अखेर ‘त्या’ निर्णयानंतर जान्हवी कपूर हिचा मोठा खुलासा, म्हणाली, काहीही झाले तरीही…
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. जान्हवी कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. जान्हवी कपूर ही तिच्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. विशेष म्हणजे एका मागून एक चित्रपट तिचे प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. जान्हवी कपूर ही सध्या तिच्या उलझ या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. विशेष म्हणजे मोठे खुलासे करतानाही जान्हवी कपूर दिसत आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात धमाल करताना जान्हवी कपूर दिसली. गेल्या काही दिवसांपासून जान्हवी कपूर ही शिखर पहाडिया याला डेट करत आहे. विशेष म्हणजे हे दोघे कायमच एकसोबत स्पॉट होताना देखील दिसतात. जान्हवी कपूर सोशल मीडियावर सक्रिय दिसत असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहे.
जान्हवी कपूर हिने नुकताच एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये जान्हवी कपूरने मोठे खुलासे केले आहेत. जान्हवी कपूर म्हणाली की, केस छोटे केले की आई खूप जास्त ओरडत होती. मला आठवते की, मी धडक चित्रपटाच्या वेळी केस छोटे केले होते तर आई खूप जास्त ओरडली होती, तिने मला थेट म्हटले होते की तू असे कसे करू शकते?
कोणतीही भूमिका असो केस अजिबात कट करायचे नाहीत, असे तिने मला सांगितले होते. आई माझ्या केसांना तेल लावत आणि मसाज करत. यामुळेच आपण काहीही झाले तरीही केस कट न करण्याचा निर्णय जान्हवीने घेतल्याचे म्हटले. खूप मोठी संधी मिळाली तरीही आपण केस कट नाही करणार असे जान्हवी कपूर हिने म्हटले.
यासोबतच जान्हवी कपूर हिने मोठा खुलासा करत म्हटले की, उलझ चित्रपटाच्या डायरेक्टरसोबत तिचे याच गोष्टीमुळे थोडे मतभेद झाले. थोडक्यात काय तर आता कोणताही चित्रपट असो किंवा कितीही मोठा तरीही जान्हवी कपूर ही एखाद्या भूमिकेसाठी आपले केस अजिबात कट करणार नाहीये.
मध्यंतरी एक चर्चा रंगताना दिसली की, जान्हवी कपूर हिने सर्वांच्या गुपचूप शिखर पहाडिया याच्यासोबत साखरपुडा केला. शिखर पहाडिया आणि जान्हवी कपूर लवकरच लग्न करणार असल्याचे सांगितले जाते. शिखर पहाडिया हा सुशीलकुमार शिंदे यांचा नातू असून मोठ्या संपत्तीचा तो मालक आहे. जान्हवी कपूर हिच्या चित्रपटांना म्हणावा तसा धमाका करण्यात यश मिळत नाहीये.