Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dream Girl 2 | ‘ड्रीम गर्ल 2’च्या दिग्दर्शकावर थेट चोरीचा आरोप, जाणून घ्या प्रकरण नेमके काय?

आयुष्मान खुराना याचा ड्रीम गर्ल 2 हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. ड्रीम गर्ल 2 या चित्रपटामध्ये आयुष्मान खुराना याच्यासोबत चंकी पांडे याची लेक अनन्या पांडे ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे गाणे देखील नुकताच रिलीज करण्यात आले.

Dream Girl 2 | 'ड्रीम गर्ल 2'च्या दिग्दर्शकावर थेट चोरीचा आरोप, जाणून घ्या प्रकरण नेमके काय?
Follow us
| Updated on: Aug 11, 2023 | 3:51 PM

मुंबई : सध्या आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) याचा ड्रीम गर्ल 2 हा चित्रपट जोरदार चर्चेत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे प्रमोशन देखील केले जात आहे. ड्रीम गर्ल 1 या चित्रपटाला प्रेक्षकांचे मोठे प्रेम मिळाले होते. ड्रीम गर्ल 2 हा चित्रपट 25 आॅगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नुकताच ड्रीम गर्ल 2 (Dream Girl 2) चित्रपटातील एक गाणे देखील रिलीज करण्यात आले आहे. चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यापासून चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दलची क्रेझ बघायला मिळत आहे.

ड्रीम गर्ल 2 चित्रपटामध्ये आयुष्मान खुराना याच्यासोबत अनन्या पांडे मुख्य भूमिकेत आहे. ड्रीम गर्ल 1 चित्रपटामध्ये नुसरत भरूचा ही मुख्य भूमिकेत होती. विशेष म्हणजे नुसरत भरूचा आणि आयुष्मान खुराना यांच्या जोडीला प्रेक्षकांचे जोरदार प्रेम मिळाले आणि चित्रपट देखील हिट ठरला.

असे असतानाही नुसरत भरूचा हिला ड्रीम गर्ल 2 मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आणि चंकी पांडेच्या लेकीला संधी देण्यात आली. ड्रीम गर्ल 2 चित्रपट रिलीज होण्याला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच आता ड्रीम गर्ल 2 चित्रपटाच्या लेखक आणि निर्देशक असलेल्या राज शांडिल्यवर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आलाय.

राज शांडिल्य याच्यावर चक्क चोरीचा आरोप हा लावण्यात आला आहे. ज्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. चित्रपटाची स्टोरी चोरल्याचा आरोप राज शांडिल्यवर लावण्यात आलाय. इतकेच नाही तर ही पहिली वेळ नाही की, राज शांडिल्यवर चित्रपटाची स्टोरी चोरल्याचा आरोप करण्यात आला.

यापूर्वीही राज शांडिल्यवर चित्रपटाची स्टोरी चोरल्याचा आरोप हा करण्यात आला होता. झांसी येथील रहिवाशी असलेले अंकुश शर्माने हा आरोप केला आहे. विशेष म्हणजे अंकुश शर्मा हे राज शांडिल्य याचे जुने मित्र आहेत. अंकुश शर्मा म्हणाले की, मी राज शांडिल्यला लव की अरेंज मॅरिज या चित्रपटाची स्टोरी ईमेल केली होती.

आता त्यांनी त्यावर काम सुरू केले आहे. मी चित्रपटाची स्टोरी लिहिली असताना त्यांनी कुठल्याच गोष्टीची कल्पना न देता या चित्रपटावर काम सुरू केले आहे. माझी स्टोरी चोरी करण्यात आली. यावर बोलताना राज शांडिल्य म्हणाले, मुळात म्हणजे हे सर्व प्रकरण जुने आहे. इतकेच नाही तर हे प्रकरण कोर्टात देखील सुरू आहे. मी यावर जास्त काहीच बोलू शकत नाही. कोर्टाचा निकाल देखील आता लवकरच येणार आहे.

खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली
खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली.
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका.
सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा
सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा.
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?.
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?.
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?.
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे....
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे.....