अभिषेक बच्चनचा संताप, बहिणीला फटकारलं, अन्…
Abhishek Bachchan and Shweta Bachchan : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे सध्या सतत चर्चेत असणारे नाव आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. नुकताच अभिषेक बच्चन याच्याबद्दल एक अत्यंत मोठा आणि हैराण करणारा खुलासा करण्यात आलाय.
मुंबई : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याचे घर सोडल्याचा देखील खुलासा काही दिवसांपूर्वीच करण्यात आला. मात्र, यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही काहीही भाष्य केले नाहीये. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यातील वाद वाढल्याचे देखील काही दिवसांपूर्वीच सांगण्यात आले. यामुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळाले. दुसरीकडे अभिषेकच्या वाढदिवसानिमित्त अत्यंत खास पोस्ट ऐश्वर्याने शेअर केली.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात वाद सुरू असल्याच्या चर्चांपासून श्वेता बच्चन हिचे नाव देखील पुढे येतंय. ऐश्वर्या राय आणि श्वेता बच्चन यांच्यामध्ये अजिबातच नाते हे चांगलेच नसल्याचे सांगितले जाते. आता नुकताच नव्याच्या शोमध्ये श्वेता बच्चन हिने अत्यंत मोठा खुलासा केलाय. श्वेता बच्चन हिचा हा खुलासा ऐकून सर्वचजण हैराण झाल्याचे बघायला मिळतंय.
श्वेता बच्चन हिचे वहिणी ऐश्वर्या राय हिच्यासोबत जरी खास नाते नसले तरीही तिचे भाऊ अभिषेक बच्चन याच्यासोबत छान नाते नक्कीच आहे. नुकताच श्वेता बच्चन हिने अभिषेक बच्चन याच्याबद्दल थेट मोठा खुलासा केलाय. नव्याच्या शोमध्ये श्वेता बच्चन हा थेट खुलासा करताना दिसलीये. हेच नाही तर श्वेताच्या या खुलाश्यानंतर सर्वचजण हैराण झाल्याचे बघायला मिळतंय.
श्वेता बच्चन हिने थेट म्हटले की, एकदा मी आणि अभिषेक दोघेच घरी होतो. आमच्यामध्ये कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. घरी कोणीच नव्हते. अभिषेकला इतका जास्त राग आला की, त्याने थेट माझे केसच कापले. ही गोष्ट मी आईपासून बरेच दिवस लपवून देखील ठेवली होती. आता श्वेता बच्चन हिने केलेल्या या विधानाची जोरदार चर्चा ही बघायला मिळत आहेत.
श्वेता बच्चन हिने ज्यावेळी हा खुलासा केला, तेंव्हा तिथे जया बच्चन या देखील उपस्थित होत्या. श्वेता बच्चन ही कायमच चर्चेत असते. श्वेता बच्चन हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. विशेष म्हणजे श्वेता बच्चन ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते. श्वेता बच्चन हिची मुलगी नव्या देखील कायमच चर्चेत राहणारे नाव आहे.