28 इमेल आयडी, अनेक युट्यूब चॅनल्स; सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचं काय झालं?; कोर्टात नेमकं काय घडलं?
सलमान खान याचे चाहते सध्या चिंतेत दिसत आहेत. सलमान खानला सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या मिळताना दिसत आहेत. हेच नाही तर काही दिवसांपूर्वीच सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला. सततच्या धमक्यांमुळे सलमान खान याच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे.
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला गेल्या काही दिवसांपासून सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या या मिळताना दिसत आहेत. हेच नाही तर सलमान खान याच्या मुंबईतील घरावर 14 एप्रिलच्या पहाटे गोळीबार करण्यात आला. ज्यावेळी हा गोळीबार झाला, त्यावेळी सलमान खान हा आपल्या कुटुंबासोबत घरातच उपस्थित होता. सलमान खान याच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर मोठी खळबळ निर्माण झाली. चाहत्यांमध्येही चिंतेचे वातावरण बघायला मिळाले. सलमान खान याच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना गुजरातमधून ताब्यात घेतले.
लॉरेन्स बिश्नोईच्या गँगकडून सलमान खानला वारंवार जीवे मारण्याची धमकी मिळताना दिसत आहे. फक्त धमकीच नाही तर सलमान खान याच्या पनवेलच्या घराची रेकी देखील लॉरेन्स बिश्नोईच्या गँगकडून अनेकदा केली गेली. नवी मुंबई येथून लॉरेन्स बिश्नोईच्या गँगच्या सदस्यांना पोलिसांकडून काही दिवसांपूर्वीच अटकही करण्यात आलीये.
सलमान खान याला व्हिडीओच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी राजस्थानमधून अटक केलीये. बनवारीलाल गुजर असे त्याचे नाव असून तो लॉरेन्स बिश्नोईच्या गँगचा सदस्य आहे. बनवारीलाल गुजर याला आता 20 तारखेपर्यंत पुन्हा पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. रिमांड संपल्यानंतर आज पुन्हा आरोपीला कोर्टात करण्यात आले होते.
आरोपी गुजरच्या मोबाईलमध्ये तब्बल 28 ईमेल आयडी सापडल्याचे तपासामध्ये उघड झाले आहे. ईमेल आयडीचा वापर करून आरोपीने अनेक यूट्यूब चॅनेल्स काढल्याचीही माहिती पुढे आलीये. आरोपी या ईमेल आयडीच्या माध्यमातून कोणकोणाच्या संपर्कात होता याचा तपास आता पोलिस करत आहेत. या प्रकरणात अजून काही मोठी खुलासे होण्याची दाट शक्यता आहे.
हेच नाही तर धक्कादायक म्हणजे या आरोपीने सलमान खान याच्या घराबाहेरील गोळीबाराची संपूर्ण माहिती जमवून ठेवली होती. आता पोलिसांकडून या आरोपीची कसून चाैकशी केले जातंय. या प्रकरणात अजूनही काही नावे पुढे येऊ शकतात. सध्या सलमान खान याची सुरक्षा मुंबई पोलिसांकडून केली जातंय. सलमान खान याच्या सुरक्षेत देखील मोठी वाढ करण्यात आलीये.