अभिनेत्री वयाच्या 17 व्या वर्षी राजाच्या प्रेमात, रतन टाटा यांच्याशीही खास नाते, बॉलिवूडची स्टाईल क्वीन तरीही आता जगते…

प्रेम ही अशी एक भावना आहे, जी सर्वांनाच होते परंतू सर्वांचेच प्रेम यशस्वी होईल असे अजिबात नाही. प्रेमामध्ये असताना काय चूक आणि काय बरोबर हे देखील बऱ्याच वेळा समजत नाही. तीन वेळात प्रेमात पडूनही बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री एकटेपणाचे आयुष्य जगत आहे. विशेष म्हणजे या अभिनेत्रीने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला.

अभिनेत्री वयाच्या 17 व्या वर्षी राजाच्या प्रेमात, रतन टाटा यांच्याशीही खास नाते, बॉलिवूडची स्टाईल क्वीन तरीही आता जगते...
Simi Garewal
Follow us
| Updated on: Aug 03, 2024 | 3:51 PM

ज्यावेळी प्रेम होते, त्यावेळी ती भावना अत्यंत वेगळी आणि खास असते. प्रेमात असल्यावर व्यक्तीला इतर काहीच दिसत नाही. प्रेम तर सर्वचजण करतात. मात्र, प्रत्येकाचेच प्रेम यशस्वी होईल, असे अजिबात नाही. अशीच एक अभिनेत्री जिणे मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला. मात्र, आता एकटेपणाचे आयुष्य जगत आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून सिमी गरेवाल आहे. विशेष म्हणजे वयाच्या 17 व्या वर्षी ती सर्वात अगोदर थेट महाराजाच्या प्रेमात पडली. त्यानंतर तिने देशातील एका मोठ्या दिग्गज व्यक्तीलाही डेट केले. मात्र, असे असतानाही तिला कधीच प्रेम मिळाले नाही. 

एका मुलाखतीमध्ये सिमी गरेवाल हिनेच याबद्दल थेट खुलासा केला. सिमी गरेवाल ही म्हणाली की, मला वयाच्या 17 व्या वर्षी माझ्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीसोबत प्रेम झाले होते. हे शेजारी जामनगरचे राजे होते, ज्याच्यासोबत माझे प्रेम झाले. आम्ही दोघे तीन वर्ष रिलेशनशिपमध्ये होतो. यादरम्यान आम्ही दोघांनी विविध खेळ आणि प्राण्यांच्या जीवनाचा शोध घेतला.

जुन्या दिवसांची आठवण काढत सिमी गरेवाल म्हणाली की, खरोखरच ते दिवस खूप म्हणजे खूप जास्त चांगले होते. मुळात म्हणजे ते दिवस आता जरी मी आठवले तरीही माझ्या चेहऱ्यावर आपोआप हास्य येते. हेच नाही तर सिमी गरेवाल ही रतन टाटा यांच्यासोबत देखील रिलेशनमध्ये होती.

बऱ्याच वेळा सिमी गरेवाल ही रतन टाटा यांच्यासोबत असलेल्या रिलेशनवर जाहिरपणे बोलताना दिसली. सिमी गरेवाल ही कायमच आपल्या रिलेशनला चांगल्या आठवणी म्हणून सोबत ठेवते. मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून तिने रतन टाटा यांना कायमच आठवणीत ठेवले आहे. सिमी गरेवालचे लग्न 1970 मध्ये दिल्लीच्या रवी मोहन याच्यासोबत झाले.

रवी मोहन याच्यासोबत सिमी गरेवाल हिने लग्न केले. मात्र, सिमीचे हे लग्न फार काळ टिकू शकले नाही. आता सिमी गरेवाल ही एकटीच जीवन जगते. सिमी गरेवालने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. सिमी गरेवालचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. हेच नाही तर मोठ्या संपत्तीची मालकीन देखील सिमी गरेवाल ही आहे. तीन वेळा प्रेम होऊनही एकटे आयुष्य सिमी गरेवाल जगत आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.