71st Miss World 2024 : ‘अनेक तरुणी भारतात येतील आणि…’, कधी आणि कुठे पाहता येणार ‘मिस वर्ल्ड 2024’?

71st Miss World 2024 : भारतात होणार 'मिस वर्ल्ड 2024', माजी मिस वर्ल्ड आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर म्हणाली, 'अनेक तरुणी भारतात येतील आणि...', कुठे पाहाल 'मिस वर्ल्ड 2024'?

71st Miss World 2024 : 'अनेक तरुणी भारतात येतील आणि...', कधी आणि कुठे पाहता येणार 'मिस वर्ल्ड 2024'?
Follow us
| Updated on: Feb 20, 2024 | 9:51 AM

71st Miss World 2024 : सध्या सर्वत्र ‘मिस वर्ल्ड 2024’ स्पर्धेची चर्चा सुरु आहे. अनेक देशातील मॉडेल स्पर्धेत कौशल्य दाखवत स्वतःच्या देशाचं प्रतिनिधित्त्व करताना दिसतील. ‘मिस वर्ल्ड 2024’ स्पर्धा 8 फेब्रुवारी ते 9 मार्च या कालावधीत पार पडणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन करम्यात आलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे देखील ‘मिस वर्ल्ड 2024’ स्पर्धातील काही शो होणार आहेत. ‘मिस वर्ल्ड 2024’ स्पर्धेची उत्सुकता स्पर्धक तरुणींमध्ये पाहायला मिळत आहे.

माजी मिस वर्ल्ड आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर हिने देखील ‘मिस वर्ल्ड 2024’ स्पर्धेबद्दल उत्साह व्यक्त केला आहे. ‘मिस वर्ल्ड 2024’ भारतात देखील होत असल्यामुळे इतर देशातून आलेल्या पाहुण्यांनी भारताची ओळख करून घेण्याची आणि आदरातिथ्य अनुभवण्याची ही एक उत्तम संधी आहे.. यावर देखील मानुषी हिने मोठं वक्तव्य केलं आहे.

मानुषी छिल्लर म्हणाली, ‘स्पर्धासाठी मी उत्सुक आहे. अनेक तरुणी भारतात येतील आणि यावर भाष्य करतील. भारतात होणाऱ्या आदरातिथ्य अनुभव त्यांच्या शब्दात सांगतिल. ज्याप्रमाणे सहा वर्षांपूर्वी मी अशा स्पर्धेत सहभागी झाली होती… आता तसाच अनुभव भारत देखील अनुभवणार आहे. इतर देशातील पाहुणे सोशल मीडियावर त्यांचे अनुभव शेअर करतील.’

पुढे मानुषी म्हणाली, ‘स्पर्धेत सहभागी होणारे स्पर्धक आणि इतर पाहुण्याची फॅन फॉलोइंग तगडी आहे. त्यांचे कुटुंब आणि संपूर्ण टीम देखील भारतात येणार आहे. हे एकाच वेळी अनेक देशांसाठी फार महत्त्वाचं ठरणार आहे.’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘मिस वर्ल्ड 2024’ आणि मानुषी हिने व्यक्त केलेल्या आनंदाची चर्चा रंगली आहे.

कधी आणि कुठे पाहता येणार ‘मिस वर्ल्ड 2024’?

‘मिस वर्ल्ड 2024’ उद्घाटन सोहळ्याचे 20 फेब्रुवारीच्या संध्याकाळी missworld.com वर थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे. त्यानंतर 9 मार्च रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये 71 व्या मिस वर्ल्ड ग्लोबल फिनालेचे प्रक्षेपण होईल. स्पर्धेत वेग-वेगळ्या देशातून तब्बल 120 मॉडेल्स स्पर्धेत उतरणार आहेत. ‘मिस वर्ल्ड 2024’ स्पर्धेची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.