नताशासोबतच्या घटस्फोटामुळेच हार्दिक पांड्याने सोडला आयपीएल संघ? क्रिकेटपटूला अत्यंत महागात…
Hardik Pandya Divorce : हार्दिक पांड्या हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. हार्दिक पांड्या याच्यावर आयपीएल सुरू झाल्यापासून टीका केली जातंय. आता हार्दिक पांड्या याच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आल्याचे बघायला मिळतंय. पत्नीसोबत हार्दिक पांड्या घटस्फोट घेत असल्याची चर्चा आहे.
भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या हा सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. हार्दिक पांड्या हा पत्नी नताशा स्टेनकोविक हिच्यासोबत घटस्फोट घेणार असल्याचे सांगितले जातंय. हेच नाही तर दोघे विभक्त झाल्याचेही सांगितले जातंय. नताशा स्टेनकोविक आणि हार्दिक पांड्या यांच्याबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत. दरवर्षी नताशा ही हार्दिक पांड्या याला सपोर्ट करण्यासाठी आयपीएल मॅचमध्ये पोहचते. मात्र, यंदा ती स्टेडियममध्ये अजिबात दिसली नाही. हेच नाही तर सोशल मीडियावरून तिने पांड्या आडनाव देखील काढून टाकले आहे. आता नुकताच मोठा खुलासा झालाय.
एका रिपोर्टनुसार हार्दिक पांड्या याला आपल्या संपत्तीमधून 70 टक्के वाटा हा नताशा हिला द्यावा लागेल. हार्दिक पांड्याला संपत्ती नताशा हिच्या नावावर करावी लागेल. आता रिपोर्टमध्ये चक्क असा दावा करण्यात आलाय की, हार्दिक पांड्या गुजरात टायटन्समधून फक्त नताशाला पैसे देण्यासाठीच बाहेर पडला. आता यानंतर विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.
हार्दिक पांड्याने आयपीएलमधील टीम बदलली आहे. गुजरात टायटन्स सोडून तो मुंबई इंडियन्समध्ये सहभागी झाला. हेच नाही तर त्याला चक्क टिमचा कर्णधार देखील बनवण्यात आले. मात्र, यानंतर लोक हार्दिक पांड्याला टार्गेट करताना दिसले. काही रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आलंय की, हार्दिक पांड्याची फक्त 50 टक्केच संपत्ती त्याच्या नावावर आहे.
बाकी सर्व संपत्ती ही त्याच्या कुटुंबियांच्या नावावर आहे. हार्दिक पांड्या याच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आल्याचे बघायला मिळतंय. नुकताच नताशा ही मुंबईमध्ये स्पॉट झाली .विशेष म्हणजे अत्यंत खास व्यक्तीसोबत मलायका एका कॅफेत जाताना दिसली. नताशा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. सोशल मीडियावर नताशा सक्रिय असते.
हार्दिक पांड्या याला डेट करण्याच्या अगोदर नताशा ही अभिनेता अली गोनी याला डेट करत होती. हेच नाही तर अनेकदा हे एकसोबत स्पॉट देखील होत होते. अली गोनी आणि नताशा यांच्या ब्रेकअपनंतर तिने हार्दिक पांड्या याला डेट केले आणि त्याच्यासोबत लग्न केले. हार्दिक पांड्या हा कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. मुंबईमध्येही हार्दिक पांड्या याचे अत्यंत आलिशान असे घर आहे.