तीन दिवसानंतर मृतदेह सापडला, ‘त्या’ अभिनेत्रीच्या मृत्यूमागचं कारण आलं समोर; सर्व काही असूनही ती…
एका बॉलिवूड अभिनेत्रीचे निधन झाल्याने मोठी खळबळ बघायला मिळतंय. हेच नाही तर या घटनेनंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. आता पोलिस या प्रकरणात तपास करताना दिसत आहेत. मुंबईमध्येच अभिनेत्रीने शेवटचा श्वास घेतलाय. आता नुकताच मोठा खुलासा करण्यात आलाय.
बॉलिवूड अभिनेत्री नूर मालाबिका दास हिचे निधन झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. नूर मालाबिका दास हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या. हेच नाही तर अभिनेत्री काजोल हिच्यासोबत वेब सीरिजमध्येही काम केले. अभिनेत्रीच्या निधनाची बातमी कळताच चाहत्यांना धक्का बसलाय. हेच नाही तर अभिनेत्रीचे निधन तीन दिवसांपूर्वीच झाले. फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. नूर मालाबिका दास हिने ओढणीच्या मदतीने पंख्याला गळफास घेतला.
आता नूर मालाबिका दास हिच्या निधनानंतर अत्यंत मोठी माहिती पुढे येताना दिसत आहे. ओशिवरा पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अभिनेत्री काही दिवसांपासून नैराश्याने त्रस्त होती आणि हेच नाही तर नैराश्यासाठी औषधही नूर मालाबिका दास घेत होती. नैराश्यातूनच अभिनेत्रीने आत्महत्या केल्याचे सांगितले जातंय.
प्राथमिक तपासानुसार अभिनेत्रीने नैराश्यातूनच आत्महत्या केलीये. अजूनही पोलिस या प्रकरणात तपास करताना दिसत आहेत. काही मोठे खुलासे या प्रकरणात होऊ शकतात, अशीही चर्चा रंगताना दिसत आहे. नूर मालाबिका दास ही मुळ आसामची आहे. सोशल मीडियावर नूर मालाबिका दास सक्रिय असून आपल्या चाहत्यांसोबत प्रत्येक अपडेट शेअर करताना दिसत होती.
फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितल्यानंतर ओशिवारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. हेच नाही तर पोलिसांकडून अभिनेत्रीच्या कुटुंबियांसोबत संपर्क साधण्यात आला. मात्र, अभिनेत्रीचे कुटुंबिय मृतदेह घेण्यासाठी मुंबईमध्ये पोहचले नाहीत.
शेवटी पोलिसांनीच नूर मालाबिका दास हिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. विशेष म्हणजे नूर मालाबिका दास हिने अनेक महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. नूर मालाबिका दास ही मोठ्या संपत्तीची मालकीन असल्याचे देखील सांगितले जातंय. नूर मालाबिका दासच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय.