Shilpa Shetty | शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्या आयुष्यावर तयार होणार चित्रपट, पोर्नोग्राफी प्रकरणानंतर प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न?
बाॅलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही कायमच चर्चेत असते. दोन वर्षांपूर्वी पोर्नोग्राफी प्रकरणात शिल्पा शेट्टी हिच्या पतीला अटक करण्यात आली होती. या प्रकरणातनंतर अनेकांना मोठा धक्का बसला. इतकेच नाही तर राज कुंद्रा याला अटक झाल्यानंतर अनेकांनी थेट शिल्पा शेट्टी हिला टार्गेट केले होते.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचे कुंटुबिय दोन वर्षांपूर्वी मोठ्या वादात सापडले होते. यावेळी अनेकांनी शिल्पा शेट्टी हिला टार्गेट करण्यास देखील सुरूवात केली होती. इतकेच नाही तर थेट शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या घटस्फोटाच्या बातम्या या देखील पुढे आल्या होत्या. अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणी राज कुंद्रा (Raj Kundra) तुरुंगात गेला होता. राज कुंद्राला जुलै 2021 मध्ये अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणात पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा या प्रकरणात तब्बल दोन महिने जेलमध्ये होता. राज कुंद्रा याने अश्लील चित्रपट (Movie) बनवण्याच्या उद्योगात सुमारे10 कोटींची गुंतवणूक केली होती. त्याचे शूटिंग भारतामध्ये केले जात होते.
अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणात जेलमध्ये गेल्यापासून राज कुंद्रा हा चेहऱ्याला मास्क लावून फिरतो. इतकेच नाही तर पार्ट्यांमध्ये जातानाही कायमच राज कुंद्रा याच्या चेहऱ्याला मास्क हे बघायला मिळते. काही दिवसांपूर्वीच चर्चा होती की, काही मोठे खुलासे करण्यासाठी राज कुंद्रा हा बिग बाॅसच्या घरात जाऊन शकतो. बिग बाॅसच्या निर्मात्यांनी त्याच्यासोबत संपर्क देखील साधला होता.
आता नुकताच राज कुंद्रा याच्याबद्दल एक अत्यंत मोठी अपडेट पुढे येतंय. राज कुंद्रा हा आता अभिनय क्षेत्रामध्ये पर्दापण करणारा असल्याचे सांगितले जातंय. विशेष म्हणजे राज कुंद्राची बायोपिक तयार केली जाणार आहे. या चित्रपटामध्ये स्वत: राज कुंद्रा हाच मुख्य भूमिकेत असणार आहे. यामध्ये तो काही मोठे खुलासे देखील करणार आहे.
या बायोपिकमध्ये अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणात काही मोठे खुलासे होणार आहेत. अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणात नाव आल्याने राज कुंद्रा याच्या आयुष्यामध्ये नेमके काय सुरू होते आणि त्यावेळी कुटुंबाची काय स्थितीत होती हे सर्व दाखवले जाणार आहे. अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणात राज कुंद्रा हा मुंबईतील जेलमध्ये तब्बल दोन महिने होता.
जेलमध्ये कशाप्रकारचे आयुष्य आपण जगले याचा देखील मोठा खुलासा राज कुंद्रा या चित्रपटामध्ये करणार आहे. या चित्रपटाचा डायरेक्टर कोण आहे, याचे नाव अजून काही जाहिर करण्यात आले नाहीये. मात्र, या चित्रपटातून 100 टक्के राज कुंद्रा याची इमेज चांगली करण्याचा प्रयत्न हा केला जाणार असल्याचे स्पष्ट आहे. अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणात राज कुंद्रा याने काही भाष्य केले नाहीये.