्रायलमधील इलात येथे झालेल्या 70व्या मिस युनिव्हर्स 2021 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 21 वर्षीय तरुणी हरनाज संधूने मिस युनिव्हर्स 2021 चा किताब जिंकला आहे.

Miss Universe 2021 | Harnaaz Sandhu ला मिस युनिव्हर्सचा किताब, 21 वर्षांनी भारताची उंचावली मान
harnaaz-min
Follow us
| Updated on: Dec 13, 2021 | 9:46 AM

मुंबई :  इस्रायलमधील इलात येथे झालेल्या 70व्या मिस युनिव्हर्स 2021 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 21 वर्षीय तरुणी हरनाज संधूने मिस युनिव्हर्स 2021 चा किताब जिंकला आहे. पराग्वे आणि दक्षिण आफ्रिका यासारख्या देशातील स्पर्धकांना मागे टाकून तिने हा मान मिळवला आहे. यापूर्वी 2000 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ताने हा किताब  जिंकला होता. आता 21 वर्षानंतर हा मान पुन्हा भारताला मिळाला आहे.

‘हा’ होता स्पर्धेतील शेवटचा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर  होणाऱ्या या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये तिला काही प्रश्न विचारण्यात आले, तो प्रश्न असा होता की “बर्‍याच लोकांना हवामान बदल ही फसवी वाटते, पण ही गोष्ट त्यांना पटवून देण्यासाठी तुम्ही काय कराल?”

या प्रश्नावर उत्तर देताना “निसर्ग अनेक समस्यांमधून जात आहे हे पाहून माझे हृदय हळहळते आणि हे सर्व आपल्या बेजबाबदार वर्तनामुळे आहे. मला पूर्णपणे वाटते की हीच वेळ आहे कृती करण्याची आणि कमी बोलण्याची. कारण तुमची प्रत्येक कृती निसर्गाला वाचवू शकते किंवा नष्ट टाकू शकते. पश्चात्ताप करण्यापेक्षा आपल्या चुकीमध्ये दुरुस्ती करणे जास्त चांगले आहे.” हरनाजच्या या उत्तरावर उपस्थियांनी टाळ्यांचा गजर केला.

कोण आहे हरनाज हरनाजने 2017 मध्ये टाइम्स फ्रेश फेस बॅकसह तिच्या सौंदर्य स्पर्धेचा प्रवास सुरू केला. 2017 मध्ये तिने मिस चंदिगढचा किताब जिंकला होता. त्याच प्रमाणे तिच्याकडे फेमिना मिस इंडिया पंजाब 2019 सारखी अनेक स्पर्धा खिताब देखील आहेत. हरनाजने मिस इंडिया 2019 मध्ये भाग घेतला होता त्यामध्ये ती टॉप 12 मध्ये पोहोचली होती. तिने अनेक पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे.

भारताला तिसऱ्यांदा बहुमान

मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताला आतापर्यंत केवळ दोनच वेळा बहुमान मिळाला होता. हरनाज ही भारताची तिसरी मिस युनिव्हर्स ठरली आहे. यापूर्वी1994 मध्ये सुष्मिता सेन, तर 2000 मध्ये लारा दत्ता यांनी हा किताब जिंकला होता.

संबंंधीत बातम्या

सिद्धार्थ मल्होत्राच्या वाढदिवसानिमित्त शहनाज गिलने शेअर केला खास फोटो, चाहतेही झाले भावूक

Karan Johar | नव्या कोऱ्या रिअॅलिटी शोची घोषणा; करण जोहर म्हणाला, यावेळी काहीतरी वेगळं होणार!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.