मलाही आज सेटवर यायचं नव्हतं पण…; बिग बॉसच्या मंचावर पहिल्यांदाच सलमानकडून भावना व्यक्त

सतत येणाऱ्या धमक्यांमुळे सलमानच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. बिग बॉसच्या मंचावर पहिल्यांदाच सलमान खान सध्याच्या परिस्थितीबद्दल व्यक्त झालेला पाहायला मिळाला.

मलाही आज सेटवर यायचं नव्हतं पण...; बिग बॉसच्या मंचावर पहिल्यांदाच सलमानकडून भावना व्यक्त
Follow us
| Updated on: Oct 19, 2024 | 6:21 PM

Salman Khan Bigg Boss: सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या सध्या येत आहे. त्यानंतर सलमानने बिग बॉसच्या मंचावर त्याच्या भावना व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानलाही धमक्या येत असल्याचे सर्वांनाचं माहित आहे. यामुळे सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्याच्या शुटींगच्या सेटवरही कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पण तरीही बिग बॉसच्या दुसऱ्या वीकेंडच्या वारमध्ये सलमानने घरातल्यांची शाळा घेताना त्याच्या मनातील भावनाही व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं.

मला सेटवर यायचं नव्हतं; बिग बॉसच्या मंचावर सलमानने व्यक्त केल्या भावना

बिग बॉस १८ च्या ‘वीकेंड का वार’चा नवीन प्रोमो प्रसारित झाला आहे. त्यात घरातील एका सदस्याला समजावताना सलमान खाननेही अचानक अशा काही भावना व्यक्त केल्या ज्यावरून त्याची सद्यस्थिती काय आहे हे दिसून आली. “खरंतरं मलाही आज सेटवर यायचं नव्हतं, पण हे करावं लागतं”, अशा भावना सलमानने बोलून दाखवल्या. सलमान खानला येणाऱ्या धमक्यांमुळे चिंतेचं वातावरण आहे. सलमानची सुरक्षा हा सध्याचा महत्त्वाचा विषय आहे. अशा परिस्थितीतही त्याने शूट करणं हे कितपत धोकादायक असू शकतं याची कल्पना त्यालाही आहे. पण तरीही सर्व प्रकारची सुरक्षा घेत सलमान बिग बॉस १८ चे शुटींग करत आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

‘वीकेंड का वारच्या’ प्रोमोमध्ये दिसली सलमानची मनस्थिती

बिग बॉसच्या घरात शिल्पा शिरोडकर आणि अविनाश मिश्रा यांच्यामध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं. अविनाशवर बिग बॉसने रेशनची जबाबदारी दिलेली असते. घरातील स्पर्धकांना काहीही बनवायचं असल्यास त्यांना अविनाशकडून राशन घ्यायचं आहे. अविनाश स्पर्धकांना राशनमधल्या काहीच गोष्टीच देण्यास तयार होतो. मात्र त्यावेळी शिल्पा त्याच्याकडे नॉन-व्हेज पदार्थांची मागणी करते. अविनाश ते देण्यास नकार देतो. आणि त्या दोघांमध्ये धुसपूस होते.

अविनाश शिल्पावर ती हे सगळं लोकांच्या गूड बूक्समध्ये येण्यासाठी करत असल्याचा आरोप करतो. हे ऐकताच शिल्पा चिडते आणि त्यांच्यामध्ये कडाक्याचं भांडण होतं. याच संदर्भात आजच्या भागात सलमान शिल्पाशी बोलताना दिसणार आहे.

‘वीकेंड का वार’चा प्रसारित झालेल्या नवीन प्रोमोमध्ये सलमान शिल्पासोबत याचबद्दल बोलताना दिसत आहे. सलमान सोबत बोलताना शिल्पा भावूक होते आणि ती रडू लागते तेव्हा तिला सलमान म्हणतो, “शिल्पा आय हेट टिअर्स.. जेव्हा तुझी मुलगी जेवणावर राग काढायची तेव्हा तू तिला काय म्हणायचीस?” शिल्पा म्हणाली, “जेवणावर राग नव्हता, अॅटिट्यूडवर होता.” सलमान तिला समजावतो की, ” तुला राग काढायचा असेल तर त्या अॅटिट्यूडवर राग काढ, तुझं कोणाशी या घरात भावनिक नातं असायलाच नको. जसं आज मला सेटवर यायची इच्छा नव्हती. पण माणसाला काही गोष्टी कराव्याच लागतात.” हे ऐकल्यानंतर शिल्पा जास्त भावूक होते आणि ुरडू लागते.

सलमान खान बिग बॉसचं शुटींग करणार नाही?

सुरक्षेच्या दृष्टीने पाहता सलमान ‘बिग बॉस 18’ चे शूटिंग सोडू शकतो . मात्र या सर्व केवळ अफवा असल्याचं समोर आलं आहे. वीकेंड का वारच्या भागासाठी सलमान खान स्पर्धकांसोबत शूटिंग करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सलमानने सर्व प्रकारच्या सुरक्षा बाळगत शुटींग सुरुच ठेवल्याचं सांगितलं जात आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.