72 Hoorain | वादादरम्यान ’72 हुरें’च्या निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय; आता थेट JNU मध्ये..

याआधी ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावरून निर्माण झालेल्या वादाचा बॉक्स ऑफिसवर कोणताही परिणाम झाला नव्हता. अशात ‘द केरळ स्टोरी’नंतर ’72 हुरें’ प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. सध्या सर्वत्र याच चित्रपटाविषयी चर्चा रंगत आहे.

72 Hoorain | वादादरम्यान '72 हुरें'च्या निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय; आता थेट JNU मध्ये..
72 Hoorain Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 02, 2023 | 2:25 PM

नवी दिल्ली : ’72 हुरें’ या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला, तेव्हापासून हा चित्रपट सतत वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आता हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, कारण आता थेट जवाहरलाल नेहरू विद्यापिठात (JNU) या चित्रपटाच्या खास स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आलं आहे. जेएनयूमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनावरून वादाचा मोठा इतिहासच आहे. याआधीही या विद्यापिठात बरेच वादग्रस्त चित्रपट दाखवले गेले आहेत. आता नुकतंच ’72 हुरें’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी जेएनयूमध्ये विशेष स्क्रिनिंगची घोषणा केली. या मंगळवारी म्हणजेच 4 जुलै रोजी हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे.

जेएनयूच्या इतिहासाबद्दल बोलायचं झाल्यास, या विद्यापिठात जेव्हा कधी सत्य घटनांवर आधारित एखादा चित्रपट दाखवला गेला आहे, तेव्हा कोणत्या ना कोणत्या प्रकारचा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे आता 72 हुरेंच्या स्क्रिनिंगच्या निर्णयाचा निर्मात्यांवर उलट परिणाम होणार नाही ना, हे पाहणं महत्त्वाचं ठरेलं. काश्मीरमधील काही राजकीय पक्षांनी या चित्रपटातील दहशतवाद्यांच्या ब्रेनवॉश करण्याच्या चित्रणावर आक्षेप नोंदवला आहे. या चित्रपटाची कथा नकारात्मक रुढीवादी विचार कायम ठेवू शकते, असं या पक्षांचं म्हणणं आहे. या चित्रपटातून धर्माचं वेगळं आणि अपूर्ण चित्र मांडलं जाऊ शकतं, असं राजकारण्यांचं मत आहे.

प्रसिद्ध मौलाना साजिद रशीद यांनीसुद्धा ’72 हुरें’ या चित्रपटावर आक्षेप घेतला होता. धार्मिक शिकवणींचं चुकीचं चित्रण केल्याचा आणि प्रेक्षकांच्या श्रद्धेचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला होता. तर दुसरीकडे चित्रपटाच्या निर्मात्यांचं म्हणणं आहे की 72 हुरें या चित्रपटाचं विशेष स्क्रिनिंग ही काश्मिरी मुस्लीम आणि इतर विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. चित्रपटात दाखवलेल्या दहशतवादी घटनांवर चर्चा होऊ शकेल आणि त्यांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येईल, कारण ही अत्यंत गंभीर बाब आहे, असं त्यांनी म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

याआधी ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावरून निर्माण झालेल्या वादाचा बॉक्स ऑफिसवर कोणताही परिणाम झाला नव्हता. अशात ‘द केरळ स्टोरी’नंतर ’72 हुरें’ प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. सध्या सर्वत्र याच चित्रपटाविषयी चर्चा रंगत आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी पवन मल्होत्रा ​​आणि आमिर बशीर यांनी सांभाळली आहे. तर पवन मल्होत्रा ​​आणि आमिर बशीर यांना दोन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.